सोमवार, १९ सप्टेंबर, २०२२

ह्रदय गुंतता हे (भाग 3)

 



तृप्ती हॉस्पीटलला पोहचली. रक्तदान ही केलं. खर तर तिला लगेच परत फिरायचं होतं पण थोडसं थकल्यासारखं वाटतं होतं. डॉक्टरंनी तिला अराम करायाला सांगितलं.तृप्तीला बराच वेळ तिथे बसावं लागणारं होतं. घर काही हाकेच्या जवळ असले तरी लगेच जाता येणार नव्हतं.श्रेया होतीच तिच्या सोबत. चहा, बिस्कीटं ही घेतले.शांत थोडी बेडवर पडली होती. बेडवर पडून भिरभिरणा-या फॅनकडं ती एक टक पहात होती.भीतीचं सावटं होतंच चेह-यावर. श्रेया आली.तिचंत हात हातात घेत बोलली,“तृप्ती, थँक्सं.तू आलीस.नाहीतर केवढं टेन्शन आलं होतं मला.” तृप्तीनं बोलण्यापेक्षा हासणं पंसत केलं.ती छानसं हासली

“नाही म्हणालीसं नि परत आली?” श्रेयाला  स्वत:चं झालेलं कन्फूजन दूर करायचं होतं. अजून एक वर्षं ही झालं नव्हतं तृप्तीच्या लन्नाला. एवढं का घाबरते ती निलेशला. आपल्याला लग्नाला दोन वर्ष झालं तरी विवेकची अशी भिती नाही वाटतं.

“आलेयं मी. न येणं मला आवडलं नसतं नि आलेलं निलेशला आवडणार नाही.”

“निलेशला बोलू का मी? तू चांगलचं काम केलं आहे. एका माणसाला जीवंत राहण्यासाठी मदत केलीस.”

“शपथ.  हे तू असं काही करणार नाहीस.” तृप्तीनं तिच्या तोंडाला हात लावला.


“एवढं काय घाबरतेस? नवरा तुझा तो.बागूलबुवा थोडा?”


“बागूल बुवा.. ?” ती उदास हासली. लहानपणी मम्मीची. मम्मी बागूल बुवाच्या गोष्टी सांगायची. बागुल बुवा आला. बागूलबुवा आला. बागुल बुवा आला म्हणून तिला भीती दाखवायची.पण तिनं कधी बागूल बुवा पाहिला नव्हता. कधी तिला बागुलबवा दिसला ही नाही.बागुलवुवाला ती फार घाबरायवी. बागूलबुवाचं कसलं अस्पष्टं चित्रं तिच्या डोळयासमोर तरळलं.

“नवरा आणि बागुल बुवा. श्रेया, असली कसली तुलना करतेस ग?” तृप्ती बोलली. श्रेया काही बोलणार तेवढयात. विवेक आला. श्रेयाला त्यानं बोलावलं. खूणेनच तृप्तीला आराम करायाला सांगितलं. तृप्ती शांत पडली होती. ज्यासाठी आपण रक्तदान केलंय त्याला हे माहीत तरी होऊ शकत का? आपण त्याच्यासाठी आलोत. त्याला कुणी सांगेल का ? आपण त्याच्यासाठी रक्त दान केलं. आपण त्याच्यासाठी आलेत की श्रेयासाठी? तृप्तीला हा प्रश्नं पडला. अश्या अनेक प्रश्नांची वलय तिच्या मनात उमटतं राहिली.

     आता इथं उठून जाऊन त्याला पाहून यावं का? तो शुध्दीवर असेल ना? आपण पहायाला गेल्यावर त्याची नरानजर तर होणार नाही ना? बावळटासारखं पहात नसता बसला तर आपल्याकडं तर कदाचित त्याचा हा ॲक्सीडंट झाला नसता.बिच्चारा… तो जगू शकला हे कमी नव्हतं.अर्थात तो कोण होता तिचा तरी त्यानं जगावं अशी तीव्र अपेक्षा केली.तिच्या समोरचं धन्वंतरीची मूर्ती होती. त्याला आत जोडले. खर तर तिला प्रार्थंना करायची होती.त्यानं जगावं.मरून नाही जावं म्हणून…. लवकर बरं करावं म्हणून.प्रार्थना कशी करायची हे मात्रं तिला सुचत नव्हते.

