गुरुवार, ७ डिसेंबर, २०२३

भिमा,तू असा सूर्य आहेस .

 








भिमा 

तू,

एक असा सूर्य आहेस

की

मावळलास किती वर्ष झाले तरी

अजून ही तुझा तो प्रकाश 

तसाच आहे.

प्रखर होत गिळतोच आहे

अंधार...

 ती आग ....

अधिकचं तीव्र होतेयं.

युगानुयुगे

तू तसाच तेवत राहणार आहेस

कारण

अंधाराच्या गर्भातच पेरलीस 

तू

प्रकाशाची बीज.

ही पहा ना...

फुललेली असंख्य फुले प्रकशाची.

अंधार तर संपेलच ना आता

एक दिवस...

आमच्या जीवनातला

या जगातला.....

      परशुराम सोंडगे,बीड

.

सोमवार, २ ऑक्टोबर, २०२३

बापू..!!! तू काही मरत नाहीस.

 तू

या देशाचा राष्ट्रपिता

पण

एखादया जातीच्या झुंडीला,

एखादया धर्माच्या टोळीला,

एखादया वर्णाच्या कळपा


ला,

एखादया मुलखाला

तूर्त तरी

फक्त त्यांचा

वाटत नाहीस.

म्हणून तर 

तू 

या संपूर्ण देशाचा

आहेस.

तुझ्यावर त्यांनी गोळ्या झाडल्या

पण


तू 

ठार नाही झालास,

वेडे कुठले.....!!

तू माणूस

नाहीतर विचार आहेस.

हे तर अजूनही

कळतं नाही त्यांना.

तू 

मात्र इथं

मातीच्या कणाकणात

मनात मनात रूजत

गेलास.

म्हणून त्यांनी तुझ्या

मारेक-याचे गौरव सुरू केले.

आणि पोवाडे लिहिले.

तुला रोज मारण्याचा चंग बांधला आहे त्यांनी

पण

तू अशानं काही मरत नाहीस.

तू 

अजून ही अमर होतो आहेस.

छाताडं किती ही 

इंचाची असू दे.

ते फुटूस्तोवर 

फुगू दे.

पण

सदैव या जगात हा देश

गांधीचा आहे

नि

गांधीचाच राहणार आहे.

आणि

तू अमरचं....!!!

   परशुराम सोंडगे,पाटोदा



रविवार, ६ ऑगस्ट, २०२३

मैत्र जीवाचे- विणवूया धागे धागे



 माणसाच्या आयुष्यात मैत्रीला फार महत्व असतं.वंशाच्या,कुळाच्या,गावा -शिवाच्या,रक्ताच्या,नात्यापेक्षा ही मैत्रीचं नातं फार महत्वाचं असतं.ऐश्वर्य आणि दारिद्रय, सौंदर्य-कुरूपता, बुध्दी आणि मंद बुध्दी,जाती-पाती,धर्म ,देश- परदेश ,वय  लिंग वगैरे हे असले कृत्रिम भेद झुगारून ख-या  मैत्रीचे धागे अधिक घट्ट होत जातात.हया भेदाच्या सीमा मैत्रीला अडवू नाही शकतं.

मैत्रीचे धागे आपल्या मतलबाच्या चिकट लगदाळीने  गुंफणारी माणसं ही कमी नसतात.अगदीच नाही असे नाही.ह्रदयातून निखळ मैत्रीचे झरे ही खळखळत असतातच की.

आपल्या स्वार्थासाठी माणसं वापरण्याची वेगळीच पंरपरा हल्ली  समाजात निर्माण झाली आहे.मैत्रीच्या बेगडात स्वार्थाचा चेहरा दडवणारे माणसं  ही कमी नाहीत.मैत्री ही  एखादा व्यवहार नसते. ती कुठे हिशोब ठेवते?

निखळ,जीवापाड मैत्र जपणारं कुणीतरी असावे असं सर्वांनाचं वाटतं असतं.तशी आपली सर्वांची एक फॅंटन्सी ही असतेच की.

मैत्र जीवाचे शोधत आपण जगत असतो. जगभर वणवण भटकत असतो. ज्याच्या जवळ आपलं ह्रदय उलगडून दाखवावं अशी माणसं कमी भेटतात.ते विरळचं असतात.

जे भेटले ते प्रामाणिक असतातचं असं नाही.अनेकदा ह्रदय ज्याच्या जवळ उलगडले. त्यांनीच ते वेशीला टांगले. असे ही अनुभव असतात.

आपण ही कुणाचं जीवाच जीवलग असावं असं ही वाटतं की माणसाला. कुणाला आपण जीवलग वाटतं असलो तर ते मैत्र ही आपल्याला जपता आलं पाहिजे. 

 बाॅयफ्रेंड, गर्लफ्रेंड अश्या मैत्रीच्या नवीन फ्रेम तयार झालेल्या आहेत.त्या चौकटीत ही अनेक मैत्री जुळतात.बहरतात ही...तुटतात.विखुरतात.निखळ मैत्रीची सर्वांची मागणी असते.स्त्री-पुरुष हे भेद विसरून मैत्र जपणं तितकसं सोप ही नसतं.ते जपलं जाऊ शकतं.जपतात ही काही लोक.

     आयुष्यात अनेक मित्र भेटले.ते जपले ही अनेक.जीवाचे मित्र काही शत्रू ही झाले.  काही दशकांपूर्वी  मैत्रीचे धागे गुंफले गेले ते अजून ही वरचेवर घट्ट होत आहेत.खांदयावर डोकं ठेऊन रडू शकेल अशी अनेक जीवलग आहेत माझ्या आयुष्यात. ह्रदयात उगाळून लागावं त्यांना असे अधिकार आहेत माझ्यावर त्यांचे.अजून ही माणसं भेटतात. सारेच मित्र नाही होतं.सूर जुळून मैत्रीच गाणं  ही जुळत अधुन मधुन. हे सारं चालूं राहील.सुख-दु:खाचं देणं घेणं सुरूचं राहिलं.त्या शिवाय मैत्री कसं जपलं जाईलं?

आज आठवतात ते मित्र.जे या काळाने कायमचे हिरावून नेलेत माझ्यापासून. डाव मोडलेत अर्ध्यावर त्यांचे.

माझ्या आठवणींच्या झुल्यावर त्यांना झुलतं कायम ठेवले नियतीने.

काही मित्र दूर गेलेत.भेटू पुन्हा...म्हणून जे गेले ते अजून ही भेटत नाहीतं.त्यांच्या भेटण्याची मनी आसं आहे. त्यांचा शोध सुरू आहे. अजून ही ते भेटतं नाहीत?

माणसाच्या ह्रदयावर मैत्रीचा असा काही शिलालेख कोरला जातो असेल का? जो दशकोनोदशके पुसला जात नाही. 

आज दिवसभर आठवतोय माझा एक मित्र.सोनवणे सुधांशू... जीवाचा जीवलग.तीन दशकांपूर्वी बीड मध्ये पाॅलटेक्निकला असताना भेटला होता. आता कुठं तो ? सध्या काय करतोय? कसं चाललेलं असेल त्याचं मला काहीच माहिती नाही.



माझं मज्जेत चाललंय हे त्याला सांगायचं एकदा पण मी त्याला कसं सांगू? आता तो भेटतं नाही.माझ्या दु:खाची,माझ्या संघर्षाची व दारिद्रयाशी मी देत असलेल्या झुंजीची त्याला जाणीव होती. त्याच्या डोळ्यात मला माझ्याविषयीचा एक आपुलकीचा कणव होता. तो कणव मला पुसून टाकायच्या त्याच्या डोळयातला‌.कसा पुसू? तो भेटतचं नाहीये.

सुधांशू, मी आता मज्जेत आहे यार.तुला माझ्या चेह-यावर हसू पाहायचं आहे ना? मग ये ना.बघ, मी हसतो चक्क मज्जेत..!!!

आज मैत्री दिनांच्या निमित्ताने आठवणी ताज्या झाल्या आहेत. अनेकांना 

भेटावसं वाटतंं पण भेटतं नाहीत काही जीवलग...

आपल्या गुणदोषा सहित आपला स्विकार ज्याच्या ह्रदयात सुरू आहे‌ ना? तो आपला सच्चा मित्र असतो. 

बाकी आपल्या ह्रदयाचं खेळणं करणारे, बाजार भरवणारी कमी नाहीत या जगात.मैत्र जीवांचे... सापडत नसतात.त्याचे धागे असतात.ते गुंफावे लागतात.

                                   

               परशुराम सोंडगे, बीड

शुक्रवार, ४ ऑगस्ट, २०२३

निसर्गाचं वेड पेरणारा कवी-ना.धो.महानोर

 मनामनात झरणारा हिरवा ऋतू.....ना.धो.महानोर
















काही माणसं आपल्याला भेटलेली नसतात.पाहिलेली ही नसतात तरी ते काळजात खोल तळाशी कुठतरी रुतलेली असतात. नकळत रुजलेली असतात.त्यांच आपलं एक अनोखं नातं नकळतं तयार होतं.त्या नात्याला आपण नावं नाही देऊ शकतं पण ते असतं  उत्कटं आणि ओतप्रोत प्रेमात चिंबलेले...आपल्या मनाशी  घट्ट गुंफले गेलेले. नात्यांच्या कृत्रिम फ्रेम मध्ये आपण त्याला बंदिस्त नाही करू शकतं. फ्रेमचं नाही करू शकलो की त्याचा शो पीसं करणं तर अशक्यच असतं.तसंच एक नावं आहे.ना.धो.महानोर.मनाच्या तळाशी एक अनोखं नातं कोरले गेलेले.

कविता गाणी वाचू लागलो.गुणगुणू लागलो तसं ना.धो.महानोर मनात ठसतं गेले.शाळेतल्या पुस्तकातील कवितेतून ते सर्व प्रथम भेटतं गेले.निसर्गाचं अप्रतिम सौंदर्य ते उलगडत गेले.सौंदर्याचे पण पदर असतात का? अलवार ते फेडतं गेले की रूपाचं चांदणं पसरतं जाणारे? महानोरच्या  शब्दांनी भारावून टाकलं होतं आमचं तारूणयं...

रान,शिवाराचं अनोख वेडं ते माणसाच्या मनात पेरतं गेले. निसर्ग आणि सौंदर्य.सौंदर्य आणि प्रेम याचं एक नाजुक बंध असतात.मनात आपसुकचं विणले गेलेले.आ

भाळ दाटून आलं की मनभर महानोरांचे शब्द थुईथुई नाचू लागतात.मन रानावनात,शेतात हुंदडतं राहतात.

नभ उतरू आलं

चिंब धरताडं ओलं.

पाऊस..म्हणजे धरती आणि नभाचा प्रणय सोहळाचं की.

या नभाने या भुईला दान द्यावे.

या मातीतून चैतन्य गावे.

पाऊस पडू लागला की पावसानं चिंब ओली रान...त्यांची.गाणी आठवतं राहतात.

दूरच्या रानांत,केळीच्या बनातं

हळदीचे उन्हं कोवळे....

 हे शब्द माणसाला ठार रानवेडं करतात.

चिंब भिजलेली प्रिया...आणि झिमझिमणारा पाऊस... प्रणय धूंद मनात महानोरचे शब्द अलवार मोरपीसासारखे फिरत राहतात.शब्दांना पण स्पर्श असतो का? नाहीतर महानोरचं शब्द कानावर आदळतो राहिले की अंग भर शहारे कशाला उमटतं राहिले असते.

 घन ओथबून येती....किंवा चिंब पावसानं रानं झालं आबादानी

सखे लावण्याची खाणी.....

पावसाप्रमाणेचं उत्कटतेच्या डोहात डुंबत आलेली प्रिया आठवतं राहते.ओढ,हुरहूर ही निसर्गाच्या कणाकणात भेटतं राहते.इतके आपले असणारे शब्दं हा कवी कसं काय लिहू शकतो? असा भाबडा प्रश्न आपल्याला आपसुकचं पडतं राहतो.

शब्द काळजातून कागदावर उमटतं गेले की त्याची जिवंत कविता तयार होते. तिचं तर मनाचा ठाव घेते.आज ही रानांत गेलं की महानोर चे शब्द मनात घोळत राहतात. हिरव्यागार रानात, पिकं तरारून आलेल्या शेतात ,उनाड वारा अंगाशी लगट करताना महानोरांचे शब्द मनात तरळले नाहीतर नवलचं म्हणायचं. 

मला हे कळतं नाही.माझ्या आण्णाच आणि महानोरचं काय नातं असू शकेल? रानांत गेले की महानोरचे शब्द आठवतात नि शब्द आठवले की फाटक्या कपडयातील तुटक्या झोपडीतील माझे आण्णा...!! रानावनात जातं गेलेल्या माणसाचं दु:ख वेदना त्यांचे शब्द नक्कीचं प्रसवत असतील.

