सोमवार, ८ एप्रिल, २०२४

सिर्फ देश नहीं, संविधान ही बदल रहा है...!!

 सिर्फ देश नहीं, संविधान ही बदल रहा है...!!



सरकारला विचार नसतात.राजकीय पक्षांना विचार असतात. तशी विशिष्ट विचारांची सरकार चालवायला अजिबात गरज नसते.सरकार हे आपल्याला घटनेशी प्रामाणिक राहूनच चालवायचे असते‌.घटनेतील उद्देश्यासाठी सरकारने प्रमाणिक काम करावे अशी अपेक्षा घटनेची आहे.सरकारने काय करावे,काय करू नये याचे नियम आहेत.कायदे आहेत.या देशात घटनेपेक्षा कुणी ही मोठा नसतो.जेव्हा कायद्याचा,पदाचा गैरवापर केला जातो आणि स्वायत्त संस्था जेव्हा सरकारच्या हाताच्या बटीक बनतात तेव्हा देश हुकूमशाहीच्या उंबरठ्यावर उभा असतो.या स्वायत्त संस्थेच्या खांद्यावर बंदूक ठेऊनच हुकुमशाही आपले पाय हळूहळू पसरत जाते.आपला झेंडा रोवत असते हे सा-या जगाने पाहिले आहे. हुकुमशाहीची सुरूवात घटना आपल्याला हवी तशी लवचिक करूनच होत असते.आपण लोकशाहीचे किती सुंदर गीतं गायली तरी हुकूमशाही आपली मूळं खोलवर रूजवत जात असते.एक कंपूशाही निर्माण होत जाते.दुर्बल,भित्रे,लाचार लोक कंपूशाहीत सामिल होऊन आपली जागा तयार करून घेतात.सोन्याच्या पिंजरा त्यांना महाल वाटु लागतो.त्यांना गुलामीची जाणीव होतेच असं नाही.झाले तरी ते हतबल असतात.

     भारतीय लोकशाही ही सांसदीय लोकशाही आहे.सध्या दोन तीन दशका पासून घटनेचा हा ढाचा जाणीवपूर्वक बदला गेला आहे.पंतप्रधान पदाचा उमेदवार ठरवला जातो आहे. तो जाहीर केला जात आहे.दोन राष्ट्रीय व्यक्तिमत्त्वाची तुलना करत  लोकांचं मत तयार केले जात आहे.संसदीय पक्ष त्यांचा नेता निवडत असतात.दोन  किंवा अधिक पक्षांची तुलना करत लोकांचं मतदान  होणे आवश्यक असते.एखादया व्यक्तीला  महत्व येणे हे संसदीय लोकशाही साठी भयंकर गोष्ट असते.लोकशाहीचा ढाचा पायदळी तुडवण्या  सारखंचं हे आहे. अशी तुलना का? संविधान बदलाची ही नांदी आहे. हे अनेक दशके चालू आहे पण कुणीचं गंभीर घेत नाही.

      एका पक्षाने आपला पंतप्रधान पदाचा उमेदवार जाहीर केला की आपण दुस-या पक्षाकडून तशीच अपेक्षा करतो. हे भारतीय लोकशाहीच अपयश आहे.ही सुरूवात आहे.आपण हळू हळू घटनेचे साचे तोडत तर जाणार नाहीत ना? प्रचंड भिंती वाटते आहे

          धर्म आणि जातीच्या नावाने  पक्ष संघटना निर्माण होताहेत. भेदाच्या भिंती उभ्या  केल्या जात आहेत.सा-याचं निवडणूका या भेदावर  बेतल्या जात आहेत.

संविधान बचाव..बचाव म्हणुन त्रागा करून संविधान वाचवलं जाऊ शकत नाही. त्यासाठी  प्रत्येक नागरिकानी सजग होणे आवश्यक आहे.

बघा,आता काय करायचे ते? ढोंग तर सारेच करत आहेत.

