रविवार, ११ सप्टेंबर, २०२२

गुंतता ह्रदय हे (भाग2)

 



तृप्ती जरी निलेशच्या मिठीत आसली तरी तिच्या मनात मात्रं त्याचेचं विचार येत होते.खरतरं ती त्याला बोलली पण नव्हती.कोण होता तो?कुठं राहतो तो? त्याचं नाव काय? तिला काहीचं माहित नव्हतं. माहित असण्याचं कारण ही नव्हतं. ती त्याला पहील्यांदाचं पहात होती. त्याचं नाव काय असू शकेल? याचा अंदाज ती बांधू लागली. खरतर तसा अंदाज काढणं शक्य नसतं पण त्याचं काय नाव असावं अशी कल्पनाच ती करू लागली.अश्या आकर्षंक मुलांची काय नाव असतात? तिला अनेक नावं आठवू लागली.अर्थात अश्या आकर्षंक पोरांचीच.तिला इंम्प्रेस केलेल्या पोरांची. ती तिची आवडती नावं त्याला चिकटवून पाहू लागली.


         तो तिच्याकडं आकर्षीत झालाय.हे तिच्या ही लक्षात आलं होतं.ती पण त्याच्याकडं खेचली जात होती. हे सारं नकळतच होतं होतं. आपलं मन सारं बंधनं तोडून त्याच्या कडं ओढलं जातं हे तिला ही कळतं होतं.तिचं वागणं ही सादास प्रतिसाद देणं असचं होतं. शाळेत असतानी अश्या प्रकाराला मुलं मुली लाईन मारणे म्हणायचे.तो लाईन मारत होता नि ती त्याला लाईन देत होती.लाईन क्लेअर झाल्यावर तो बेफीकर वागणं साहजिकचं होतं.त्याचं धाडसं वाढलं होतं नि हिचं काळीज थरथरतं होतं. काळीज थरथरणारचं ना? निलेश तिच्या नवरा तिच्या सोबतचं होता.आपला नवरा सोबत असता अश्या परक्या पुरूषांकडे पहाणं सोपी गोष्टं नसते.कोणत्या ही क्षणी तिच्या संसाराच्या चिंधाडया होऊ शकतं होत्या.मन थरथरतं असलं तरी त्याच्याडं पहाणं रोखता येतं नव्हत.नजरेला पण चटक लागतं असेल? नुसतं रोखून पाहणं ही किती रोंमाटीक असतं,नाही?


         त्याचं लग्न झालं असेल का? आपल्याला जसा नवरा आहे तशी त्याला बायको असेल का? जर बायको असेल तर ती कशी असेल? तिचं मन त्याच्या बायकोची कल्पना चित्रं गोळा करू लागलं.कल्पनेत उमटलेली चित्रं नि स्वत:ची तुलना तिचं मन करू लागलं. त्याची बायको नेमकी कशी असेल? चैत्राली सारखी. प्रणाली सारखी..?अनेक सुंदर सुंदर मुलींची नावं तिला आठवू लागली. कदाचित आपल्या सारखी तर नसेल ना?मन आकाशासारख असतं.आकाशात नाही का? ढगांचे आकार कशाचे ही नि कसे ही होतात. तसचं झालं हे. आपण त्याची बायको असतो तर हा प्रश्नं मनात उमटला. तशी ती दचकली.


              असं मनात काही बाही नको यायला. असला अभद्रं विचार आपण कसा काय करू शकतो? हा पण एक प्रकारचा व्याभिचारच आहे ना? कायीक व्याभिचार.. वाचीक व्याभिचार.. मानसिक व्याभिचार… व्याभिचाराचे असे काही प्रकार असतील का? असतील का नाही तिला माहीत नव्हतं पण तिनं तसे प्रकार केले होते.पुराणातल्या अश्या व्याभिचाराच्या कथा तिला आठवू लागल्या.कर्णं आणि द्रौपदी…शाप, उ:शाप… कसले भंयकर शाप असत पूर्वी. निलेशनं असा काही शाप दिला तर? तो देऊ शकेल शाप…? पश्चातापचा तवंग मनाच्या पृष्ठभागावर पसरत गेला.तिनं निलेशच्या डोळयात पाहिलं. निलेश तिच्याच डोळयात पहातचं होता.भरकटलेलं मन डोळं नाही लपवू शकत.