या रानांत गुंतलेले प्राण माझे...

तुटकी झ़ोपडी काळीज माझे.

त्यांच्या झोपडीचे नव्हे तर काळजाचे लक्तरे लोंबकळत आहे असे भास होतात. शेतक-याचं जीवन किती कष्टप्रद असलं तरी महानोरच्या शब्दांत त्याची एक वेगळीच श्रीमंती आपणास अनुभवायला मिळते.

माणसाच्या मनात शब्द असे इतकं खरं वाटू शकेल असं साम्राज्य उभे करतात?शब्दांना पण एक अनोखं ऐश्वर्य असतं. दूरच्या  रानांत,केळीच्या बनात... गर्द हिरव्या रानात..हे गाणं ऐकलं आणि रानाची ओढं निर्माण झाली नाही असा माणूस विरळच. 

रान,शेती,शेतकरी आणि त्यांच्या वेदनांना ते शब्द देत राहिले. काळीज अंथरत राहिले.शब्दगंधेला बाहूत घेण्यासाठी तरसणारा हा प्रेमी काळाच्या कुशीत कायमचा विसावला.

हे पटतं नाही.रुचतं नाही. मरणं कुणाला टाळता येत नाही पण असं अचानक त्यांना आपल्यातून असं घेऊन जाणं मनाला चटका देणारं आहे.आता ते या जगात नसतील पण त्यांचे शब्द...कायम आपलं काळीज टोकरीत राहतील....जखमचं फक्त भळभळतात असं नाही.आठवणीचं पण भळभळ  असतेंच की...अनावरं.

इतक्या नको होतं जाणं त्यांचं असं.. सारं सुनं सुनं झालंयंहे जग,शिवाय,रान,बांध,पांदं, डोंगर....वगैरे

मन शब्दाळणं ही अटळचं आहे.


थरथरली वाट हिरवी

शिवार ही हिरमुसले.

गहिवरले हे रान  सारे

हे बांध आश्रूत ओले.

 शब्दगंधे बाहूत तुझ्या.

चैतन्य जरा स्तब्ध झाले.

आठवांच्या भारवात या

मनाचे पारवे सुन्न झाले.


तोडुन काळीज झोपडी.

प्राण रानात फडफडते.

भिजकी वही  वेदनांची

कैवल्य तुम्ह शरण येते.

भावपूर्ण श्रद्धांजली....!!!

शनिवार, २९ जुलै, २०२३

लफडीचं पण राजकीय पक्षांची....


पक्षाच्या युत्या किंवा आघाड्या नाही होतं. ते सरळ व्याभिचार करतात.ते लफडीचं असतात. लफडयाचे जे परिणाम गावाला घराला भोगावे लागतात.तेच परिणाम असल्या अभद्र युतीचे जनतेला भोगावे लागतात

कसे  ?

रमेश नावाचा एका आमदारांचा अतिमहत्वाच्या कार्यकर्ता होता.त्याचा पक्षचं फुटला.एका पक्षाचे दोन गट पडले.आता आपण कोणत्या गटात जायचं हा प्रश्न त्याला पडला.गद्दार व्हायचं की खुद्दार? इकडे निष्ठा व तत्व होती तर तिकडे सत्ता.इकडे सुविचार होते.गौरवशाली इतिहासाचे दाखले होते.धडाडीचा भूतकाळात होता.

तिकडे आमिष होती,प्रलोभन होती. उज्जवलं भविष्याची स्वप्न होती.थोडक्यात मज्जाचं मज्जा होती. ऑफर तरी दोन्ही बाजूंनी सुरू होती. 

काय करावं हे त्याला कळतं नव्हतं.

पक्ष फुटला तर फुटला पण आपलं डोकंचं फुटायची वेळं येऊ नाही असं त्याला वाटू लागलं.

    जुनं सारं झुगारून आपलेचं नेते आपल्या दैवतावर नको ते बोलू लागलेत हे त्याला  पचतं नव्हत.रूचतं नव्हतं.ज्यांच्या आरत्या केल्या त्यांना लाथा कश्या मारायच्या?शिव्या कश्या दयाच्या? राजकारणात असं चालायचं असे सारं म्हणतात पण दर्जा..? राजकारणाला पण एक दर्जा असतो की,नाही?इतकं खालचं राजकारण कसं करायचं?सरडा तर फक्त रंग बदलतो.आपले नेते तर रंग,बोलणं,वागणं ,विचार सारचं बदलतात.(विचारांचा राजकीय नेत्यांचा कित्ती कसा संबंध असतो?) आपल्या नेत्या इतकं व तसं बदलणं त्याला  सोपं नव्हतं वाटतं.

ज्यांना शिव्या दिल्या,ज्यांची बॅनर फाडली.त्यांच्यासोबत आपण कसं  राहायचं? आन कॅमेरा त्यांना मिठया कश्या मारायच्या? त्यांच्या आरत्या कश्या करायच्या? स्वाभिमान नावाची काही चीज असते की नाही?

 सत्तेसाठी ते पण करू पण लोक काय म्हणतील याची त्याला भीती नाही पण लाज वाटतं होती. उगीचंच जामं टेन्शन आलं गडयाला.


           त्यावेळी त्याला तो दुदैवी उनाड  संत्या आठवला.संत्याची आय दुस-यासंग पळून गेली होती  पण त्याची आय संत्याचा फार लाड करी पण त्याला आईला बोलूसंधंधं वाटतं नसं.आय कुणा बरं गेली तरी त्याला आपला बाप नाही म्हणता येतं.संत्याचं गहिरं दु:ख त्यांच्या मनात दाटून आलं.त्यानं स्टेट्स सोडलं.

आय कुठं गेली तरी बाप हा बापचं असतो. 

विन्या.म्हणजे विनोद पाटील एका आमदारांचा उजवा हातच.

याचा पक्ष फुटला नाही पण दुसरा पक्ष फुटून त्याच पक्षांबरोबर  एका गटानं युती केली आणि एकदाची यांच्या पक्षाची बहुप्रतीक्षित ौसत्ता आली. सत्ता आली कोण आनंद झाला ?

यानी फटाके वाजवले.डीजे लावून चौकात नाचला.भरपूर प्याला.गुलालात टिरी बडवून सर्व लाल करून घेतल्या.

राजकरणात निष्ठेला आणि तत्वाला फार महत्व असतं.गद्दारांना आपल्या पक्षात क्षमा नाही.त्याच्या नेत्यांची भाषणं त्यांनं  ऐकली.त्याचं ऊरं अभिमानाने भरून आलं. आपण गद्दार नाहीत हे तर त्याला कळलं.आपण घेणारे नाहीत देणारे आहेतं.आपण पद वाटायची. असं त्याचा नेता सारखं सांगायचा.त्याला ते पटतं ही असं.

काही दिवसांनी आपला घास दुसरं कुणीतरी खात आहे असं त्याला वाटाया लागलं.

ज्यांची बॅनर फाडली. शिव्या घातल्या त्यांच्याचं आता अभिनंदन करावं लागे.डिपी ठेवल्या,स्टेटस सोडलय.खंबीर साथ म्हणून....कॅप्शन पण लिहिले....सारं कौतुकं केलं.दुसरेचं कार्यकर्ते मलिदा खात होते. हा नुसता पहात होता.

सरकार त्याचं असलं तरी त्याला कुठं काय होतं? 

त्याला प्रियाची सावत्र आई आठवली. ती सारं काम प्रियाकडून करून घेते पण खायला पुरेसं देतं नाही.दिलं तरी शिळं पाकं खावं लागतं. तिचा लाड  कुणीचं करतं नाही.आई नाही आणि बाप ही नाही.

आई बाप आपलेचं असतात पण  सावत्र आई असली की परकेपणा आलाचं.सख्खा बाप ही फारसा वाट्याला येत नाही.प्रियाच्या भावना याच्या डोळ्यातुन वाहू लागल्या.



राम जगदाळे एका आमदाराचा जवळचा कार्यकर्ता.त्याचं पक्ष फुटला नाही पण पक्षात मात्र माणसात माणूस राहिलं नाही.काही माणसांना लाडीगोडी लावून... थोडक्यात फूस लावून फितवलं आहे. सत्तेचा लाॅली पाप चघळता यावा म्हणून हे पण मितले आहेत. डायरेक्ट. सत्ता भेटल्यामुळे तो  ही खूश..त्याचा स्वभाव शिव्या घालायचा  नाही.मलिदयाची वाटी भी त्याच्या चांगली वाटयाला येऊ लागली आहे.तो खुशीत गाजरं खातो आहे.त्याला लाज फारसी वाटतं नाही पण संकोच वाटतो आहे. माणसाचं मनचं माणसाच्या जीवाला खाते.

त्याला सुमंत आठवला. सुमंतची आय एकाचं घर निघाली म्हणजे तशीचं घरात शिरलीयं.लोकं दबक्या आवाजात चर्चा करत आहेत.ती कुजबुज याला नकोशी वाटते पण तो काहीचं करू शकतं नाही. 

  कोणं म्हणतं पक्षाची युती किंवा आघाडी होते? अलीकडं पक्षांची लफडी आणि अफेअर पण होऊ लागली आहेत. खरं ना?

शुक्रवार, १४ जुलै, २०२३

श्रध्दाळू ( वि ) ज्ञानी व चंद्रयान -३


सध्या जग हे भारताकडे मोठ्या आशेने पहाते आहे.अवकाश संशोधनात  तर आपण जगात अमेरिका,रशिया चीन यांच्या पंगतीत आहोत.आपलं या क्षेत्रात नावं अधिकच गडद झालं आहे.ही बाब  आपल्या सर्वांसाठी  भुषणावह आहे.

चंद्रयान २ च्या अपयशानंतर चंद्रयान-३ ही मोहीम इस्रोनी आखली आहे. अपयशात यशाची बीज असतात.अधिक क्षमतेने काम करून यानाचं प्रक्षेपण ही यशस्वी झालं आहे.ते चंद्राच्या दिशेनं झेपावले ही आहे.इस्रोतील संशोधकांना यश येवो.जगाच्या इतिहासात भारताचा गौरव व्हावा व देशातील नागरिकांचं ऊर अभिमानाने भरून यावा अशी सर्वांची अपेक्षा आहे.तसं होणारं ही आहे.आमच्या संशोधकाकडे तेवढ्या क्षमता आहेतच.विश्वास ही आहेचं

 नियोजनाप्रमाणे चंद्रयान-३ चंद्रावर उतरले आणि ते त्याच काम करू लागेल ही.हा गौरवशाली महत्वकांक्षी प्रकल्प तडीस नेण्यासाठी संशोधकांनी अपार मेहनत केली आहे.त्यांचं सर्वत्र जगभर देशभर  अभिनंदन होत असताना ते टीकेची ही धनी झाले आहेत.त्याचं कारणं ही तसचं आहे.

            हे विज्ञानाचे पुजारी तिरूपती(बालाजीच्या) चरणी लीन झाले.त्यांनी बालाजीला एक चंद्रयानाची छोटीसी प्रतिकृती  ही भेटं दिली.मंदिर व देव हा श्रध्देचा व अध्यात्मिक समाधानाचा विषय असतो. ही टीम कशासाठी बालाजीच्या मंदिरात गेली? बालाजीचा आशिर्वाद त्यांना हवा होता का या मोहिमेसाठी?आता या संशोधकांच्या वैज्ञानिक दृष्टीकोनाचं करायचं काय?जगाचं लक्ष सारं या मोहिमेकडे लागलेले असताना? हे भारताचे रिअल हिरो इतके धार्मिक,श्रध्दाळू का झाले ?तिरुपती बालाजीचं दर्शन घ्यावं असं या संशोधकांना का वाटावं?त्यांची ही श्रध्दा की अंधश्रध्दा? विज्ञानाचे अभ्यासकचं असे वागू लागले तर  ....?  वगैरे वैगरे.चर्चा तर होणारच..!!

उद्या ही मोहिम यशस्वी  झाली तर  देशाची मान जगात उंचावणार तर आहे. चंद्राच्या दक्षिण ध्रुवावर भारत पहिल्यांदा झेंडा रोवणारं आहे..देशाला व जगाला या म़हिमेचा मोठा फायदा होणार आहे परंतु यानाच्या  यशानंतर बालाजी ठायी असलेल्या लोकांच्या श्रध्दा आणि अंधश्रद्धा अधिकच्या दृढ होतील? तिरूपती बालाजीला या यशाचं श्रेय दिलं जाईल.श्रध्देचा अधिकचा गैरवापर करण्यासाठी धर्ममार्तंड  पुढे सरसावतील. ही मोहिम जर अपयशी झाली तर त्याचं खापर मात्र टीमच्या माथीच असेल? देवाच्या नावानं आता पर्यंत कुठलचं अपयश खपवलं  गेलं नाही.