                                                       परशुराम सोंडगे

सोमवार, ४ मार्च, २०२४

अंनतरावांच प्री-विडींग आणि आमचा रम्या







 अंनतरावचं प्रि- विडींग आणि आमचा रम्या

त्या अंबानींच्या पोटयाचं प्रि-विडींग लयईचं गाजलं.नट नि बीटं ,नट्या न्  बिटया...सा-या जगातलं टाॅपची सेलेब्रिटी तिथं आल्ते जणू. आपल्याला काय आमंत्रण बिमंत्रण नव्हतं.असल्या एकदम मोठ्या लोकांच्या लग्नात गावोगावी पंक्ती उठाया पाहिजेत. अन्न दान करायला पाहिजे.उग  म्या आपली आपेक्षा केली. तसल्या झंझटीत तसली मोठी लोकं कशाला पडतेलं?

काही का असेना मला मात्र मेरा देश महानच्या खळाखळा उकळया फुटल्या हायती. त्याचं कारण मी तसंच हाय. हे अंनतरावाचं प्री -विडींग  सइम्पलं प्रोग्रॅम नाय.त्या प्रोग्रामनं देशाचं नाक भलं मोठं उंचावलयं‌. हलक्यात घेऊ नका.

                  आपल्या देशास कमी समजण्याची टाप कुणी करायचं नाय.त्या भिकारडया पाकिस्तानात तर असं ग्रेट लगन पण कधी झालं असलं का? कवा होईल का? प्री-विडिंग तर सोडाचं. म्या तर नुसते ह्या प्रोग्रमचं फोटू पाकिस्तान्यांना टॅग करणार हाय.

एक हजार कोटी का काय? नुसता खर्च झालाय जणू. या प्री-विडींगचा.जोक हाय काय? बजेट नसेल पाकडयांच इतकं.

मला लग्नात  जायला भेटलं नाय म्हणून  खंत नाय.आपला शाहरूख खान गेल्ता ना तिथं. आपण त्याचं फॅन हायत बरं का? लयं जबराटं फॅन हायत आपण त्याचं.काही जण उगीच त्यांच्यावर डक धरून असत्यात.तेव्ह तिकडं जेवला तरी आपलं प्वाटं भरलयं इकडं.

आडीच हजार का काय नुसतं पदार्थ होतं जणू तिथं खायला.इतुक्याश्या बारीक बारीक पोटात एवढी समदी पक्कावन्न  कशी ढकलायची? मला उगीच प्रश्न पडला? उग घडीभर टेन्शन भी आल्तं पण नंतर मपलचं मलाच कळलं आपल्याला कुठं खायचे आहेत ते पक्कावन्न‌. जे खाणार ते बघून घेतेलं.आंबानी सेठ सोता वाढीत होतं. उग प्वाटं फुटायचं एखाद्या खादाडाचं.

             अंनत आबांनीच्या फ्री व्हीडींगच मला तर लयं अभिमान वाटुतुया. तीन खान तिथं गेलं भी.नाचल भी.फुटू भी काढलं. हिंदूच्या लग्नात हे थ्री खान जाणंं म्हणजे मोठी राष्ट्रीय घटना हाय ती.राष्ट्रीय एकात्मतेचे प्रतीकच म्हणायचं ना?बरं शारूख तिथं स्टेजवरून जय श्रीराम पण बोल्ला. जयश्रीरामवाल्याचा भी राग कमी झाला आसणं. या प्री विडींग मुळं देशाच्या दृष्टीने ही महत्वाची घटना घडली की. तेव्हां भी लयं डांबरसं. जयश्रीराम म्हणतच नव्हता. देशाचा माहोल झालाय.बच्चा असता है.राम आता है. ह्यो शारूख म्हणायचं नव्हता.त्या प्रोग्राम मधी तेव्हं म्हणाला.जयश्रीराम....!! प्रश्नच सुटला ना?