“तृप्ती लक्षं कुठं तुझं?” तिच्या चेह-याला अलगद स्पर्श करत निलेश बोलला.


“माझं लक्षं? तुझ्या डोळयात पण तुझं कुठं?” ती भानावर आली. मनातलं भलतं सलतं दाटलेलं तिनं झटकून दिलं.मनाचा तळ अगदीचं निथळं केला.ती स्वच्छं हासली.इतकं पुरेस नव्हतं म्हणून की काय तिनं ओठांनी  ही वापरलं.त्याच्या छातीवर ओठ ठेकवत त्याच्या डोळयात पहात राहिली. डोळयातून थोडचं मनात काय चाललं हे दिसू शकत? त्यासाठी शब्द तिनं मदतीला घेतले.घ्यावाच लागले.


“तुझ्याकडंचं.”तिचं केस विस्कटतं तो तिच्या नजरेत नजर घुसवत राहिला.काही क्षंणच.


“असं काय पहातोस? असं काय नवीन आहे माझ्यात?”


“सॉरी.ते नाही सांगता येणार मला.सारे रोजचेचं तरी नाव्याचा भास हा.”त्यानं मनातलं नि ओठातलं आलेलं बरचसं चोरलं. काही शब्द पण दुदैवीच असतात.ते असेचं मनातली मनात विरून जातात.


“खोटं.. सारं खोटं.”तिनं लटक्या रागाचं रंग  चेह-यावर पांगवला.


“खोटं नाही बोलू शकत मी,माहितीयं ना तुला?”


“मग असं का वागलास माझ्या बरूबर.संशय तुझा माझ्यावर?” त्याच्या डोळयात आरपार पहात ती बोलली.


“तसं नाही ग.तुझं वागणं सहजच होतं पण त्यानं कसा अर्थ काढला.वेडपट असतात पुरूष.असली थिल्लर पोरं तर फारचं विचित्र असतात."


"तू नाही विचित्र?"


"मी तुला विचित्र वाटतो?"


"तुझं पहाणं पण सभ्य नाही ,बरं"


"तुझ्याकडं सभ्यपणानं पाहू मी? मी नवरा तुझा...?"


"माझा नवरा होण्याच्या अगोदर...तुझं पहाणं..."


"तू आपल्या जाम आवडली होती.तुझ्या साठी काही पण.." तिला आपल्या अंगावर जोरात खेचतं तो बोलला.


"का?जाम आवडण्या सारखं काय आहे माझ्यात?"


"ते नाही सांगता येणार." तो तिला बिनधास्तपणे मनातलं सांगू शकला नाही.त्यानं मनातलं बरचसं चोरलं.


"खरं खर सांग.मी बायको तुझी.मला कसला संकोचतो."


"शट अप.तू फक्त माझीस...आणि माझीच आहे." आपल्या छातीशी  तिला अधिक कवटाळतं तो बोलला.


"मी दुस-याची बायको असते तर?"


"असं का बोलतेस?तू माझी बायकोस."


"समजा....असते तर तू काय केल असतं?" तृप्ती खर तर त्याला गुगली टाकली होती.तिचं बोलणं त्याला कळलं नाही.निले चं काय कोणत्याचं पुरूषाला रोंमाटिक मूड मध्ये भान उरतं नाही.


"काही ही....."


“बरोबर बोललास.कारण तू पण एक पुरूषचं आहेस ना?”


"मग"


"पुरूष मेले सारे सारखेचं...कुणी स्री दिसली लगेच....लाळघोटायला सुरू करतात."