सामान्य लोकांचे सोडा . विज्ञानाच्या व्यासंगी लोकांनी इतकं श्रध्दाळू का वागावे? दोन महिन्यांपूर्वीचं वैज्ञानिक दृष्टीकोनाच्या चिंधड्या करणारी घटना या देशवासियांनी लाईव्हं पाहिली आहे.ती म्हणजे संसदेच्या भव्य इमारतीचं लोकार्पण..!!

                 संसदेच्या नवीन इमारतीच्या  लोकार्पण वेळी नरेंद्र मोदीजीने होमहवन,पूजा अर्चा केली.त्यावर ब-याचं प्रमाणात टिका ही झाली.टिका जरी वैचारिक  भूमिकेतून झाली असली तरी राजकीय पातळीवर सहज नेता आली.कारण मोदी हे राजकीय नेते आहेत. टिका करणारे ही राजकारणात सक्रिय असलेले लोकच होते.राजकारण तर  हल्लीचिखलचं झाला आहे.

अनेक जणांनी त्यांच समर्थन केले.काही जणांनी त्याचं उदात्तीकरण ही केले.धर्मनिरपेक्षता  व वैज्ञानिक दृष्टिकोन हे मूल्यं देशात रूजवायचं आपल्या घटनेचं उद्दिष्ट असताना  मोदी असं करूच कसे शकले? देव देवहा-यात पूजाचे असतात.रस्त्यावर नाही.

 हिंदू धर्मातील अनेक लोकांना लोकार्पण  सोहळा व चंद्रयान-३टिमचं बालाजी दर्शन या दोन्ही गोष्टी आनंद देणा-या असल्यातरी जगासमोर वैज्ञानिक दृष्टिकोनाचा अभावाचं प्रक्षेपण करणा-या नक्कीचं आहेत.विज्ञान विवेक बुद्धीवर बेतलं जातं. आपल्या विवेक बुद्धी बाबत आपण जगाला संभ्रमित तर करत नाहीत ना? आत्मचिंतनाची गरज आहे.

हे राष्ट्र हिंदुराष्ट्र करण्याच्या मोहीमेचा तर  हे प्रयोग नाहीत ना?  या कामी संशोधकांना कुणी वापरत तर नाहीत ना? असे ही प्रश्न विचारले जातं आहेतं. जसं हे खरं असू शकेलचं असं नाही तसंच हे खोटं ही असेलच असं नाही.

             या टीमच अशी समर्थन केलं जातं आहे.या जगात कुणीचं मुळीचं नास्तिक असतं नाही.मानवी मर्यादा संपल्या की माणुस एका अज्ञात शक्तीची आराधना करतो.काही तरी चमत्कार घडावा अशी अपेक्षा करतो.डॉक्टरं  गंभीर ऑपरेशन  केल्यानंतर  वर आकाशाकडे पाहून देवावर विश्वास ठेण्याचं सुचवतो. तसचं हे. आता शक्यं ते सारं केलं बुवा आता तूच ठरवं. अशी साद घातली त्यांनी. शेवटी प्रयत्नांती परमेश्वर...!!


देवाचं स्वरूप पोथी पुराणात वर्णिले  तसं जरी मान्य केलं नाहीतरी एखाद्या अकलनीय शक्तीचं अस्तित्व मान्यं करतोच माणूस.विज्ञानाला अंतिम सत्य सापडलेलं असतंचं असं नाही.देवाचं अस्तित्व सिध्द प्रयोगातून अद्याप करता आलं नाही.त्याचं प्रमेय असतं नाही.तसचं त्यांचं नसणं ही नाकारता थोडचं आलं आहे? अर्थात हे आपण असा सारा विचार का करतो ? कारण आपण विचार करू शकतो.आपल्याला  बुध्दी आहे.शेवटी  हा बुध्दीचा केळं आहे. इतर प्राणी इतका विचार करत नाहीत.

       आता आपण हे नक्की ठरवलं पाहिजे की आपल्याला विवेकावर  सत्यं तपासून घ्यायचं की राजकारण करून एका टोळीचा भाग व्हायचं आहे? इतर प्राण्याचं उदिष्टयं विश्व पादाक्रांत करण्याचे असतं नाही.अशी उदिष्टयं फक्त माणूस ठेवतो. कुणाच्याचं मर्यादा अमर्याद नसतात. तुम्हाला काय वाटतं?

                             परशुराम सोंडगे,बीड

                             ९५२७४६०३५८


 

बुधवार, १२ जुलै, २०२३

पक्षफुटी,सदू आणि बंडया



पाराजवळ सकाळ सकाळ एक टोळकं जमा झालं होतं.सकाळ पासूनचं दोन चार गाबडी नुसती तोटं वाजवीत होतं. सकाळ सकाळचं ठो..ठो...  बारं व्हायला लागलेत म्हणल्यामुळे  गलका तर होणारच ना? त्यांच्या भोवती येणारी - जाणारी माणसं गराडा टाकित हुती.जसा जसा गरदा जमा होतं व्हता.तसं ती गाबडी चेकाळतं व्हती.त्या  रामा सावकाराच्या बंगल्याकून डीजेचा भी आवाज येतं हुता.नेमकं कशाचं काय ? हे ब-याचं जनाला कळतं नव्हतं.

 सदू  यटण पाठीवर टाकून झपाझपा शॅतात निघाला होता.एवढा गराडा पाहून तेव्हं भी थांबला.उग आपला उल्लीकसा टायेम पास करावा म्हणूनचं तेव्हं तिथं घुटमळला व्हता.

"अरं कमून  असं बारं करित्यात रं? "सबागती त्यांनी बंडयाला परशन केला. कुठं काय घडलं?त्याला काय माहित ? तेव्हं शेतकरी माणूस.लयं कुणाच्या राड्यात पडतचं नाय.

"आरं काल मोठा भूकंप झालायं की...तुला नाय व्हवं ठावं?"बंड्या त्याच्या हातावर टाळी देत  बोलला. 

"भूंकंप...??कुठं ?कवा ?" सदू हादरला ना?त्याला काही इश्यचं ठाऊक नव्हता.तेव्हं हादरायचं नाय तर काय?दोन च्यार थोबाडातून नुसते दातं विचकले.उगाच दाताड विचकल्यामुळे तर सदू  एकदमचं गांगरला. आयला हे कमून दात काढयत्यात कायनु? काही जणं चेकाळलेत.काही दाताड इचकितेत.काही त्या तिकडं नाचत्यात..म्हंजी हे काय तरी भारी घडलेलं दिसतंयं पण असं सा-यांन खुशीत गाजरं चघळया सारखं नेमकं काय झालं आसलं? आसला मज्जाच हादरा तरी कसा असलं? असला कसला भूंकप? त्याला प्रशन पडला. आता प्रशन नुसतं सदूला एकट्याला पडलाय व्हयं? आख्खा महाराष्ट्रालाच ह्यो प्रश्न हाय. असल्या प्रश्नांनी लोकांच्या मेंदूचं पारं भरितचं केलं की.त्याचं कुणाला टेन्शान.

"आर,असला हादराच कुणी कवा दिला नसलं?लयं जबर हादरायं तेव्हयं."

"जबर हादरा ?"

हाॅं...जबराटचं.....? बंड्या गुटक्यानं लाल किटाण चढलेले दात इचकित बोल्ला.

"बार उडीत्यात... नाचत्यात...असला कसला  ग्वाडं हादरा...? मज्जा लका...तुमची." सदू बंडयाची मज्जा घेतं बोल्ला.

"आर,एवढंचं काय घेऊन बसला.ते बघ डीजे...पण आलाय इकडं."

सदूनं मान वळिली. तिकडून खरचं डीजे येतं व्हता. डीजे बघितल्यावर तर सदू  पारं पपचरंचं झाला.

"खरचं की लका..आता ह्यो डीजे कशाला?."

"कशाला म्हंजी? नाचायला...!! बघ...बघ..नाचायला लागली पारू.... पोरं सोरं भी झाल्यात चालू."बंड्याने तर तालचं धरला.चांगलाच नाचायला लागला.

सदूचं टेन्शाॅन गेलं असलं तरी कनफ्यूजन  पारचं वाढलं होतं.

" अरं बंड्या हे कसला भूंकप... हे तर लग्नाच्या वरातीवाणीचं सारं.वातावराणं टाईट."

"आयला तू का यंटम का रं? भूंकपच केलाय  लका दादांन. जबर हाबाडायं हेव्हं ."

"दादानं...कोण्चा दादा....?"

"आरं, महाराष्ट्रात एकच दादा....??"

"गप,हेकाण्या...दादा कुठं एकच असतो.इथं फुटाफुटावरं दादा पडलेत? खालच्या अळीचादादा, वरच्या अळीचा,मिच मिचं डोळयाचा, तेव्हं डबका दाद्या.इथं काय एक दादा व्हयं?"

"ऐ,यंटम... एकच दादा...वन्लि अजित दादा..." बंडयानं एकदम क्लेअरचं केलं.

"ते  पवार सायबाचा पुतण्या का?तेव्हचं दादा ना?"

"हाबडा दिलायं.. आपल्या दादानं."

"हाबडा? कुणाला.??"

"आरं,फोडलानं राष्ट्रवादी पक्ष त्यांनं... फट्दिसी."

"आयला हे पक्ष हायत की फुगं रं? फटाफटाच फुटतेतं लका.मागं ती शिवसेना भी अशीच फाटकुणी फुटली. आता त्यांच होतं हिंदूत्वाचं मॅटर..यांचं काय?

"दादा तेव्हं.इक्कासचा लयं नाद दादाला."

"इक्कास?कोण्चा इक्कास? सरकार कोणाचं भी आलं तर आपलं हाय ते हायचं.शेतक-याला काय?डेंगळ?"

"आर,इक्कासाची लांब लचक दृष्टी हाय दादा कडं.ईक्कासाठीच हा यगळा इचार केला त्यांनी.शेतक-यासाठीच तर पाऊल उचलयं दादांनी."

"उग फेकू नक्कू.शेतक-यांच कोण ईचार करतयं? स्वार्थ असलं त्यांचा काही.आर,हे पुढारी लयं गंडयाचे असतेत?खायचं एका दातांनी नि दाखवायचं यगळच दात."

"आर,सत्ते शिवाय प्रश्न नाय सुटतं.अॅडजेसष्ट

"आयला ....पण ही गद्दारीचं की." सदूला काय  राजकारणातले छक्के पंजे कळतेय? ते आपला सरळं बोलत हुता.

"गद्दारी...?नाय नाय पक्ष दादांचा खरा हाय."

" हे तर लयच झालयं? ज्या ताटात खाल्लं त्याचं ताटात हागल्या सारखं झालं."

"ऐ,हेकण्या,महत्वाचं काय रं? "

" इक्कास."

" इक्कास काय इरोधात बोंबलून  होतो का?आर, ईरोधआत असलं की नुसत्या वाटा अडीतेत? इरोधातलं आमदार म्हंजी...उग बुजगावण्या गत राहतं? आहे म्हणतं येतं नाही नाही  म्हणता येतं नाही.ईक्कास करायचं म्हणलं की सत्ता पायजी.उग तंडत बसून उपेग नसतो.म्हणून ह्यो यगळा इचार केला दादांनी."

"आर,पण कुणी तरी ईरोधआत भी पायजी ना?सारेच एक झाल्यावर ? लोकशाही कशी तग धरिल?"

"लोकशाहीच नक्कू टेन्शन घेऊ तू."

"असं गापकुणई गडी फुटायचे म्हणाल्यावर काय तरी जबराटचं कारण असलं?असलं मोठाले गडी कसं काय फुटत्यात? तसली ईडी का काडी तर माग नसलं ना ?"

"नाय नाय...दादा तेव्हं.. त्याला कोण घाबरू शकतं?"

" तू काय भी म्हणं बंड्या.काही तरी हूकचं अडकईलं असणं? त्या शिवाय अशी मोठाले पक्ष कसे फुटतेलं? गेल्यावर्षा तेव्हं शिवसेना पक्ष फुटला तवा गुवाहाटी...डोंगार, झाडी..हाटील. सारं गडी स्पेशल इमानानं गडी सहल करून आणले हुते.त्यांनी लयं मज्जा केल्ती. त्यांचा डान्स भी आल्ता की मोबाईल वर.खोके काय ते पण भेटल हुतं जणू?"

