सोमवार, १६ डिसेंबर, २०१९

तू
 माझ्यात खोल खोल
 रूतत गेलासं
पार तळाशी....
 मी
किती कष्टाने
नितळ केला होता.
 माझ्या मनाचा तळ...
मनातला साराचं गाळ
 उपसून काढायला
जमतं अस नाही.
मी
त्यावर अंथरली होती.
सजवली होती
सुंदर सुंदर....
अस्तर
 नि
 सा-या संवेदनाही
 सोलून,तासून,
रांधून केल्या होत्या
गुळगुळीत.
एकदम चकचकीत.
भावनां ही
 रंग दिले होते.
माझ शरीरच नाहीतर
मी अाख्खीच तुला अावडावी
म्हणून.... मी अधिकच स्वतः ला
पारदर्शक व सुंदर करत गेले.
उपटून काढाव्यात पापण्या रेखीव,
अाखीव दिसण्यासाठी
तशीच उपटली
मी
मनावर
 नुकतीच कोवळी कोवळी
अंकुरलेली
 नाती
नि
अगदी फ्रेश होऊन
तुझ्यासमोर
पेश केलं स्वतः ला.
तू नुसता ओरबडत
राहिलास माझं शरीर....
माझे अवयव.

माझ्या मनातले
 स्वप्न, भावना
 नि
साध्या संवेदना ही
 तुला का जाणवल्या
नसतील?
तू पुरूष आहेस
नि
मी एक स्त्री
नुसतं शरीरंच
स्त्री असत नाही
तर
ती अख्खीच असते ना?
स्त्रित्व तसच ठेऊन
सोलून काढता येईल का
माझं शरीर ?
नि तुला हवे हवे असलेले
माझे मादक अवयव?
असच कर
म्हणजे
तुझं ही सिध्द होईल
पुरूषत्व.
                 परशुराम  सोंडगे 'बीड 9527460358

कोणत्याही टिप्पण्‍या नाहीत:

सिर्फ देश नहीं, संविधान ही बदल रहा है...!!

  सिर्फ देश नहीं, संविधान ही बदल रहा है...!! सरकारला विचार नसतात.राजकीय पक्षांना विचार असतात. तशी विशिष्ट विचारांची सरकार चालवायला अजिबात गर...