“पण मी थोडा तसा.”


"निलेश, तुझ्या पण फार तक्रारीत माझ्या मैत्रिणीच्या.."


"कसल्या?"


"आवर बाई दाजीला...नुसतं थोबाडाकडं पहात असतात."


"कोण आहेत ग त्या...रांडा..?"


"निलेश, असं चिडू नको.त्या माझ्या मैत्रिणी आहेत. त्या रांडा नाहीत. त्या सालस..सोज्वळ आहेत  म्हणून तर मला सांगितलं ना त्यांनी."


"रांडा नाहीत ना?मग असा काही ही आरोप कश्या काय करू शकतात त्या? मी थोडाचं तसा?"


“कसा? आहेस मग?”


“त्या बावळटासारखा… कसलं पागलं होता तो. सारखं तुझा कडचं पहात होता.”


“तो पहात होता मग मी काय करू? अश्या बावळट पुरूषाची कमी नाही या जगात.” तृप्तीनं त्याच्या पोटावर चिमटा काढत बोलली.


“अश्या ठिकाणी आपण होऊनचं काही मर्यादा घालायला हव्यात.काही पथ्यं पाळायला हवेत.लोक फार विचित्रं असतात ग.”


“कसली पथ्यं?मला थोडाच डायबेस्टीक.?” तिनं उगीचं फालतू कोटी केली.थोडसं हासून त्याला रिलॅक्सं करायचं असावं तिला किंवा तो अधिकचा चिडू नाही म्हणून असेल कदाचित.


“डायबेस्टीक नाही ग पण?”

“पण काय?”

“तू सुंदरेस...तरूणेस... अधिकचं नटलीस की बिच्चारे...किती जण तरी पागल होऊ शकतात?"
"कुणी पागल झालं तरी....मी नाही ना पागल?खानदानी रक्त माझं." आपल्या चारित्र्याचा संबंध लोक खानदानाशी जुळतात. पवित्र असण्याचा तो एक पुरावा असतो.
"खानदानी...!! मग का ते पागल  झालं होतं?"

“असचं बोलणारेस का तू? कसला घाणरेडा आरोप करतोस माझ्यावर.शपथ. कसं सांगू तुला? या अगोदर नाही पाहिलं मी कधीचं त्याला.तो पहात होता माझ्याकडं, मी नाही?आपल्याकडं कुणी पहात असल्यावर.. आपण काय करू शकतो?कसलं प्रायचित्त घेऊ मी?”


“कसलं चिडतेस ग? मी कुठं काय म्हणालो आहे.”


“निलेश तू असं काही भी बोलू शकत नाहीस बंर.”

“इटस्‍ नॅचरल. जसा तुझा दोष नाही. तसाचं त्याचा तरी काय दोष? तो तरी काय करणार बिचारा… आहेसचं तशी तू.”

“कशी मी?”

“तू सुंदर नि व्हॉटं.सेक्सी.आज तर कमाल केली होतीस.एकदम जबरदस्तं दिसत होती. त्या बावळटाचं काय घेऊन बसलीस. सारेच तुझ्याकडं पहात होते.कुणी तुझ्याकडं तसं पाहिणलं की नाही सहन होत मला.”


“का?”


“का म्हणजे बायको तू माझी.”


“हो,मी तर विसरलेच होते.मी तुझी बायको आहे नि तु माझा नवरा.नव-यानं बायकोला मारायचचं असतं. शिव्या घालायच्या असतात. वेडीचं मी. बायको म्हणजे फक्त बायको असते. ती थोडीचं नव-याची प्रेयशी,गर्लफ्रेंड होऊ शकते. ती असते एक गुलाम.नवरा असतो तिचा मालक.मालक गुलामचं नातं असतं नवरा आणि बायकोचं.ङ मी वेडी प्रेम,मैत्री,प्यारं.. इश्कं असं काही नसतचं मुळी नवरा बायकोमध्ये.”