   त्याला जाऊन पहावां का?नुसतं पहायला काय हरकत? तो आपल्याकडं पाहू शकेल का? ती उठली. ज्या वार्डंमध्ये तो होता. त्या वार्डंजवळ ती गेली. काचातून पाहू लागली.अर्थात तो शुध्दीत नव्हता.मृत्युशी झुंज चालू होती त्याची. लाईफ सपोर्ट स्टीअमवर त्याचं ह्रदय धडधडत होतं. सहानुभूतीच्या लाटा मनात उसळून आल्या.ती नुसती एक टक पहात राहिली.तिचं डोळं पाणवलं.ती ओक्सी बोक्सी रडली नाही हे काही कमी नव्हतं. तेवढयात निलेशचा फोन आला. ती घाबरली.तिचं हात थरथरतं होते.

“हॅलो तृप्ती,बरीयस ना?”

“बरी? पण तू आता का फोन केलास?”

“का? तू कामात आहेस?”

“नाही .. नाही. मी कसली कामात आहे. लगेच फोन केलास म्हणून विचारलं?”

“तृप्ती,मला सॉरी म्हणायचं तुला?”

“असं का बोलतोस?मी कुणी परकीय का?”

“मला आज फार गिल्टी होतं. रात्री तुझ्या सोबत तसं नव्हतं वागयाला पाहिजे मी.”

“शेवटी बायको मी तुझी. तू नवराय माझा. नव-यानं असंचं वागायचं असतं बायकांशी.”

“तुझा राग अजून नाही गेला? सॉरी..मला माफ करं.मला वाटतं कान पकडून माफी मागयाची तुझी.” निलेश लापटासारख बोलत होता.

“आता हे काय काढलस नवीनच? काम कर. नाही तर तुझी ती खडूस बॉस.. झापेल तुला.मी घरीचं ना? कुठं जाणार का?”

“नाही. घरी येतोय.”

“ कान पकडून माफीच मागायची ना?  तू तू संध्याकाळी पण करू शकतोस ना? आताच घरी का यायला हवं?”

“आपण पिक्चर ला जाऊयात. मी तीनच्या शोची तिकटं बूक करतोय.”

“असं काय वेडयारखं करतोस? ममा नि पपा येतील ना? तू संडेला प्लॅन कर.”

“म्ममा नि पप्पा आज नाही येत. ते उदया बसतेत मुंबईवरून.तू आवरं? मी आलो.”


“असं कसं आवरू.?” तृप्तीला काहीचं कळतं नव्हतं. याचा आपल्यावर संशय तर नाही ना? आज हा असा कसा येऊ शकतो डायरेक्टं घरी. पण का? ती पुरती गोंधळून गेली होती. आता लवकर घरी पोहचायला हवं. निलेश ?घर पोहचायच्याअगोदर आपण पोहचू शकू ना? त्याला हे  कळायाला नको आपण इथ आलोत म्हणून.


“ निलेश ऐक ना?”


“काही ऐकत नाही मी आता. तू रेडी हो.” निलेशतिचं काहीच ऐकून घेत नव्हता. ती काही बोलणार होती पण त्यानं कॉल कट केला होता. काही वेळ ती नुसती हॅन्डसेट कडच पहात राहीली. जेव्हा ती चालु लागली. तेव्हातिच्याकडें एक माणूस नुसता टक लावून पहात होता. तो बराच वेळ तसचं पहात असावा. ती सावरली. साडी नीट केली. आपण जे फोनवर बोललोत  ते यानं ऐकलं तर नसेल ना? त्याच्याकडं पाहीलं तर ते बावळटं गालातल्या गालात हासतं होतं. ती वरमली. असाचं हॅन्डसेट त्याच्या नाकावर फेकून मारावा असं ही वाटलं. असं फक्त वाटलचं तिला तसं काही केल नाही. ती पदर अंगाला लपेटून तिथून हालली. त्या आंबट नजरेपासून वाचण्यासाठी ती दुसरं काय करू शकत होती? श्रेया धावत आली.