             'मेरा देश महान... !!' असं वाटून वाटून मव्हं छाताड फुगून टम्म झालयं बघा.कमून म्हणून इचारा ना?ती पाप स्टार रिहाना.नाचवली आंबानीन‌.जगातली टाॅपची नाची हाय ना ती? ती मागे आपल्या देशाला गरीब देश म्हणली होती..शेतक-याचं ते आंदोलन बघून तिन तसं टिव्टं केल्तं.भारत देशात शेतकरी गरीब हायत म्हणून काय समदा देश गरीब समजायचा का? देशात टाॅपची श्रीमंत माणसं भी हायत की‌.तिला काय माहित? आमच्या देशाचं जे पंतप्रधान हायीत का त्यांना पण शेठ म्हणत्यात. तू या देशाला गरीब म्हणायचं नाही‌.किमत बोल तुझी? एका तुह्या डान्सला चौ-याहत्तर कोटी दिलं आमच्या आंबानी सेठनं. बैलापुढं गौतमी पाटील नाचणारी आम्ही ग्रेट माणसं आहोत.आता तरी अंबानींच्या प्री-विडींग मध्ये तुला नाचविल. बैलांचं पण लग्न असतं आमच्या देशात.एखादा सेठ किंवा आमचा पुढारी डायरेक्ट तुला बैला पुढं नाचील. नाद नाय करायचा इंडियाचा.आमच्या देशाला गरीबाचा देश म्हणती व्हय? मोदी सेठच्या पुरं हे ध्यानात असलं.त्यांनी मुद्दामच आंबानींला तिलाच नाचायला बोल्येव असं सांगितलं आसलं.पैशाचं काय टेन्शन? मोदी सेठ आणि आंबांनी सेठ  जानी दोस्त हायीत. ही दोस्ती तुटायची नायं.

अंनतरावांच भाषण लयं भारी झालं जणू.आपल्याला लयं कळालं नाही.ते इंग्लिश मध्ये ह़ोतं.बाप रडला राव‌. चक्क डोळ्यात पाणी आलं त्याचं.माणूस किती मोठा असला तरी बापाचं काळीजचं  असतंचं की त्याला. बाप म्हणून तेव्हं रडू नाही थोपू शकला.त्याजवळ बक्कळं पैसा. त्यांनी खर्चीला भी. पोराची हौस नाय करायची तर कुणाची करायची?पैशाचं तरी काय करायचं? थोडाचं नदीला तुंब टाकता येतो पैशाचा?  बाप आणि लेकाचं नातं पाहून आपण तर पुरं इम़ोशनल झालोत बुवा.आसला चिक्कार पैसा असलेल्याची प़ोरं लयं मोकार असत्यात. सारा देश बापलेकाच्या या भव्य दिव्य नात्यात पार इरघळून गेला असतानी आमचा रम्या इतका जळतोय त्या प्रि विडींगवर इचारुचं नका. दुस-याचं सुख पाहिलं की आपलं दु:ख उंचबळून येत. तसचं झालं असलं राम्याचं भी.

तेव्हां म्हणतोय.त्या अंनतरावाला पोरगी भी लयं चिकणी भेटली.पोरीना फक्त पैसा पाहिजे.तसली नटीवाणी नाय पण काळी बेंद्री कसली तरी आपल्याला पोरगी भेटली पाहिजे.एखाद्या मंदिरात बिंदिरात तरी गरीबांची लग्न व्हायला पाहिजेत. काय अंनतरावाचा बाप नि काय आमचा बाप? तीस उलटून गेलं तरी म्हया बापाला काळी-बेंद्री,नकटी- धुकटी कसली तरी प़ोरगी सून भेटाना‌. काय खरं?इतकं भी दरिद्री असू नाही बाप.