"खरं,हे खरं नसतं?"

"मग हे एकदम फुकटचं कसं गद्दार हुतेल.एवढं मंत्री राहिलेलं नेतं कसं काय गळाला लागले असत्यालं?"सदूच्या मेंदूचा पारं भजं झालं होतं.

"दादांची घुसमटं भी व्हती म्हणा तशी."

"घुसमट?काय घुसमटं असलं बुवा? काही भावकीचं मॅटर आसलं? चुलत्या पुतण्याचं कुठं जमतं आपल्यात. पुराणा पासून तेचं आलं.भावकी ती भावकी.उण्याची वाटेकरी." सदा असा बोल्यावर बंडयाचं डोकं गरम झाल. बंडया कट्टरं गडी.

"गप,गैभाण्या,इक्कास साठी फूटलेत दादा.."

"इक्कास..?कोण्चा?'

"महाराष्ट्राचा..शेतक-याचा...!!"

"हे भारी मॅटर रंगिलं...शेतक-याच्या इक्कासाचं.

"बरळायला माझं काय जातं? पण त्या थोरल्या वाडयाचं कसं व्हुईल?"

"सावरकरांचा नि त्यांचा  लयं छत्तीसचा आकडा हुता."

"ते बघ,सारेचं नाचतेत? मंत्र्याच्या स्वागतला...!!"

"वरचं असं गुटमॅट झाल्यावर खालच्याची लयं पंच्यात हुती? मुळयादं झाल्यासारखं सांगता येत नाही.सोसता येत नाही."

"राजकारणात कायम कुणीच कुणाचं मित्र नसतं आणि..दुश्मन नसत. राजकारणात लयं इमोशनल.व्हायचं नसतं.डोकं वापरायच असतं."

"ते कसं?"

"जिकडं...घुग-या "तिकडं..उदो..उदो..वाहत्या नदीत घ्यायचं हात पाय धुवून..."

"बंड्या डोकं लका...तुला.आम्ही होकार इमोशनल होऊन मतदानाच्या टायमाला काशि करायचो.आता नक्की डोकं वापरायचं...हे काळीज काढून कुणाला नाही दयायच.

"मग करायचा डान्स? दादांचा नाद करायचा नाय."

सदू आणि बंड्या गर्दीत शिरले.नाचू लागले. बीजे वाजतं होता.नाद करायचा नाय....नाद करायचा..

शुक्रवार, ७ जुलै, २०२३

राजकारण आहे की बहुरंगी बहुढंगी नाटक?



हल्ली महाराष्ट्रात जनता सरप्राइज शाॅक खाऊन खाऊन घायाळ झाली आहे.उत्सुकता माणसाला पराकोटीचा आनंद देत असते.सस्पेंन्स..आता पुढे काय?  पुढे काय..?? पक्ष फुटला..आता राष्ट्रवादी कुणाची ? या प्रश्नांच उत्तर मिळवण्यासाठी कमीत कमी वर्ष  भरी तरी महाराष्ट्राला वाट पहावी लागेल.शिवसेना कुणाची या प्रश्नांच उत्तर अजून ही महाराष्ट्राला मिळाल नाही.ते मिळेलंच असं ही नाही.तो वरचं राष्ट्रवादी  पक्ष कुणाचा हा प्रश्न महाराष्ट्राच्या मानगुटीवर ठेवण्यात  आला आहे. काही प्रश्न कायम प्रश्नच राहतात.नव्या प्रश्नाला जन्म देतात. माणसं बारा बापाचे नसतात पण प्रश्न  बाराचंचे काय  शंभर बापाचेचं पण असतात.

                या  महाराष्ट्रात  मडकी फुटावीत तशी फटाफट पक्ष कसे काय फुटतात? एवढी प्रचंड गद्दारी  कशी काय होते?कोण गद्दार ? कोण खुद्दार ?असे प्रश्न मेंदूचा पार भूगा करत आहेत.चक्क वाघाची शिकार हरणं कशी काय करतात? सध्या महाराष्ट्रात काही घडू शकतं?तुम्हाला हरिण वाघाच्या बछड्याला दूध-भात भरवताना  लाईव्ह दृश्यं दाखवलं तर तुमचं कसं होईल? कल्पना करा.नुसता आश्चर्याचा धक्का नाहीतर सरप्राइजचा बाॅम्ब अंगावर पडल्यासारखं वाटेल?सध्या अश्याच  आश्चर्याच्या प्रलयात गुदमरतो अख्खा महाराष्ट्र.टीव्ही पुढं तास तास बसून ही उत्तर सापडत नाही.या पापाचा बाप ही....ठरवता येत नाही.

           महाराष्टात चाललं ते काय चाललयं? हे असलं भयंकर राजकारण कसं असेल? छे..? हे बहूढंगी  बहुरंगी नाटय रंगलेले आहे.एक एक अंक सादर होतो आहे. भंयकर मेहनत घेऊन  पडद्या मागे तालिम केली जाते आहे .विधनाभवनाच्माया मंचावर माय बाप जनतेला नुसते सप्राईजचे शाॅक दिले जातं आहेतं. एखाद्याची पोरगी पळून जाणं ही मोठी चटकदार बातमी असते त्यात ती पोरगी खानदानी असेल तर?मग तर काय? चटकदार भेळी पेक्षा भारी काम असतं? पोरगी पळून जाणं ही फार वाईट गोष्टं असते. कुणाची का असेना. प्रंचड सहानुभूती  आपली  त्या मुलीच्या आई वडीलाबाबत असते तरी गल्लीत,गावात दबक्या आवाजात चविष्ट चर्चा  रंगतात.ऐकायला सांगायला बरं वाटतं. रोमांचक स्टोरी ऐकायला पहायला  भारी मज्जा येते लोकांना.त्या खानदानी घराण्याच्या अब्रुचं फार खोबरं झालं तरी लोकांना त्याचं फार देणं नसतं.सर्वांनाच मज्जा घ्यायची असते. त्यात एक थ्रिलर दिलेलं असतं. ते हवं असतं सर्वांना .किती ही सहानुभूती असली तरी रोमांचक स्टोरीतील पुढच्या अंकाची उत्सुकता असते. आता पुढे काय? ही उत्कंठाच खरी मज्जा देते.महाराष्ट्र सध्या हीच मज्जा घेतोय.या नाटकाला अजून एक ग्रेड कुणीच दिला नाही.त्यामुळे लहान थोर सारेच मज्जा घेत आहेत?

तुम्ही दोन कोंबड्यांची झुंज पाहिली का?ते कोंबडे रक्तबंबाळ जरी झाले तरी  कोण जिंकणार आहे हे आपल्याला पाहायचं असतं. किंवा बाॅक्संसिंगचा खेळ ?स्पेन्स फार क्रुर असतो.त्याला दया माया नसते.झुंज लावणारे क्रुर व झुंजीची मज्जा लुटणारे हे क्रुर असतात हे मान्य केलं तरी खेळं तर हवाच असतो ना ?आपण भावूक होऊ नाही. कशाला टेन्शन घ्यायचं? तुम्हाला हे सारं पाहून लोकशाही बाबत टेन्शन आलं असेल.जनरली ते कुणाला ही येऊ शकतं.तसचं सारं चालू आहे हे.पण करणार काय तुम्ही ?

ते राज्य चालवत आहेत की राजकारण  खेळतं आहेत? राजकारणाचा खेळ खेळत आहेत. त्यांचा खेळ आपण एन्जॉय केला पाहिजे .आपला मेंदू का तापून घ्यावा? खरं तर राजकरणात विचार तत्व वगैरे ची अजिबात गरज नसते. तशी नाटक रंगवता आली पाहिजेत.लोकापुढे जे भासाचं नवं जग उभे करू शकतात तेच उत्तम अभिनेते होऊ शकता.लोक त्याना नेता मानू लागतात.एकदा का नेता म्हणून तुम्हाला लोकांनी मान्य केलं की ते राजकारण खेळायला मोकळे.

तुळशीची माळ घातली की मांसाहारी केला जात नाही.काही ढोंगी माळक-याची गोष्टं आम्हाला नेहमी सांगितली जायची. माळ खुंटीला टांगून येथेष्ट   मटनावर ताव मारून  ढोंगी माळकरी साळसुदपणे भजन म्हणत असतं.त्या दांभिक माळक-यात आणि राजकारणी नेत्यांत फारसा फरक नसतो.

तो मी नव्हेच या नाटकाचा  अंक पण ते छान रंगवू शकतात. आपण  निष्ठा, प्रामाणिकपणा तत्वज्ञानात  गुरफटून  गेलो तर त्यांच्या या नाटकाची मज्जा कशी घेणार? ते जसं सारं गुंडाळून सावपणासाठी  घसा फोड करत राहतात तसं आपण सारं खुंटीला टांगायचं? जमलं तर घ्यायचा ताव मारून.

मित्र ह़ो,राजकारण एक खेळ समजा नाही तर बहुरंगी बहुढंगी नाटक समजा....आनंद भेटेल. फार गंभीर विचार करायचा विषयाचं राहिला नाही राजकारण.अंधभक्त,मावळे,पाईक,निष्ठावंत,कट्टर खंदे समर्थक यां सर्वांना सांगायचं.फार गंभीर वैगरे होऊ नका. तुम्ही तुमचं रक्त तापू नका.आमचं ही. हे सारं राजकारण एन्जॉय करा...अंक तिसरा....लवकरच सादर होतोय...

नाटक...नाटक..नाटिका..नाट्य पुष्पं....

जीव मुठीत घेऊन बसा.

सोमवार, १९ जून, २०२३

इंग्लिशस्कूलचं फॅड

 



गावचा नामा त्या दिवशी बॅंकेच्या दारात भेटला.गडी जरा घाईतच होता.घाईत म्हणजे गरबडीत.हातात बरीचं कागद होती.त्याला बॅंकेचं कर्ज काढायचं असावं.मी सहज त्याला हटकलं.
मी:अरे कर्ज कशाला काढतो?"
तो:"कशाला म्हंजे...? पोरग टाकलं की शाळात"
मी:"शाळात टाकलं ?त्यासाठी कर्ज ?"
तो:"मग ?"इंग्लीश स्कूल मध्ये टाकलं.साध्या साळात नाही. रोज येतं की स्कूलबसात बसून पाटादयाला."
मी: "किती पैसं भरलं ?
तो:आता तुर्त भरलं पंच्चीस. पुन्हा दयाचेत वीस.तसं काय नाही .सारे संभाळून घेतात आपल्याला आपल्या रामाचं पोरग घेतलं की पियोन म्हणून चिटकवून."
मी:"आरं, आता एवढ पैसं कशी आणणारेस वर्षाला ?"
तो:"कसं म्हंजे? काय झाडाला तोडायचेत व्हयं ? उचल घेणारं .बायको भी समजदार. ती पण म्हंती काय भी करू.कुणाचा गू काढू पण पोरग इंग्रजीतच शिकू.मुकादम उचल देतो की.त्याच्या मेहूण्याचीच शाळा जनू"
मी:" पोराचं काय वय?"
तो:" चौथं लागलं असलं बघा आवंदा."
मी: "अजून त्याचं वय नाही की झाली शाळाचं "
तो:आता पोटातचं असल्या पासून शिकशान सुरू होतं.आता हे काय आम्ही सांगायचं का तुम्हाला. उग कशाला याड घेता?"
मी:"गावात शाळा आहे सरकारी.अंगणवाडी आहे बरं सारं फुकाटं उग़ कशाला खर्चात पडतो?"
तो:गावात हाय.सार हाय .फुकाट हाय पण ते मराठी हाय. आपल्याला इंग्रजी पायजे"



मी:"का ?मराठी भाषा आपली मातृभाषा ना रं ? "
तो: कोण शिकतं मराठी ? सा-या मोठया लोकांची पोरं इंग्लीशच शिकत्यात.उग आपल्याला चुत्या काढतेत.आमच्या निल्यानं सांगितल सारं खरं.ते काय कमी शिकलाय व्हयं?ही साळा अख्खी ताब्यातचं दिली की त्याच्या"
मी:"आता हयो निल्या कोण ?"
मी:आमच्या थोरलं पोरग ना ते.लय चाप्टर..!"
मी: "मुकादम पैसं देणाऱ मग कर्ज कशाला?"
तो: " पुस्तकं.कपडे घ्यावी लागतात.त्याचं सात हजारं दयाचेत."
मी:अरे,सारं फुकटंच सोडून का खर्चात पडतो? अजून तर तुझ्या मुलाचं शाळाचं वय नाही ."
तो:सर, ठरलं एकदा .पोरग इंग्लीस स्कूलातचं शिकणार .आमचं जिनं गेलं पाचाटात .त्याला नाय या नरकात येऊ दयायचो. मोठा सायब करणार हाय मी त्याला.घाणं राहू पण इंग्लीशचं शिकू "
माझी बोलती बंद झाली. एेपत नसतानी हा कसा शिकवणाऱ . महागडया फिस कशा भरणाऱ?
महत्त्वकांक्षा चेतवल्या जात आहेत.
आपली दकानं चालवण्यासाठी सरकरी शाळा व शिक्षक यांना बदनाम केले जात आहे. उंदड झाली इंग्लीश स्कूल पण सरकार कां राहतं थंडा थंडा कूल ? इंग्लीश स्कूल म्हंजे ब्रम्ह देवाचा हात नाही तिथं गेलं की साहेब व्हायला.पण हे कुणाला सांगावा ? कसं सांगाव? आपलीच कथा आपलीच व्यथा ....!!