“असं का बोलतेस?^


“खरं तेच बोलतेय. लग्न झालयं आपलं. हे मगंळ सूत्रं घातलं माझ्या गळयात. तुझ्या नावाचं हे लायन्सं आहे ना? तू मला हवं तसं वापरू शकतो.वाटेलं ते बोलू शकतो.माणसाचं शरीर असतं बायकांना. त्यांना मन थोडचं असतं. उपभोग्य वस्तूना मन असून तरी काय उपयोग?”


“तृप्ती  काय लावलं हे?”


“सॉरी. पुन्हा नाही बोलणार मी.आता कळलं मला.फक्त बायको मी?” त्याच्या छातीवर एक करकचून चिमटा घेत व  राग चेह-यावर पांगवत ती बोलली.

“सॉरी…!! फक्त बायको नाही. तू तर जान है माझी… माय लव्हं.. पिसेंस ऑफ माय हर्टं..” असले शब्द माणूस कृती शिवाय थोडचं उच्चारू शकतो? श्वासात श्वास मिसळत गेले.


“तू फक्त माझी आणि माझीच आहेस. दुस-याची नाही होऊ शकत.”


“मी तुझीच आहे रे पण तू?”


“तू संशय घेतोस माझ्यावर.”


“मी नाही. तू ?” त्याचे उचकटलेलं ओठ हातानचं बंद केले.खोल डोळयात पहात ती बोलली.


“संशय नव-यानं बायकोवर घ्यायाच असतो.मी थोडीचं तुझा नवरा आहे?” ती गंभीर होती. त्यानं आपली मिठी अधिकचं घटं केली.


“माय लव्हं. ..माय हर्टं…” तृप्तीला पुढचं त्यानं बोलूच दिलं नाही.त्यानं ओठांनी तिचं ओठं बंद केलं होतं. पहाटेची चांदणी नुकतीचं उगवून आली होती. पारिजातक सांडत होता. गंध दरवळत होता.


 


कोवळं उन्हं आत आलं.निलेश अजून ही शांत झोपलेला होता.तृप्ती उठली होती. तिची अंघोळ पण झाली होती. त्याला उठावं का? त्याला उठावं तर लागेलचं. ऑफीसाला जायला उशीर होईल त्याला. उशीर झाला की पुन्हा चिडंचिड होईल.सांशयाचं विषाणू माणसाच्य मेंदूत शिरले की माणूस हैवान बनतो.रात्री त्यांन मारलं. निलेश इतकं क्रूरं वागू शकतो? आता त्याचा राग सारा निवळला. हे तिनं अनुभवलचं होतं.पण संशयाचं काय?


                    आता तिला विचार करत बसायाला वेळ नव्हता. सारं आवरायचं होतं. निलेशला उठवलं. ती अधिक प्रेमानं वागतं होती. त्याचं सारं आवरलं. त्याला ऑफीसला ही  पाठवलं. ते पण हासत हासतं.खर तर ते हसू नव्हतचं.तो हासण्याचा रंग फासून घेतला होता चेह-यावर. रात्री त्यानं मारलेलं तिला विसरता आलं नव्हतं. आज ऑफीसाला जाताना ही त्यानं एकांताचा पुरे पूर फायदा घेतला होता. अंघोळ करून ती खिडकीत उभी राहीली. ओले केसं… टॉवेलानं सुकवत उभी होती. ती रस्ता पाहू शकत होती. रस्ते वाहत होते. वाहनं धावत होती. शाळाकरी मुलं मुली हासतं हुंदडत जात होती.माणसं आपण होउनच गतीची सक्ती करून घेतात. हे सारं पहात असातना तिला तो आठवला. खरचं तो जगू शकला असेल?


तर्कं विर्तंकच्या चरख्यात तिचं मनं बराचं वेळं पिंळवटून निघालं होतं. तेवढयात तिचा फोन वाजला.