"आर,वाहतील तुझं भी लगन. लयं अवघड असणया उमगआयआ बाप रं.." म्या आपलं गाण्याच्या  ओळीच गायल्या.क

"कसलं होत डोंबल्याचं ? मोदीसेठला केलयं पंतप्रधान.त्याला नाय बायको.बायकू नसल्याचं दु:ख त्यांना भी कळाना. गरीबांच्या लग्नाची गॅरंटी मोदीसेठ घेतील काय?"राम्याचं असलं डायलॉग ऐकून मला तर हसूच आलं.रम्याचची अपेक्षा भी फालतू नाय.प्रश्न गहनच हाय की या देशात? मोदींच्या कानावर घातला पाहिजे."आयला,प-या इथून पुढं गरीबांची लग्नं होतील का नाय रं? रहियाना नाचली म्हणून देशातल्या गरीब थओडएचन श्रीमंत होणारेत. मही देश अभिमानानं टम्म झाल्याली छातीत धस्सं झालं.

शनिवार, ६ जानेवारी, २०२४

ऐ,प्रभू,तूझं आम्ही मंदिर बांधलयं.

 






तू

देव आहेस

तू परमात्मा आहेस

आम्ही जीवात्मा....

तूच हे सर्व

तूच आहेस ना रे सर्वत्र?

तू चराचरात

ओतप्रोत भरलेला...

इथल्या

कणाकणात सामावलेला...

पेशीपेशीत तू

पेशी द्रव्याच्या

अणू रेणूत ही...

काय?

भक्तांच्या ह्रदयात

श्वासात तुच असतोस

मग हे मंदिर आम्ही कशाला बांधलंय?

असं का विचारतोस?


पाचशे वर्ष झालयं

तुझं मंदिर आम्ही बांधू शकलो नाहीत.

ऊन,वारा,पाऊस,वादळ...

सारं तू सोसत आलास

तक्रार नाही केलीस कधी तू.

आम्ही टोलेदार बंगल्यात राहीलो.

एसीत रूम मध्ये राहिलो

पण

तुला मंदिर नाही ही खंत होतीचं की सदैव.

तू परामात्मा असला म्हणून काय

झालं?

तुला  मी मंदिर पाहिजे ना.


गावागावात,

गल्लोगल्ली,घराघरात तुझं मंदिरे

आहेतच ना.

देवा-हयावर ही तू असतोस

पण

अयोध्येत मंदिर पाहिजेचं होत

तुझं.

आता आम्ही

एक तुझं

भव्य मंदिर बांधलंय.

सोहळा साजरा करतोय आम्ही

भव्यदिव्य....जबरदस्त.

एकदम शाहीथाटात.

काय म्हणालास?

देह हेच मंदिर असतं तुझं..!

हो मान्य की,

पण तुझं मंदिर

तुला हवं की नाही पण ते आम्हाला हवं

असतं.

भक्तीभावांन माथा टेकायला

कधी

लोकांची माथी भडकायला

तू

हवाच असतोस ना आम्हाला हिंदूत्वाची

आग पेटायला.

हे जग

पण पेटतं राहिलं पाहिजे.

धर्म कसा टिकेल?

अशात तरी तुला अवतार

घ्यायची वेळ येऊ देणार नाहीत आम्ही.

धर्म टिकवू..वाढवू...!!

आता तर आम्ही तुझं मंदिर बांधलयं.


तू

जरी विश्वात्मक  असलास तरी

आम्हाला मंदिरात हवा आहेस‌.

आम्ही तुझी

प्राणप्रतिष्ठा....करणार आहोत

छान छान मुर्तीत.

त्या भव्य मंदिरात...


तू 

वसशील ना त्या सुंदर रूपवान घडीव दगडात

चराचरात असतोस तसा.

ह्या ही दगडात वसं.

मंदिरात वसं.

काही शतकांचा प्रश्नच

आम्ही मारून टाकलाय आता...


तू देव

असला म्हणून काय झालंय?