गुरुवार, १ जून, २०२३

जगण्याचा आराखडा








जगण्याचा आराखडा

आयुष्तयं तर आपलं आणि आपलंच असतं ना?इतरांना ना आपण ते देऊ शकतो.ना इतरांच आयुष्य आपण घेऊ शकतो.आयुष्याचे क्षण ही मर्यादित आहे.त्यामुळे इतरांवर ते खर्च नाही झाले पाहिजेत. आपला गेलेला वेळ आपण परत नाही आणू शकत.त्यामुळे आपल्या जीवनाचा आराखडा आपणच आखला पाहिजे. इतर कुणी तो आखला नाही गेला पाहिजे.आपलं जगणं कुणी नियंत्रित तर करत नाही ना ? हे पण पाहयला हवं.

पाहण्याची वगैरे काही गरज नाही. बहुतांश लोकांच्या जगण्यावर  इतर लोकांचं नियंत्रण असतंच.

    ए-हवी आपण फार इगो पाळतो पण खरंतर आपण आपल्या दो-या इतरांच्या हातात कायमचं दिलेल्या असतात.कुणी तरी येतो आपली कुणाशी तरी तुलना करतो.स्तुती असेल तर अंहकाराचे पंख घेऊन आपण  हवेत तरंगू लागतो.तिच तुलना जर उलटी असेल तर द्वेषाच्या, मत्सराच्या आगीत जळू लागतो.तुलना करणा-यांने ठरवलेलं असतं याला आज हवेत तऱगत ठेवायचं की मत्सराच्या आगीत होरपळत ठेवायचं. का रागात तडफडत? आपण आज कसं जगायचं ह्याचं काही प्लॅनिंग आहे का आपलं स्वत:च?असलं तरी ते ढासळला जातं.आपण कुणाच्या तरी अंकित असतो.

  कळसुत्री बाहुल्या़चा खेळ आपण पाहिलाच असेल. ज्याच्या हातात असतात दो-या  त्याच्या बोटावर  नाचतात बाहूल्या.कुणी आपलं हसू चोरतं.कुणी आपला राग वाढवत.कुणी आपल्या इर्षा पेटवत.कुणी तरी त्याचं रडगाणे ऐकून आपलं डोळं ओलं करतं.नीट विचार करा. हे परावलंब मान्य होतंच ना  आपल्याला ? राग,दृवेष व आनंद  या भावना कुणी तरी नक्की   नियंत्रित करत असते.जगण्याचा आराखडा आपला हवा. दु:ख आणि सुख हि आपलंच हवं ना ? त्यासाठी आपला स्वतःचा जगण्याचा आराखडा हवा.आपली आणि फक्त आपली स्टाईल हवी,नाही का?

      परशुराम सोंडगे,बीड

शुक्रवार, १२ मे, २०२३

सज्जनतेचा आव आणि दुर्जनांचा डाव

दुर्जनाचा विजय असो.



या जगात सज्जन आणि दुर्जन अशी दोनच प्रकारची माणसं राहतात.सज्जनचा सदैव दुर्जनाशी संघर्ष असतो.प्रत्येकाला आपण सज्जनच असावं असं वाटतं.दुर्जन तर कुणालाच व्हायचं नसतं.उलट आपण दुष्टं किंवा दुर्जन असू नाही किंवा तसं कुणी समजू नाही असा प्रत्येकाचा अटृटाहास असतो.आपल्या  दुर्जनत्वाचं प्रदर्शन करावं असं कुणालाचं वाटतं नाही.दुर्जनत्व लपवून ठेवण्याचा अटोकाट प्रयत्न माणूस करत असतो. त्यामुळे सज्जन असण्याचा  आवं चेह-यावर पसरून माणसं वावरत असतात. 

आपण किती शहाणे आहोत हे दाखवण्यासाठी  जशी माणसं झगडतात तशीच आपण किती सज्जन आहोत याचा ही 'शो ' माणसं जिथं तिथं करतच असतात.अनेकदा सज्जनतेचे सोहळे साजरे होताना आपण पहातोच असतो.

 सुगंध जसा शपथ घेऊन सांगावा लागतं नाही.तो आपोआपच जाहिर होत असतो.तसंच दुर्गंध दडवून नाही ठेवता येत.तो कुणालाच हवा नसतो पण तो बाहेर पसरतोचं. अनेकदा आपल्याला दुर्गंध सहनच करावा लागतो.आपण सज्जन असावा असं वाटणं व किंवा तसा आव आणणं आपण समजू शकतो.कुणी सज्जन असू नाही किंवा

कुणी अधिक सज्जन होत असेल अथवा तसा कुणी प्रयत्न करत असेल तर काही लोकांना रूचत नाही.त्याला दुर्जन ठरवण्याचा काही लोक चंगच बांधत असतात.त्याचं दुष्टत्व  ढोल वाजवून सांगितलं जातं.

सहसा कुणी कुणाच्या  सज्जनतेचा स्विकार करत नाही. त्यामुळेच अनेक साधू संतांना पिडा देण्यात हे जग पुढे आहे.इतिहास अश्या संघर्षाच्या  कथाच तर असतात.सज्जनतेचा विजय होतो असा इतिहास सदैव सांगतो.कथा ,कांदब-या, चित्रपटातून ही  सज्जनतेचा विजय होतो असंचं दाखवतात. प्रत्येकाला तेच तर  हवं असतं.

 प्रत्येकालाचं सज्जनच व्हायचं असून ही दुर्जनांची संख्या या जगात का जास्त आहे?असा प्रश्न  तुम्हाला ही पडलाचं आसेल.वास्तव तसं असतं नाही.या जगात सज्जनांची संख्या जास्तच आहे.दुस-याचं सज्जनत्व स्विकारणं बहुतेक लोकांना जमतंचं असं नाही.

  दुस-याला सज्जन समजणं  हे पण सज्जन असण्याचं  मुख्य लक्षण आहे.तुम्हाला कुणी सज्जन समजत नसले तरी आपण प्रत्येकाला सज्जन समजणं आवश्यक आहे.दुष्टांना पण इज्जत देणं सोपं नाही पण सज्जनांची संख्या वाढवण्यासाठी आज पासून आपण ते सुरू करू.मग ?

सुप्रभात

            परशुराम सोंडगे

     ||Youtuber||Blogger||

शनिवार, २५ फेब्रुवारी, २०२३

नशिबाचे रडगाणं



 माणसांना नशिब नावाचं काही तरी असतं.आपल्या आयुष्यात चांगल वाईट काही घडत असते त्याचे कारण नशिब असतं.आजी सांगायची सटई नावाची कुणी तरी एक दैवशक्ती असते. ती आपलं नशिब आपल्या कपाळावर कोरून जाते.तिनं लिहिलं कुणीचं बदलू शकत नाही. हे पटवून देण्यासाठी ती अनेक गोष्टी सांगत असे.त्या गोष्टी  छान असतं.नेमकं सटईने आपल्या कपाळावर काय लिहून ठेवलं आहे हे आरश्यात आम्ही कपाळ न्याहाळत बसतं असतं.नशिबाचे शिलालेख वाचण्यासाठी धडपडत असतं. माणसांना ते दिसतं नाही.

              नशिब सा-यांनाच असतं.ते मागील जन्माच्या तुमच्या पाप पुण्यावर ते अंवलंबून असतं.त्याला प्रारब्ध असं ही म्हणतात.प्रारब्ध बदलता येत नाही. पुढे काय घडणार आहे याचा एक प्लॅनच तयार असतो.ज्योतिषशास्त्र याचं गोष्टीवर अवलंबून असतं.थोडक्यात ज्योतिषी तो प्लॅन समजून घेतात. लोकांना सांगतात.आपलं पोट भरून घेतात.तुमचा विश्वास आहे या गोष्टींवर ?

तुम्ही विश्वास ठेवा अथवा न ठेवता हे घडतं असतं.जे मी घडतं असतं ते माणसाच्या हातात नसतं.भुतकाळ आता लिहून ठेवता येतो. त्यालाचं आपण इतिहास म्हणतो.आठवणींच्या रूपात तो मनात साठवून ठेवलेला असत़ो.भविष्यकाळ आपल्याला कळतं नाही.तिन्ही काळाच ज्ञान असलेला फक्त एकचं देव आहे.सर्वज्ञ भगवान परमात्मा.

  योगायोग तर माणसाच्या आयुष्यात घडतं असतात.कर्मधर्मसंयोग म्हणजे तर नशिबचं असतं,ना? नशिब म्हणा किंवा योगायोग म्हणा जे घडतं असतं ते  आपल्या हातात नसतं.

                 आता ,बघा ना, पाऊसाचे थेंब आकाशातून पडत राहतात.काही गुलाबाच्या नुकत्याच उमललेल्या फुलांवर पडतात.कोवळया उन्हात फुलांच्या कुशीत हसतं राहतात.कुणी चातकाच्या चोचीत पडतात. त्याला तृप्त करतात.कुणी तप्त मातीची तहान भागवतात.कुणी हागणदारीत पडतात.कुणी शिंपल्यात पडून मोती होतात.

        तसचं फुलांचं पण आहे.कुणी देवाच्या पायी,कुणी प्रेताच्या अंगावर ,कुणी एखादं सुंदरीच्या केसात गजरा होऊन हसणं राहतं.एखादंला हाव-या माणसाच्या शेंबड्या नाकात ही हुंगलं जावं लागतं.

आपण कसे वापरले जावं हे काही फुलांच्या  हाती नसतं.नशिबवान कुत्री मर्सिडीज गाडीतून फिरताना पाहिलीच असतील.दारोदार हिंडणारी कुत्री आणि माणसं ही असतातच की.योगायोग म्हणा किंवा नशिब म्हणा.हे घडतं असतं.अनेक मूर्ख चांगल्या खूर्च्या बळकावतात. तसेच अनेक तज्ञ खितपत पडतात.दोन घासासाठी अपार कष्ट करावं लागतं.ताटला लाथ मारणारी माणसं आहेत. चव भुकेत असते. अन्नात नाही. काहीचं गोड न लागणारी माणसं ही असतातच की.


अनेक गोष्टीला आपण व्यवस्थेला दोष देत राहतो. रेल्वेचा अपघात झाला रेल्वे प्रशासन आपल्या ऐरणीवर असतं.संसार नीट चालत नाही आपला डायरेक्ट विवाह संस्थेवरच आक्रमण असतं.लफडी झाली तरी आपण पोर्न साईटवर बंदी आणण्याची मागणी करतो.पूर्वी हे सारी खापरं आपण नशिबाच्या डोक्यावर फोडून मोकळे व्हायचो.नशिबाच्या नाववर अनेक अपयश पचवायची सवय आहे माणसाला.अर्थात यशाचं श्रेयं हे माणस स्वतः च्या प्रयत्नाला देतात. दुस-याचं यशाचं श्रेय आपण नशिबाला देत असतो.नशिब माणसाच्या सोबतीला कायम राहिलेले आहे.निर्माता कायम या जगात विषमतेचे बीज पेरत आला आहे.वर्ण,लिंग ,शरीर, प्रदेश, बुध्दी, सौंदर्य अश्या अनेक बाबतीत माणसा मध्ये भेद केले आहेत.नशेत पबमध्ये नाचणारी धुंद माणसं आणि दोन घासांसाठी तडफडणारे माणसं याच जगात राहतात. माणसं समतेची हाक देतात पण सर्वत्र विषमतेचे राज्य आहे.

ठेवीले अंनते तैसेचि राहवे|चि

त्ती असू द्यावे् समाधान||हा अभंग पाठ करून ठेवला की दु:खात ही आनंद शोधण्याचं बळ येतं. सा-याचं गोष्टी नशिबाच्या हवाली करतात माणसं.प्रयत्न संपलं की नशिबच येत पुढे.ते ब-याचदा सोयीचं असतं.