“तृप्ती थांब ना?” श्रेया बोलली. श्रेया झरा झरा चालतं तिच्याजवळ आली.


“प्लीज.. श्रेया नको. मला घरी जायला हवं.निलेश घरी येतोय.” श्रेया तिच्याकडं चालतं येत आसली तरी तृप्ती थांबली नाही. ती चालतच होती. श्रेयानचं शेवटी गाठलं तिला.


“एवढं काय घाबरतेस? जाशील ना? का मी बोलू त्याला इकडं?”


“ नको नको.. प्लीज असं काही करू नकोस.” तृप्तीच्या चेह-यावर उमटलेली भीती झाकली नाही.


“तो ऑफीसला गेलाय ना? मग दुपारींच कसा घरी येतोय?”


“आम्ही पिक्चरला जातोय.”


“क्काय? इतकं अचानक?”


“तो निलेश बाई. काही ऐकल तर?”


“ऐकावचं लागतं. नवरा कसा मुठीत ठेवायचा आसतों. माझ बघ. कसा शांत आहे. एक शब्दं मोडत नाही माझा. त्याला सांगून टाक माझा मूड नाही म्हणून.”


“नको.. नको.. त्यानं एकदा ठरवलेलं नाही रदद केलेलं त्याला नाही आवडणारं… निघते मी.” तृप्तीचं चित्तचं था-यावर नव्हतं.


“बरं विवेकला सोडायाला सांगू का?”



“नको नको. कशाला? जाते मी. रिक्षा भेटतील की मला लगेच” ती फास्टं चालत होती. चालणं नव्हतचं ते.. पळणं होतं.तिला धाप लागली होती. श्रेया नुसती पहातचं राहीली.तृप्तीचं काय चाललं हे तिला कुठं काय कळतं होतं? ती नाही म्हणून पुन्हा रक्तदाने करायाला आली. आता लगेच चालली. निलेशला इतकी का घाबरतेय. लग्नाच्य सुरूवातीच्या काही ‍ वर्षं नवरा कसा मुठीत राहतो. एकमेका विषयीचं प्रेम नि विश्वास या दिवसात वाढतो. तृप्तीच्य बाबतीत काही तरी वेगळं होतं. ती फारसं बोलत नाही.तिनं बोलायाला हवं. तिची घुसमटं होतोय एवढं नक्की. श्रेया विचारत करत बसली तो पर्यंत तृप्ती निघून ही गेली होती.


 


तृप्ती घरी पोहचली.तिचा जीव भांडयात पडला.अजून तरी निलेश घरी पोहचला नव्हता. घरात शिरली. तिच्या हातातला दम नव्हता. बरचसचं तिनं आवरलं. फ्रशे झाली. थकल्यासारखं वाटतं आसलं तरीमिला फ्रेश दिसायचं होतं. ती ड्रेसींग रूम मध्ये होती. आता काय घालाव? साडी का ड्रेस.. का जीन्सं व शर्टं घालावा? आजा आपण बाहेर जातोय. अधिकचं सुंदर नको दिसायला. अगदी तिला न आवडणारी  साडीनि  घातली.तिला फ्रेयादिसायचं आसलं जरी आस सुंदर दिसायचं नव्हतं. कशी बशी तयार होउन ती बसली. तेवढयात निलेश आला.


ती कृत्रीम हासली. नवरा घरात आल्यानंतर बायकोनं जेवढं हसावं अगदी तेवढचं हासली ती.तिच्या प्रत्योक हालचालीत कृत्रीमता होती. निलेशनं बॅग ठेवली. तिच्याकडं थोडा वेळ बघत बसला. अर्थात नखशिखान्तं. त्यानं थोडसं हासू ओठात उमटवलं.


“हे काय घातलेस?”


“साडी?”


“आता आसली साडी घालून तू बाहेर येणारेस?”


“हो.माझं संपूर्णं अग झाकू शकले मी.”