तुझा वापर आम्ही

करू शकतो.

अनेक वर्ष आम्ही वापरतचं आलोत तुला.

सारेच भक्त नसतात भोळे

काही चतुर ही असतात.

काही फितूर ही...!!






वाईट वाटून घेऊ नकोस...

तसा तू क्षमाशील आहेसच की.

क्षमा कर.

कसलं भव्य मंदिर

बांधलं तुझ आम्ही....

तुला कुठं गरज त्याची

पण 

प्रभू,आमचं लयं भलं होणार..

लयं भलं....!!

                             परशुराम सोंडगे,बीड

सोमवार, १ जानेवारी, २०२४

 नविन वर्षाच्या शुभेच्छा......!!!



आज नवीन वर्षाचा पहिला दिवस.रात्री वर्ष २०२३ गेलं.वर्ष २०२४ आलं.बाय बाय २०२३  व वेलकम २०२४.. रात्री बारा वाजता घसाफोड ही झाली.नाचून झाल.गाऊन झालं.

जग कैफात बुडालं. 

भिंतीवरलं एक कॅलेंडर गेलं नि नवीन कोर करकरीत कॅलेंडर आलं. बस्सं एवढच घडलं.

उगवणारा सूर्य तोच असत़ो.त्यातून प्रसवणारा  प्रकाश ही तोच असतो.पृथ्वीच्या परिवलन व भ्रमणगतीत काहीचं फरक पडतं नसतो.सर्व भवताल जसा सदैव असतो तसाच असतो.फक्त नव्याचा भास असत़ो.

प्राणी पक्षी कीटक यांना नविन वर्षांचं भान नसतं.माणसाला मात्र २०२३ सरलं म्हणून दु:ख होतं.वर्ष २०२४ आलं म्हणून आंनदी ही होतो.काळ तशी मानवी कल्पनाचं. माणसांन त्याला ही आकार दिला.उकार दिला.आपला सखा-सखी करून माणूस त्याच्या प्रेमात ही पडला.

नविन  सालकडून तर किती अपेक्षा....!! निरपेक्ष प्रेम हल्ली कुठं राहिलंय?

सारं शुभ मंगलच घडावं अशी अपेक्षा.अशुभ आमच्या ओंजळीत टाकू नको रे बाबा...!!

खरंतर अनंत ब्रम्हाडांत दिवस उगवत नाही.दिवस मावळत नाही.काळाच्या अनंत रेषेवर ब्रम्हांड सरकते आहे.असेच सरकत राहणार आहे अनंत काल.

     आपल्याला मात्र वाटतं की.नवं वर्षाचं  हे बाळं रांगत या सृष्टीचा कब्जा घेत पण आपण स्वागतच नाही केलं तर? नवं वर्ष रूसून बसेल का? खूप नाचून नाचून स्वागत केलं तर ते वर्ष माणसांना  प्रसन्न होत असेल.आपण नाचत राहतो.नशेत, धुंदीत बुडतं राहतो.आपण स्वागतात कसूर करत नाही. कसूर आपल्याला करायचा पण नसतो.

रांगोळ्या काढतो.डीजे वाजवतो.घरावर रोषणाई करतो.लेजरचे शो करतो. दारू ढोसत राहतो हे नविन वर्षीला आवडतं म्हणून आपण करत असतो का? छे.!छे !!

काळचक्राला कुठं ज्ञानेंद्रिये असतात?

आपल्याला प्याची असते म्हणून आपण पितो. आपल्याला नाचायचं असतं म्हणून आपण नाचतो.आंनद साजरा करण्याची ती आपली पध्दत असते.जो तो आपआपल्या आवडीप्रमाणे सिलेब्रेशन करत असतो.तसा साराच हा भातकुलीचा खेळ असत़ो.खोटं खोटं का असेना पण मज्जा येते ना ? मग खेळायचं.मज्जा महत्वाची.संस्कृती वगैरे गोष्टी पण अश्याच मानवनिर्मितच आहेत ना? कशाला टेन्शन घ्यायचं?