प्रयत्न असेल किंवा नशिब असेल,योगायोग असेल चित्त समाधानी ठेवा असा सल्ला तुकोबांचा आहे.कर्मवादावर व प्रयत्नवादावर काथ्याकुट करीत बसण्यापेक्षा चित्ताचं समाधान महत्वाचं आहे.हे सोप काम नाही.

चित्ती समाधान....एकचं ध्येय.

सुप्रभात

     परशुराम सोंडगे

   ||Youtuber|| Blogger||़

शनिवार, ११ फेब्रुवारी, २०२३

भावनांचा बाजार

 ||आपलाच संवाद आपुल्याशी|

आंनद असो की दु:ख.माणसाला व्यक्त व्हायचं असतं.राग तर अनावरणचं असतो.ठरवून ही तो आवरता येत नाही.कुणाचा मत्सर तुम्ही झाकून नाही ठेवू शकत. एखाद्यावर तुमचं प्रेम बसलं तर चेहरा प्रेम रंगात चिंब होऊन जातो.तुम्ही एखाद्या प्रेमात आकंठ बुडालेल्या प्रियेशीचा चेहरा पाहिला आहे का?प्रेम रंगाचा उत्सव असतो तिच्या चेह-यावर.सृष्टी पण  ऋतू टाळू शकत नाहीत. पानगळीच्या शिशिर असो असो की अंग अंग पल्लवित करणारा वसंत असो.ऋतू सोसणं ही आलं आणि मिरवण ही आलं.



भावभावनांचे तरंग मनात उठले की ते चेह-यावर उमटतं जातात.चेहरा एलडीच्या स्क्रीन सारखा असेल का?कळत नकळत भावरंग आणि भावरेषा  चेह-यावर उमटतं राहतात.काही गडद काही पुसटं.....

 भावचित्राचं विलोभनीय प्रदर्शनच असतं चेह-यावर.

माणसं फार चतुर तरी काही भावना लपवून ठेवतातच.मनात कोंडुन ठेवतात भावनांना.अवखळ जनावर कोंडून ठेवावे कोंडवाडयात तश्या कोंडतात मनात.भावना ही  उलगडून दाखवण्यासाठी खास असं आपलं माणूस असावं लागतं.डोळयातील आश्रूचे ही तसचं आहे.त्यांना सुध्दा हक्काचं माणूस असावं लागतं ओघळण्यासाठी.आपल्या हक्काचं माणूस समोर असलं की ते नुसते घळाघळा ओघळत राहतात.पुसणारं कुणीतरी हवं असतं त्यांना .कुणीतरी पुसलं जावं म्हणूनच तर  ते ओघळत असतात ना?आश्रूचे आयुष्यचं कितीकस असतं? फक्तं काही क्षणाचं.

 आपण आपलं समजतो पण ती माणसं आपली असतां असं नाही. आपल्या भावनांचा ही काहींना बाजार भरवायचा असतो.

मोर नाचतात

पिसे सांडतात.

माणसं त्याचा ही

बाजार मांडतात.

आपल्या ह्रदयाचे खेळणं करून त्याचा खेळ मांडणारे चतुर लोक  या जगात पुष्कळ आहेत.आपण सारं सारं सांगत राहतो.ते त्याचं भांडवल करत राहतात.तुमच्या  व्यक्त होण्याने कुणी मनोरंजन तर करत नाही ना? एखाद्याच्या गळ्यात पडून आपण रडतो तेव्हा त्याचं मनोरंजन करायचं म्हणून आपण रडतो नसतो. काळजातल्या दु:खाचा निचरा करायचा असतो.प्रत्येकालाच आपली कदर  असतेच असं नाही.दु:ख झालं म्हणून कुणी नाचत नाही.आंनद झाला म्हणून कुणी ऊर बडवत नाही.

नृतिका आपल्या समोर नाचते तेव्हा तिला आपलं मनोरंजन करायचं असतं.उरातलं दु:ख झाकून ती व्यक्त होत असते तालासुरारोबर.चित्रपट नाटकात नटव्या भावभावनांचा तो बाजार असतो. आपल्या भावनांचा बाजार तर कुणालाचं मांडण्याचा नसतो.आपल्या व्यक्त होण्यानी कुणी मनोरंजन करून घेत असेल तर?तुम्ही काय करणार? 


मी माझं दु:,ख असं  कुणाजवळं ही जाहिर नाही करणार.माणसाची पारख करणारं. कुणाच्या तरी खांदयावर डोकं ठेऊन  रडणं मला ही आवश्यक आहे.इतकं दु:ख तर माझ्याजवळ आहेच की. हक्काचा खांदा शोधवा लागेल. मी माझ्या प्रेमाच्या माणसाचा शोध घेणं सुरू केलं आहे.आज एवढंच ठरवू. कुणाच्या भावनांचा बाजार नाही मांडायचा.कुणाचे तरी अश्रू पुसायचे.विश्वसानं कुणाचे तरी डोळं पाझरावेत आपल्यासमोर इतकं कुणाचं तरी व्हायचं.श्रीमंत व बुध्दीमान होण्या इतकं ते सोप नक्कीच नाही. 

सुप्रभात.

             परशुराम सोंडगे

      ||Youtuber||Blogger||

सोमवार, ६ फेब्रुवारी, २०२३

आनंदाचे गाणे - कष्टाचे तराणे

गेल्या दोन आठवाडयापुर्वी एक रील्स प्रचंड व्हायरल झाली.एक ऊसतोड कामगांर असलेल्या कपल्सची ती रिल्स होती.भर रस्त्यावर ऊसाच्या गाडीवर ती शूटं केली होती.ओठावरलं गाणं आणि गोड हास्यात चिंबलेले त्यांचे चेहरे.... महाराष्ट्राला फार काही सांगून गेले.

त्यांच्या चेह-या वरील हसू अनेकांना अप्रुप वाटलं.अप्रूप  वाटणारचं ना?काम करताना रडगाणे आणि ग-हाणे गाणारांना तर ते आश्चर्यचं होतं.

अरे,असं हासतं हासत काम करता येऊ शकतं?

वेतन आयोग,भत्ते ,सवलती आणि मोठं मोठे पॅकेज देऊन ही  हे  हसू आणि गाणं आपणं  कर्मचा-यांच्या ओठांवर नाही आणू शकत.

   कामातला आंनद आपण हिरावून बसलो की तेचं काम सक्त मजुरी वाटू लागते.मजबूरी आपल्याला  गाणं नाही तर रडगाणे देते.रडगाणे ऐकायला कुणालाच आवडतं नाही.



      रिल्सं  व्हायरल करण्यासाठी शार्ट कपडे घालून प्रसिद्ध रील्स स्टार असलेल्या परपुरूषाच्या  मिठीत शिरणा-या लोंचट स्त्रिया काही कमी नाहीत.प्रसिध्दीचा हव्यास व लोचटपणाशिवाय त्यांच्या मेकअप चोपाडलेल्या चेह-यावर तुम्हाला दुसरं काय दिसलं?

आपल्याचं कुंकवाच्या धन्यासोबत आपल्या फाटक्या साडीत कष्ट करताना हासत हासत गाणं गाणारी स्त्री जीवनाचं  सारं सर्वांना सांगून गेली.लोचटपणा व कसलाचं हव्यास नाही दिसला तिच्या चेह-यावर....

आपला रील्स व्हायरल करून व्हयूजस् आणि  फालोअर्स वाटायचे तर नक्कीच नव्हते त्यांना.त्यांना फक्त हसायचं होतं.गाणं गायचं होतं.आपल्या आनंदाचं प्रदर्शन प्रत्येकाला हवं असतं.आंनद आपण लपवून नाही ठेवू शकत.आंनद फक्त माणसांनाच नाही तर प्रत्येक जीवालाच उधळून द्यायचा असतो.आनंदी माणसं पाहिली तशी तुम्ही आनंदी प्राणी पण पाहिली आसतीलच.आपल्या आंनदचा दरवळ सारीकडे व्हावा ही इच्छा सर्वांचीच असते.

कष्ट करताना गुणगुणे  किंवा गाणं गाणे नवीन नाही.शेतात काम करताना भल्लरी हे गीत म्हटल जातं असे.विहीरीवर मोठं हाकताना,रानात मोघडा -पाळी घालताना लावो घातलं जायचं. लावोनं शिवारं दुमदुमून जायचं.तिफणं गीत ही असायची.जात्यावरल्या ओव्यात ही गावं पहाटे पहाटे रमून जायची.शेतात इर्जीक घातली की ढोल ताश्या वाजून काम करण्याची पद्धत होती.कोळीगीत ही कष्ट करा-यांच गीत आहे.काम करताना  सामुहिक नृत्य केली जायची.आपल्या कामात आंनद निर्मितीसाठी लोक प्रयत्नशील असतं.थोडक्यात पूर्वी  माणसं आपलं कामं एन्जाॅय करायची.तुम्ही तुमचं काम एन्जॉय करता का? करत असाल तर तो आंनद शेअर करा.करत नसाल तर आज पासून सुरू करा.  बघा,आंनद कसा खळखळून वाहतो ते. 'तू जो हसते...'हे त्यांच रील्स  आहेच की सोबतीला.आपला ही एखादं रील्स बनवायचं का काम करताना ?  होऊनचं जाऊ द्या.

सुप्रभात

               परशुराम सोंडगे

      || YouTuber||Blogger||

शनिवार, २१ जानेवारी, २०२३

सत्याचा शोध प्रवास


 || आपलाचं संवाद आपुल्याशी||


हे जग आहे त्याचं एक कारण आहे. कारणाशिवाय काहीचं असू शकत नाही असं गृहीत धरून तेच कारणं युगेनोयुगे माणसं शोधत आहेत.कधी धर्माचं साधन तर कधी विज्ञानाचं माध्यम घेऊन माणसं धडपडत आहेत.

माणूस हाच सर्वात बुध्दीमान प्राणी आहे हे माणसांनं स्वतःजाहिर केलेले आहे. दॅटस् इट्स.

धर्म असेल किंवा विज्ञान असेल दोन्हीच्या माध्यमातून माणसांनी हाच प्रयत्न केलेला आहे.प्रयत्न अजून ही चालूं आहेत.अंतिम सत्य अजून तरी कुणाच्या हाती लागलं नाही.तसा कुणाचा दावा ही नाही.आजच ज्ञान उद्या अज्ञानात रुपांतरित होत जाते. आपण जे खरं समजतं असतो.तेचं काही दिवसांत मिथ्य ठरवले जाते.सत्याचा हा शोध प्रवास अखंडित पणे सुरूच राहणार आहे. 

मलाच  फक्त समजतं,मीच तेवढा शहाणा आहे अशी अतिशहाणी माणसं तुम्हाला पावलोपावली भेटतं असतील.त्यांना पाहून तुम्हाला काय वाटतं? हे महत्वाचं आहे.

              तुम्ही त्यांच्या पेक्षा जास्त हुशार किंवा शहाणे असण्याचा साक्षात्कार होतो की त्यांची दया येते? का तुम्हीचं स्वतः जगात. सर्वात हुशार असण्याची दाटं शक्यता वाटते? खरं  काय ते तपासुन बघा स्वतः:ला. आत्मप्रौढी असणारा माणूस सर्वात जास्त अज्ञानी असण्याची जास्त शक्यता असते.माणसाला आत्मभान असणं महत्वाचं आहे

     स्वत:चे जयजयकार करणारे व टोळी ट़ोळीने खुशमस्करी करणारे असंख्य माणसं पाहून तुम्हीही  स्वतःच्या मोहात पडण्याची शक्यता असते किंवा त्यांना शहाणं करण्याचा तुमचा प्रयत्न  तरी असू शकेल पण

असं  तुम्ही काहीचं करू नका. यावर उपाय एकचं आहे.चंद्रशेखर गोखले यांच्या शब्दांत सांगतो.

इथं प्रत्येकालाचं वाटते

आपण किती शहाणे?

यावर उपाय एकचं

गप बसून पहाणे.

गप बसणे  हा सर्वात सोपा उपाय आहे. पटतं ना ?

आज अतिशहाणा समोर गप राहण्याचा प्रयत्न करू.

                       परशुराम सोंडगे

           ||Youtuber|| Blogger||

शुक्रवार, २० जानेवारी, २०२३

शूभेच्छांची मांदीयाळी

 ||आपुलचं संवाद आपुल्याशी||

आज मक्ररसंक्रांतीचा दिवस.सण आनंदचा,सण समृध्दीचा, सण सौभाग्याचा.सण सुवासिनीचा...!!!

