बुधवार, १२ मे, २०२१

या देशात चाललं तरी काय?

 या देशात नेमक चाललं तरी काय?

***************************

स्वातंत्र्य त्यांनी मांडीखालीच

काय गांडीखाली

लपून ठेवलं.

नि

धर्मनिरपेक्षतेच्या मखमली

झुलीत ते लोकशाही

जातीवादाच्या उबीत

उबवीत बसलेत.

मग 

ते तांडेची तांडे  निघालेत

उरात जाती जातीची धग

पेटती ठेऊन....

द्वेवेषाच्या आवेशान

ओठाओठातून भंयकर ज्वाला फेकीत

एखादया दैत्यासारखी ....

स्वातंत्र्याचा सूर्य गिळायला

आणि  ...

मानवतेची ,समतेची छान छान फुलपाखर

कुठचं कशी दिसत नाहीत ?

भूर्र उडून गेलेत की 

का धारदार तीक्ष्ण हत्यारानं 

ठार केलेत त्यांनी ?

ठार केलेत म्हणावं 

तर

त्यांची प्रेत नाही दिसत इथं

कुठेचं.


समता व मानवतेचे

सुंदर सुंदर मुखवटे घालून 

समतेची गाणी तेच बिलिंदर

का गुणगुणत आहेत?

हातात रंग बेरंगी झेंडे घेऊन..?

जाती जातीची गाणी गात .

कुठं निघालेत ?


तिरंगा तर फडफडतो आहे

जोमानं....

सीमेवर लढता लढता छातीवर 

गोळया झेलता झेलता 

रक्तात न्हालेल्या जवानांच्या हातात

आणि ओठात 

जय हिंद चा नारा...

यां  देशात नेमक चाललं तरी काय ?

 . . . . . . . . . . परशुराम सोंडगे,पाटोदा

                      ९५२७४६०३५८

IMG 4469+copy

कोणत्याही टिप्पण्‍या नाहीत:

अर्धा कोयता’ – श्रमिकांच्या संघर्षाचा जिवंत दस्तऐवज

अर्धा कोयता’ – श्रमिकांच्या संघर्षाचा जिवंत दस्तऐवज अलकानंदा घुगे - आंधळे यां चा ' अर्धा कोयता ' हा कथासंग्रह नुकताचं वाचनात आला....

%E0%A4%85%E0%A4%B0%E0%A5%8D%E0%A4%A7%E0%A4%BE%20%E0%A4%95%E0%A5%8B%E0%A4%AF%E0%A4%A4%E0%A4%BE