आयुष्य सा-यांनाच असते पण आयुष्याची लांबी सां-याची सारखी नसते.कुणाचं लांब असतं.कुणाचं आखूड असते.जे क्षण आपल्याला वाट्याला येतात.ते फक्त आपले असतात.त्यांना कवेत घेण्याचं काम आपलं असतं.सुख दु:खाचे कण क्षण पाठीवर घेऊन आपल्या वर आदळत असतात.

जगणं म्हणजे एक प्रणयच असतो हवाहवासा, नाही का? दु:ख असून ही सुखाच्या झुल्यावर झुलत ठेवणारा.आपला भुतकाळ आपण बदलू शकत नाही पण वर्तमानाला आपणं भिडवू शकतो.जिंकू ही शकतो.आपण भविष्यकाळ  सुंदर सुंदर स्वप्नांनी व संकल्पनानी सजवू शकतो.नटवू शकतो. सागराच्या किना-यावर नाही का आपण खोपे करतं?

एक लाट आली की सारं होत्याचं नव्हतं होतं. आपण पुन्हा खोपा करतोचं. राहवत नाही.थांबवत नाही.

काळाच्या लाटेत  ही सारं अथांगतेमध्ये मिसळणार असतं पण ते आपण करतचं असतो.करावं लागतं.दुसरं काय करणार ?

                आपल्या हातातच काय आहे?आपलं भविष्य सुंदर स्वप्नांनी सजवू शकतो आपण.सुंदर सुंदर संकल्प करू शकतो.आयुष्य सुंदर करण्याचा प्रयत्न करू शकतो.त्यासाठी प्राण पणाला लावू शकतो.स्वप्नांच्या झालरीनं हे आयुष्य आपण अधिकचं सुंदर करू शकतो. रंगवायचं हे आयुष्य रंगीबेरंगी स्वप्नांनी..संकल्पांनी.दृढनिशचयांनी आखून घ्यायची ही आयुष्याची पायवाट.

एकमेकांसाठी शुभेच्छांनी ओसंडून जायचं.तुटुंब भरून यायचं. एवढं तर नक्की आपण माणसं एकमेकांसाठी करू शकतो.

नवीन वर्षाच्या हार्दिक शुभेच्छा....नव्या स्वप्नासाठी...आपलं आयुष्य सुंदर सुंदर स्वप्नांनी व संकल्पांनी बहरून यावं.आंनदाचे डोह...आणि तृप्तीचा सागरात तुम्ही आकंठ डुंबत राहो हीच शुभेच्छा....!!



                                




    







       परशुराम सोंडगे


     ||Youtube||Blogger||

गुरुवार, ७ डिसेंबर, २०२३

भिमा,तू असा सूर्य आहेस .

 








भिमा 

तू,

एक असा सूर्य आहेस

की

मावळलास किती वर्ष झाले तरी

अजून ही तुझा तो प्रकाश 

तसाच आहे.

प्रखर होत गिळतोच आहे

अंधार...

 ती आग ....

अधिकचं तीव्र होतेयं.

युगानुयुगे

तू तसाच तेवत राहणार आहेस

कारण

अंधाराच्या गर्भातच पेरलीस 

तू

प्रकाशाची बीज.

ही पहा ना...

फुललेली असंख्य फुले प्रकशाची.

अंधार तर संपेलच ना आता

एक दिवस...

आमच्या जीवनातला

या जगातला.....

      परशुराम सोंडगे,बीड

.

सिर्फ देश नहीं, संविधान ही बदल रहा है...!!

  सिर्फ देश नहीं, संविधान ही बदल रहा है...!! सरकारला विचार नसतात.राजकीय पक्षांना विचार असतात. तशी विशिष्ट विचारांची सरकार चालवायला अजिबात गर...