कालपरवा पासूनचं मकरसंक्रांतीच्या शुभेच्छा मोबाईल वर येऊन धडकत असतील.शुभेच्छांचा नुसता वर्षाव सुरूच असेल.हल्ली प्रत्येक सणाला माणसं कमालीचं शुभेच्छूक होताहेत.सोशल मिडीयावर धो धो शुभ संदेश कोसळतं आहेत.जे सहज देता येतं ते माणूस देतं.शुभेच्छा....!!

सण म्हटलं की संसाराच्या दगदगीत आलेली थंडगार झुळूकच असते माणसाला.माणसं स्वतः ला कुठं कुठं बांधून घेतात.सण म्हटलं की तेवढच निमित्त...व्यक्त होण्याला.दुसरं काय?असो.

मकरसंक्रांत हा तसा देण्या-घेण्याचा सण.वाण लुटण्याचा सण.वाण लुटू देण्याचा सण.आपल्या शेतात पिकलेले दुस-याला देणे. वाणोळा देणे.वाणोळा घेणे.बोरचं ती पण प्रत्येकाच्या बांधावरल्या बोरीची चव वेगळीच की.वाणोळा म्हणून दोन चार चाखायची.

लहानपणी या सणाचं केवढ अप्रूप असे.काय खावं आणि काय नाही खावं हा प्रश्न असे आम्हा पुढे. सारी रानं पिकानं बहरलेली बावरलेली असतं.काही पिकं रसानं चिकांनं ओथंबलेली असतात.थंडी वाढत चाललेली...सूर्याचं उन्हं ही गारठा घेऊन येणारं...दिवस शिळू झालेले....दिवसांन आपलं थोडं आयुष्य रात्रीला दिलेले. त्यामुळे रात्र  ही थोराड होत गेलेली.

त्या दिवसांत हा मकरसंक्रांतीचा सण हळूच येतो. बोरं,पेरू,ऊस,हुरडा,गाठं,वाल,

गाजर अश्या अस्सल रानमेवांनी घराची पराळं भरून गेलेली असतं.कुणी यावं जे आपल्या नाही ते न्यावं.समृध्दी अशी दारादारातून खळाळून वाहत असे.सुवासिनी नटून थटून वाणं लुटत असतं.घराच्या मालकीण बाईच़ ना त्या  ? काय तो रूबाब ?काय तो तोरा ?सुगडची सुगड भरून वाण दिला जायचा. घेतला जायचा.

घरातलं सारं सौंदर्य, ऐश्वर्य, औदार्य आणि सौभाग्य

घेऊन त्या गावभर फिरत राहयच्या.हळदी कुंकवांने माखलेले सौभाग्यवतीचे कपाळ,भांगं म्हणजे कोण भाग्य असे.आताच्या सारखी घडीघडीला फोटो काढून ठेवायची  सोय नव्हती पण अंतःकरणात आपलं खानदानी सौंदर्य कोरून ठेवलं जायचं.लेकी सूनांना डोळं भरून पाहिलं की मन ही भरून यायचं.आपल्या सुरकुत्या चेह-यावरून समाधानचा पाझर ओसंडून वाहायचा.

तिळाचे गुळाचे लाडू  घरोघर वाटले जायचे.गोड गोड बोलण्याचा आग्रह धरला जाई.नाती,लोभ,मैत्री अधिक स्निग्ध केली जाईत.स्नेहाद्रता वाढली जाई.वाणाच्या वस्तू बरोबरचं माणसांच्या मनामधील प्रेमाचं,आपुलकीचं वाणं ही भरभरून लुटलं जाई.प्रेम आपुलकी  लुटण्याची संधी हा सण देई.

अनेक जणांची जुनी भांडणं थोरं मोठी लोक तीळाचे लाडू भरून मिटवत असतं. सलोख्याचं चांदण असं मुद्दाम होऊन पसरलं जाई.

आता सारंच हरवतं गेलं.

आता वाणांची दुकानं थाटतात.वाणं  ही विकले जातात. वाणोळा कुणीचं कुणाला देत नाही.

खरेदी विक्रीला आपणं वाणं लुटणं म्हणू शकत नाहीत.आपण वाण विकत  आणतो.मालकीणीचा  जो वाण देताना तोरा असतो तो वाण विकत  घेताना कसा असेल? आवं पांघरूणच सण साजरा करावा लागतो.

तेव्हा गोड बोलण्याचा आग्रह असे.लोक कठोर बोलतं.खरं खरं बोलत.ते कडू लागे.काही दुरावलेली मनं जवळ आणण्यासाठी तिळगुळ असे.

आमचा तीळगूळ सांडू नका

आमच्या संगे भांडू नका.

आता माणसं सरार्स गोड बोलतात. हे बरंयं.गोड बोलण्यानं मधुमेह होत नाही.नाहीतर मधूमेहाच प्रमाण वाढलं असतं. किती गोड बोलतात माणसं? भांडत नाहीत पण गेमचं करतात.अबोला धरतात.छोटया छोट्या भांडणातून माणसंचं मन मोकळं होई.रागाचा निचरा होई.राग मनात कोंडून ठेवला की त्यांचं कपटं  होतं.सूडाची भावना   वाढू लागते. सुटाने पेटलेली मनं तीळगूळ घ्या गोडव्यांनं निव्वळत नाहीत.सोशल मिडियावरच्या शुभेच्छा संदेशनं हे कितपत घडतं असेल? जुनी भांडणं विसरून एखाद्याला बोला.फक्त बोलणं आवश्यक आहे.संवाद सुरू राहतो. दुरावलेले संवाद सुरू करू जमलं तर आज.

मकरसंक्रांतीसाठी मेकअप करून मिळेल असे बोर्ड ही हल्ली असतात.मक्ररसंक्रांतीला स्पेशल शुटं ही केलं जातं.

 आता जी साधन उपलब्ध आहेत त्याचा वापर होणारं.त्यांचा वापर करून सण उत्सव साजरे होणार. आंनदाचे कण कण गोळा केले जाणारं.ती खरी  माणसाची गरज आहे.सण साजरा करा पण उत्साहाने.त्या उत्साहातचं आनंदाचं चिमूटभर चांदण घरभर पसरेल.दुसरं काय ?

मकरसंक्रांतीच्या खुप शुभेच्छा...!!

         परशुराम सोंडगे

      ||Youtuber||Blogger||

खरं कधी कधी बोलूया

 ||आपलाचं संवाद आपुल्याशी ||


कधी कधी खरं बोलूया.

*************************

 शालेय जीवनात अनेक सुविचार आपल्या कडून गोठून घेतले जातात.घरात ही माणसं मुलांवर चांगले संस्कार करायचे म्हणून सदैव उठता बसता संस्काराच्या उपदेशाचे डोस पाजत असतात.

त्यात 'माणसांनं खोटं बोलू नाही.' हा सुविचार प्रामुख्याने सांगितला जातो.

मुलांचं मन निर्मळ असतं.ते निरागसं असतं. कोवळ मन नाजूक असतं.थोडक्यात काय तर मुलांची. मन संस्कारक्षम असतात.काही संस्काराचे बीज आपण त्यात  पेरले तर उगवू शकतात.खरं बोलणं हा सुविचार माणसाच्या मनात का रूजतं नाही. मूलं जसं मोठं मोठं होतं जातं तसं तसं ते अधिक लबाड बोलत राहतं.खोटन बोलण्याची एक कला आहे .ती हळूहळू आत्मसात करत राहतं.

     खोटं  बोलणं हे एक चातुर्य समजलं जातं.जी माणसं सराईतपणे खोटं बोलतात त्यांना हे जग व्यवहार चातुर्य समजत. खरं बोलणारांना अर्थात च मूर्ख समजलं जातं.आपण मूर्ख आहोत हे मान्य करणारा सज्जन माणूस अजून या पृथ्वीतलावर अवतारायचा आहे.त्यामुळे या जगात जिकडे तिकडे सदैव सातत्याने कारण असताना काहीच किरण नसताना ही माणसं खोटं बोलत राहतात.

      कधी कधी तुम्ही काही मिनिटे ही खरं बोलून बघा.कसला गजब होतो. काही मिनिटे ही तुम्ही खरं खरं बोलू शकत नाहीत.अनुभव घ्या.हे जग फक्त माणसं खोटं बोलू शकतात या एकाच गोष्टींवर चालते आहे याचा दिव्य अनुभव तुम्हाला येईल.

आश्चर्य याचं वाटतं की माणसं सदैव खोटं बोलत राहतात पण खरं बोलण्याचा आग्रह  कायम धरत असतात.इतकं पण खोटं बोलू नाही अशी माफक सज्जनतेची आलं पांघरणारी  अपेक्षा ही हल्ली करतात.

मापात,पचलं असं खोटं बोलावं  अशी इच्छा करतात.पचवू शकालं इतकं खोटं बोलणं अपेक्षित असते.

बाबांना खोटं बोलला म्हणून मुलांचं कौतुक करणारी आई याचं जगात आहे.वरिष्ठांना खोटं बोलून आॅफीस मधल्या गोष्टी लपवून ठेऊ शकला म्हणून पार्टी देणारी घेणारी माणसं ही असतात की.छान आणि पचलं इतकं खोटं बोललं म्हणून कोतुक करणारी गुरुजी तुमच्या आयुष्यात आलेच असतील. बाॅयफ्रेंड आणि गर्लफ्रेंड असत्याचे निस्सीम भक्त असतात.

सत्याच्या बेगडात  खोटं गुंडाळून ते आपल्याला बाजारात विकायचं असतं म्हणून हे जग खोटं बोलते आहे. बोलत राहणारं आहे.

बरं,खोटं बोलण्याचं काही परिमाण नाही. त्यामुळे माणसं किती खोटं बोलतात हे मोजता येत नाही.माणसं किती ही  स्पेशलं खोटं बोलू शकतात! 

 माणसं खोटं का बोलतात ? प्रत्येकाची कारणं वेगळी असतात. कधी कधी माणसं काहीचं कारणं नसताना ही खोटं बोलतात.उगीचं खरं काय बोलावं म्हणून माणसं खोटं बोलतात.फोनच्या संवादामध्ये  सर्वाधिक खोटं बोल जातं.खरं बोललं तरी काही हरकत नसते  तरी माणसं स्पेशल खोटं बोलतात. सामुहिकपणे एका सुरात खोटं बोल जातं.पक्षाचा नेता खोटा बोलला की सारा पक्ष तेचं बोलत राहतो.मिडीयापणे एका सुरात खोटं बोलत राहतात.

 राजकरणात माणसांनं खरं बोलू नाही असा एक राजकरणचा मंत्रच आहे.खरं बोलणा-या माणसांनी राजकरणात पडू नाही असा ही एक सल्ला  दिला जातो.

या जगात एकदम खरं बोलणारा माणूस असण्याची सुतराम शक्यता नाही. त्यामुळे जगातील सर्व  लोक राजकारण प्रिय आहेत.राजकारणी आहेत.घराघरात काय कमी राजकारण असते?

राजकारणात फेकू आणि  नौटंकी करणा-या माणसांचा सक्सेस रेशव  जरा जास्त आहे. सहसा लबाड आणि नटवं बोलणारी माणसं राजकरणात यशस्वी होतात.

    ही माणसं लबाडं बोलतात हे माहीत असून ही  लोकं त्यांना डोक्यावर घेतात.आपला नेता मानतात.

  'माझे सत्याचे प्रयोग' हे म.गांधीचं पुस्तक तुम्ही वाचलं असेलच? खरं बोलणारी आणि वागणारी माणसं या जगानं चक्क खोटी करून टाकली आहेत.

खोटं बोलण्याची सवय लागली आहे माणसांना. 

माणसं किती ही खोटं बोलत असली तरी विजय सत्याचा होतो.सत्य अजिंक्य असतं. आपल्या देशाचं ब्रीदचं सत्यमेव जयते आहे.ते उपनिषदांतून घेतलेले आहे.सत्याचा आग्रह हा फार प्राचीन आहे.युधिष्ठराला ही खोटं बोलायला लावणारा सर्वज्ञ भगवान परमात्मा आपलाचं देव आहे.आपण त्याचेच अंश आहोत.

देशाचं ब्रीद आहे सत्यमेव जयते म्हणून या देशासाठी थोडं थोडं खरं बोलण्याचा सराव सुरू आज सकाळ पासून. 

जपून हं. सत्य कडू असतं.खरं बोलणं की सख्ख्या आईला पण राग येतो.

 सुप्रभात....!!!

              परशुराम सोंडगे

             ||Youtuber||Blogger||

जगजेत्ते जंतू

 ||आपुलचं संवाद आपल्याशी|

हे जग सा-यांच आहे.प्रत्येक प्राण्यांच,कीटकांच,वनस्पतींचं. ज्यांनी ज्यांनी  या पृथ्वीवर जन्म घेतला आहे त्या सर्वांचं हे जग आहे.