श्रेया होती. श्रोयानं इतक्या सकाळी का फोन केला असेल? फोन रिसीव्हं केला. श्रेया लगेच सुरू झाली.


“गुड मॉनिंग.. तृप्ती.”


“गुड मॉर्नींग सेम टू. इतक्या सकाळी फोन?”


“आवरलं तुझं सारं?”


“आवरलं. तूझं? आज ऑफीसाला नाही जात का?”


“नाही ग. आज रजा माझी. मी ॲपेक्स हॉस्पीटल मधून बोलतेय.”


“ हॉस्पीटल मधून? काय झाल तुला?”


“ मला काय धाडं भरलीय. अग तुला माहित का? काल लग्नात एक ॲक्सीडेंट झाला होता.”


“हो आम्ही घरी निघालो होतो तेव्हाचं झाला होता.आमच्या समोरचं झाला होता.”


“ज्याला धडक बसली तो माझा आते भाऊ. फारं सिरीअसं.”


“का? विवेकच्या जवळाचा का कुणी?”


“जवळचा म्हणून काय विचारतेस. माझ्या आत्याचा मुलगा तो.सख्खा आतेभाऊ तो.”


“मला नव्हत माहित तो तुझा आतेभाऊ म्हणूनं.”


“तू ओळखतेस त्याला.?”


“नाही ग.ओळखत नाही मी पण तो अपघात झाला तेंव्हा आम्ही तिथेच होतो.”


“येतेस हॉस्पीटला?”


“हॉस्पीटला?”


“तुझा ब्ल्डं ग्रुप AB आहे ना?”


“तुला कसं माहिगत?”


“अग ब्लडं बँकेत तुझं नाव. वाचलं मी. बल्डं बँकेत AB रक्तगटाचं रक्त शिल्ल्क नाही. येतेस?”


“अग एकटीचं मी घरी. निलेश ऑफीसला गेलाय.”


“विवेकला पाठवू का?”


“नको नको. त्याला कशाला पाठवतेस?”


“मग कशी येतेस?” श्रेयानं  तृप्तीला गृहीत धरलं होतं. श्रेयाचं काही चूक ही नव्हती. अश्या कामाज तृप्ती पुढेच असे.


“पेंशट शुध्दीवर आहे ना?” तृप्तीनं काळजीच्या स्वरात विचारलं.


“नाही ना? ब्लडीगं झालं. इर्मजन्सी ऑपरेशन करायचं. त्यच्या शरीरात पुरेसं रक्त नाही. ब्लडं बँकेत पण ते उपलब्ध नाही. प्लीज तू येना.तुला काही प्रॉब्लेम का?”


“मला कशाचा प्रॉब्लेम?”


“मग येना?


“निलेश घरी नाही. त्याला विचारावा लागेल.”


“मग विचार ना? का त्याला विचारयाला काय मुहूर्त पहातेस काय?” श्रेया घाबरली होती. तृप्तीचा रक्तगट हा AB+ तिला माहीत होतं. तृप्तीला ती आग्रह करण साहजिकचं होतं. त्या कॉलेजला एकत्रंच शिकत होत्या. राष्ट्रीय सेवा योजनेत ही त्या सहभागी असतं. रक्तदान शिबीरातून त्या रक्तदान ही करत असतं. तृप्ती  सामाजिक कार्यात कायम सहभागी असे. तत्परतेन ती मदत ही करत असते.


“दुसरं कुणीचं नाही का?


“दुसरे असतील ही पण तू नाही येऊ शकणार का? हे हॉस्पीटलं तुझ्या घरापासून जवळचं आहे ना?”


“जवळचं आहे पण? “ तृप्ती खरं तर श्रोयाला सांगू शकत नव्हती. कसं सांगणारं होती.  आपण असं रक्त दान केलं हे जर निलेशला कळलं तर? तो टोकाचा निणर्यं घेऊ शकतो.