“बायको माझी तू. कामवाली नाहीस.”त्याच्या स्वरात त्रागा होता. असं वागून तृप्ती त्यचावर सूड घेत होती.


“कामवाली वाटतेय मी?”


“ तर ओरीजनलं कामवाली. तृप्ती, तुझा राग  नाही गेला अजून?”


“यात माझ्या रागाचा काय संबंध? तू तयार हो म्हणालास? मी तयार झाले?”


“असचं बाहेर येणारेस? आपण पिक्चरला जातोय.. भाजीमंडीत नाही.”


“ही साडी बरी नाही वाटतं?”


“असं का करतेस?”


“कुठं काय करते? जाऊयात की मी? आय ॲम रेडी.”त्याच्या गळयात लाडानं मीठी मारत ती बोलली.


“तृप्ती, आता माझा मूड घालवणारेस का तू? चेंज कर प्लीज.”


“नाही. आता बाहेर जाताना असचं जायचं.मी बाहेर जाताना कशाला अधिक सुंदर दिसायाला हवी? जास्तं नटून गेले. कुणी माझ्याकडं पाहीलं की तुला…..”


“तृप्ती,सॉरी. सॉरी… !” त्यानं लगेच कान पकडलं. उठबश्या काढू लागला.


“निलेश काय हे?माझ्याकडं कुणी पाहीलं की तुला राग येतो.”


“आता तरी माफ करशील ना?” तृप्तीनं त्याचं हात पकडले. त्याला तशीचं बिलगली. त्यानं तिला मीठीत घेतलं.


“बायको तुझी मी.बाहेर जाताना कशाला सुंदर दिसायाला हवी.हवी तर बेड रूम मध्ये नटत जाईल.”


त्यांन तिचं तोंड हातानं बंद केलं.


“बेडरूम मध्ये कुठं कपडयाची गरज असते?”


“गप चावट कुठला?”तिनं त्याच्या दंडावर लाडानं दोन चापटा मारल्या.


“फक्त बायको नाही माझी तू.. मेरी जान .. मेरा प्यार…” हे शब्द वापरतानी त्यानीं ओठांची वापर केला.तिला कपाटाकडे घेऊन गेला. जीन्सं..नि शर्टं तिच्या हातात दिला.


“आता हे घालू? तुझं डोकं तर फिरलं नाही ना? आता मी काय कॉलेजला थोडीचं.लग्न झालं माझं. नव-याची बायको मी.”


“ बायको नाही. गर्लंफ्रेंड माझी तू.गर्लंफ्रेंड थोडयाचं साडीत असतात?”


“असं कपडे घालून गेल्यावर.. लोक नुसतं पहात बसतात..”


“पाहू दे. आहेसचं तशी…”


“कशी?” तिचा हा प्रश्नं  फार स्फोटक होता. शब्दापेक्षातिची अदा भयानक होती.निलेशला थोपवणं तिला ही शक्यं झालं नाही. तृप्ती तरी कुठं स्वत:ला कंट्रोलं करू शकली. ते कपडे घालून ती तयार झाली होती.निलेश पहातचं राहीला. तृप्ती आता बायको नव्हती तर त्याची गर्लफ्रेंड झाली होती.


गाडी चालू करून ते निघाले.


“असं सारखं सारखं माझ्याकडं पाहू नकोस बावळटासारखं?”


“का?


“आता माझी मम्मी नाही इथे. मग माझी दृष्टं कोण काढेल?”


“मी आहे ना?”


“आता बायकोची दृष्टं काढणार?”


“बायकोची नाही.माझ्या गर्लफ्रेंडची…. “ गाडी चालवत असल्यामुळे तो फक्त बोलू शकला. ती फक्त मधाळ हसु शकली.


 (पुढील भाग लवकरचं)


कोणत्याही टिप्पण्‍या नाहीत:

सिर्फ देश नहीं, संविधान ही बदल रहा है...!!

  सिर्फ देश नहीं, संविधान ही बदल रहा है...!! सरकारला विचार नसतात.राजकीय पक्षांना विचार असतात. तशी विशिष्ट विचारांची सरकार चालवायला अजिबात गर...