“आता कशाला पण निबिणं… म्हणतेस. तृप्ती तो माझा सख्खा भाऊ.  निलेशला काय एवढं घाबरतेस? तो थोडाचं अश्या कामाला नाही म्हणार आहे.”


“तसं नाही ग.त्याला मी रक्तदान केलेलं आवडत नाही.”


“ असं कसं? त्याला आवडत नाही?”


“ का म्हणजे बायको त्याची मी. आजरी पडले बिडले तर?”


“ तृप्ती तू असं वेडयासारख काय बोलतेस? रक्तदान केल्यावर थोडचं असं काही होतं असात? तुझा दुसरा काही प्रॉब्लेम का?”


“खरचं निलेशला आवडत नाही. तुला माहीत तो कसा रागीटं. त्याच्या मनाविरूध एखादी गोष्टं झाली  तर नाही सहन होत त्याला.”श्रोयाला हे कळत नव्हतं. तृप्ती असं का बोलतेय.बायकोनं रक्तदानं केलं जर त्याला गर्व वाटावं असं कसं आवडत नाही. तृप्तीच्य मनात प्रंचड मोठ वादळ उठलं होतं.तो मृत्यूशी झुजतो आहे. आपण कदाचित रक्त दिलं तर तो जगू शकतो. कुणाचं मरण टाळण्या पेक्षा दुसरी गोष्टं कोणती असू शकते?


“तृप्ती,आदित्यं मृत्यूशी झुंजतो आहे. त्याला जींवत राहण्यासाठी तू मदत करू शकतेस.मी त्याची बहीण  असून ही करू शकत नाहीं. बघ निलेशला विचारून.”


“सॉरी, श्रेया… निलेशला नाही आवडणारं ते. त्याला तर नाहीचं प्लीज, तू दुसरं कुणी तरी शोध. मला माफ कर.” तृप्ती ठाम होती.


“त्याचा दुश्मन का तो?निलेशची नि त्याची ओळाख का?”


”अर्थात तसं काही नाही पण त्याला ते नाही आवडणारं हे नक्की.”


“ जशी तुझी मर्जी.. “ श्रेयानं रागा रागानचं फोन ठेवला.


               तृप्ती तशीच भिंतींला उभी राहिली काय करावं हेचं कळतं नव्हतं. रक्तदान केलं तर तो जगेल. दुसरं कुणाचं रक्त ही मिळेल पण आपण त्याला जीवंत राहण्यासाठी मदत करू शकत नाही. लग्नाची बंधनं स्वांतंत्रं हीरावून घेतात. असली सारी बंधनचं आपण तोडून टाकावीत का? आपल्याकडचं लक्ष होतं त्याचं म्हणूनचं तो पडलाय. त्याचं प्रेम खरं असेलं खोटं असेल.तो आपला कुणी नसला तरी माणूस म्हणून त्याला मदत करायला हवी.निलेशला जर हे कळलं तर? तो घरात नाही ठेवणारं.आपला संसार मोडणारं हे ही नक्की होतं.दहा मिनीटानंतर ती उठली.श्रेयाला कॉल लावला.


“ श्रेया,मी हॉस्पीटल येतेयं.”


“ निलेशनं परवानगी दिली तुला?” श्रेयाचा आंनद शब्दांत मावत नव्हता.


“ नाही. त्याला हे कळायाला ही नको.मी निघाले.” तृप्तीनं फोन ठेवला. श्रेया नुसती फोन कडचं पहात राहिली. तृप्ती अशी का वागते? नक्की ती आज नार्मल नाही.


(पुढील भाग लवकरचं)


 


कोणत्याही टिप्पण्‍या नाहीत:

सिर्फ देश नहीं, संविधान ही बदल रहा है...!!

  सिर्फ देश नहीं, संविधान ही बदल रहा है...!! सरकारला विचार नसतात.राजकीय पक्षांना विचार असतात. तशी विशिष्ट विचारांची सरकार चालवायला अजिबात गर...