फक्त माणसांचं एकट्याचं हे जग नाही.माणूस मात्र हे जग आपलं एकटयांचं आहे असं  समजतो.

कुणी काय समजावं  हा ज्याचा त्याचा खाजगी प्रश्न आहे.

बेडूक सुध्दा त्याच्या जागाचा राजा असतो.भलं आपणं त्याला डबकं समजतं असलो तरी. त्या डबक्याला आपण जग समजतं नाही पण बेडकांची ते जग असतं.

 जंगलाचा राजा सिंह असतो.अर्थात टोळयांनी तर त्यांना पण राहवचं  लागतं.एखादया समुद्रातल्या राजा शार्क मासा असतो.प्रत्येक मोठा मासा लहान माश्याला खात असतो. मासेचं माश्याला खातात असं नाही.बोके ही आपलीं पिल्लं खातो.माणसं ही माणसांचं  शोषण करतात. माणसं माणसाला खातात.(मी बातम्या वाचल्या आहेत. काही हाॅटेल मधून माणसाचं मानस खायला दिले जात होते.) असो.

मोठी माणसं लहान माणसाला गुलाम करतात. शोषण करतात.आपलं वर्चस्व या जगावर ठेवण्याचा प्रत्येक जीव प्रयत्न करत असतो. 

कोणे एके काळी डायनासोरची सत्ता या जगावर होती म्हणे.

    आता दोन वर्षा पूर्वी करोना व्हायरस एका विषाणूने हे जग काबूत केलं होतं.माणूस त्या लढाईत सध्या तरी  अंशतःजिंकला आहे.पूर्णता नाही.जेव्हा दुसरा जीव आपल्या वर आक्रमण करतो तेव्हा  तो जीव एकी करतो.सापावर तुटून पडलेल्या  मुंग्या तुम्ही पाहिल्याच असतील.माणूस ही या लढाईत काही प्रमाणात एक झाला होता.

करोना कालाचं अजून ही घाणरेडं राजकारण माणसं करतचं आहेत.

माणुस हा सदैव अजिंक्यच राहिल असं नाही.त्याचा ही पराभव होऊ शकतो.हे जग कुठला ही जीव जंतू जिंकू शकतो. काबिज करू शकतो.

  परीवर्तन अटळ असतं. परिवर्तन या जगाचा नियम आहे. सत्तांतर होत असते. ग्रमापंचायती ताब्यातून जातात हे तर जग.

मानवतेपेक्षा ही भूतदयेला संतांनी फार महत्व दिलेले आहे. जगाला कुटूंब मानण्याचा आग्रह संतांनी धरलेला आहे.

माणसावर तर प्रेम कराचं पण प्रत्येक जीवावर प्रेम करा.ह्रदय प्रेमाने पाझरू दया. प्रेमाने जग चिंब होऊ द्या.

जग फक्त प्रेमानीच  जिंकता येत नाही, का?

           परशूराम सोंडगे

       Youtuber||Blogger||

संख्या रेषा आणि आयुष्यरेषा

 ||आपलाचं संवाद आपुल्याशी||

विद्यार्थ्यांना शिकवायचं म्हणून मी एक संख्या रेषा फळयावर काढली.शून्यातून दोन्हीही बाजूंनी वाढतं जाणा-या धन आणि ऋण संख्या.

रेषा अनंत असते.प्रतल ही अनंत असते.आरंभ ही अंनत आणि शेवट ही अनंत असलेली रेषा.

भूमितीय संज्ञा समजून घेताना मला नेहमी सारखंचं तत्वज्ञानाच्या काही संकल्पना मनात खुणावू लागल्या.खरचं शेवटचं नाही असं काही असू शकत? फक्त अनंत..???

अंनत विश्वाची, ब्रम्हांडाची किंवा अंनत कालाची कल्पना आपण नाही करू शकत.ती आपल्या बुद्धीची मर्यादा आहे.असो.

      आपलं आयुष्य पण एक रेषाच आहे.काळाच्या अवकाशात वाढत जाणारी रेषा.संख्यारेषेसारखी.भूतकाळ  व भविष्य काल अनंत असलेली. वेदांत तत्वज्ञानाच्या कल्पसिध्दांता प्रमाणे आपण कालचक्राच्या अंनत प्रवासात आहोत.वाढत वाढतं  जाऊन पून्हा शून्य होणारं.शून्यातून पुन्हा हे विश्व व्यापतं जाणार.

मृत्यू  हा कोणत्याचआयुष्याचा शेवट नाही असू शकत.तो एक टप्पा असेल.आयुष्यचा रेषा खंड असतं नाही. मृत्यू हा जीवाचा शैवट नाही तर एका देहातून दुस-या देहात स्थलांतरणंअसते. वैदिक तत्वज्ञानानुसार.विज्ञान तर जन्म मृत्यूचं अजून ही योग्य स्पष्टीकरण ही देऊ शकलेलं नाही.जन्मानंतरच व जन्मापूर्वचं आयुष्य विज्ञान मान्य करत नाही.तसच़ ते नाकारू ही शकलेलं नाही.

         आपलं जन्ममृत्यूच्या फे-यात भ्रमण अनिवार्य असलं तर आपण मृत्यूला का घाबरतो? जीवाच्या बाबतीत मृत्यूपेक्षा भयंकर भीतीप्रद असं दुसरं काय आहे? माणसांनं निर्भय असलं पाहिजे. निर्भयता ही मनाची एक अवस्था आहे.छातीवर गोळया झेलणारे वीर सैनिक,हसत हसत फासावर जाणारे स्वतंत्र वीर.मृत्युला हसत हसत कवटाळून अनंताच्या प्रवासाला जाणारे अनेक माणसं तुम्ही पाहिले असतील.भिती ही कल्पना आहे.कल्पनेचं माणसं खचून जातात. निर्भयता ही जीवनाची आवश्यकता आहे.

 बघा,मन निर्भय बनवा.आयुष्य अधिक सुंदर होईल.

       सुप्रभात

                     परशुराम सोंडगे

               || Youtuber||Blogger||

चेहरा वाचन

 ||आपुलाचं संवाद आपुल्याशी||


किताबे बहूत पिढी है तुने |

मेरा चेहरा मी जरा पढो||

बता दे मेरे चेहरे पे क्या क्या लिखा है||



 हे बाजीगर चित्रपटातील गाणं फार लोक प्रिय झालं होतं.मला तर ते खूपचं आवडलं होतं.चेहरा पण वाचला जाऊ शकतो हे मला तेव्हा कळलं होतं.पुस्तकं वाचायचं  सोडून मी चेहरे वाचत सुटलो होतो. अर्थात चेहरे वाचत बसणं सोपी गोष्टं नसते.फार रिस्की कामं असतं. ते काही दिवस मी करण्याचा प्रयत्न केला होता.चेहरे वाचण्याची काही लिपी वगैरे असते का?  लिपी वगैरे काही माहित नाही पण कला मात्र जरूर आहे. त्या माणसाला न कळता आपण त्याचा चेहरा वाचू शकतो.प्रत्येक जणचं ते वाचत असतो. पोलिस खात्यातील लोक चेहरे वाचण्यात तरबेज झालेली असतात. 

ओळखीच्या आणि अनोळखी माणसांचे पण आपण चेहरे वाचत असतो. समोर आला की आपण त्याला स्कॅन करत असतो.मनाच्या मेमरीत ते एकदा. डाऊन लोड केले की पुन्हा पुन्हा त्याला वाचत बसतो.आपल्याला भेटलेली सारीच माणसं लक्षात राहत नाहीत.सारीच माणसं कुठल्याश्या नाजूक नात्यांच्या धाग्यात गुंफली जात नाहीत.ह्रदयातल्या आपुलकीच्या ओलाव्यांन  ओथंबून येतं नाहीत. बोलल्याशिवाय माणसाचं मन कळत नाही आणि दिसणा-या सा-यांच माणसाला आपण बोलू ही शकत नाहीत. सारीच माणसं आपल्याला कशाला बोलत बसतील?आपण नुसतं पाहून ही माणसं समजून घेत असतो. तसाच प्रयत्न असतो आपला.माणसाचे चेहरे  पण बोलके असतात.

              तुम्ही कुण्या नटाच्या किंवा नटीच्या प्रेमात पडलाय का कधी?एखादा खेळाडू,एखादी माॅडेल तुम्हाला जाम आवडली असणार.त्यांना आपण कधी भेटलेलो नसतो.भेटणारं ही नसतो. तरी ते आपल्याला का आवडतात?एखाद्या गर्दीत एखादा चेहरा मनात रूतून बसतो.संपूर्ण अनोळखी गर्दीत सुध्दा आपल्याला काही माणसं प्रेमळ, काही खडूस,काही लबाड,काही क्रूर,काही समजस़ वगैरे वाटत राहतात.अर्थात आपण त्यांना भेटलेलो नसतो.आपला चेहरा वाचला जातोय हे लक्षात आलंयं म्हणून ही काही सावरलेली, बावरलेली माणसं आपण पाहतो.

आपण जरं वाचलं जाणारं असू तर आपण सावध राहायला हवं ,नाही का? चेहरा प्रसन्न, सोज्वळ ठेवावा लागेल.अंतरंगच चेह-यावर उमटतं जातं.ते लपवता येत नाही.अ़तरंग चांगल कसं करायचं?चांगली पुस्तके आणि चांगली माणसं वाचायची. मग सोप्पं की. काय?

 सुप्रभात

           परशुराम सोंडगे

        || Youtuber|Blogger||

स्पेशल माणूस

 ||आपुलाचं संवाद आपुल्याशी ||



 हे जग आपलंच आहे.जगात असंख्य माणसं राहतात.इतक्या माणसाच्या गर्दीत फक्त आपल्यालाचं आवडणारी माणसं असतं नाहीत.आपल्याला आवडणारं माणूस दुस-याला आवडणारचं नाही असं ही नाही.आपल्याला अजिबात न आवडणारी माणस़ ही आपल्या अवतीभवती सगळीकडे असतातचं.

एकच माणूस अनेकां

ना ही आवडू शकतं.आवडण़ ही सपशेल खाजगी गोष्टं आहे.

आपण कुणाला तरी आवडतो ही गोष्ट माणसाला प्रच़ड आनंद देणारी असते.असं झालं की  या जगात उन्हाचे चांदणे होते.आयुष्याच़ एक सूरेल गाणे होते.आयुष्याच्या को-या कागदांवर अनेक रंग सजत जातात.अनेक स्वप्नांचे मोरपंखी दिवस  रेंगळत  राहतात.

  जगात आपलं आणि फक्तं आपलंच कुणीतरी असावं असं वाटतं पण सहसा स्पेशल आपलं असं कुणी असतं नाही.

 आपल्या आवडीचा माणुस आला की आपण स्पशेल चहा करतो,स्पेशल डीश बनवतो.असं म्हणतात की प्रेम ,जीव ओतून जर आपण काही पदार्थ बनवला तर त्याला प्रेमाची चव येते.तसं स्पेशल मनचं बनवलं कुणासाठी तर? मन सुंदर आणि गोड करण्याची पण काही रेसेपी  असते का?

असते की.सदैव हसतमुख रहा.तुम्ही समोरच्यासाठी स्पेशल होऊ शकता.

सुप्रभात

              परशुराम सोंडगे

        || Youtuber||Blogger||

समजासेवेची ढोंगं

 ||आपलाचं संवाद आपुल्याशी||

   आता तुम्ही पाहिलेलं असतील गावागावात  समाज सेवेची संधी मागणारी अतिशय नम्र झालेली माणसं.समाज सेवा करण्यासाठी पण  किती आग्रही होतात माणसं, नाही?किती लाचार आणि लोचटं होतात माणसं? वाघा सारखी गुरगुरणारी माणसं  कुत्र्यासारखा गोंडा घोळतानी पाहिलेच असतील.लोकशाहीची जादू आहे ही.

राजकरणात माणसं खरं बोलत नाहीत. ते भयंकर चांगलं बोलतात.ते कधी कधी इतकं गोड असतं पचत  पण नाही.गद्दारी,फितुरी करणारी माणसं चतुर समजली जातात. राजकरणात असंच असतं हा  सुविचारचं करून टाकला आहे लोकांनी.

निवडून येणं महत्वाचं.कसा आला याला हल्ली लोक फारसं महत्व देत नाहीत.राजकरणाण  कायम शत्रू आणि मित्र नसतात तसचं मार्ग आणि गैरमार्गा हा ही प्रकार मानला जात नाही.

राजकारण हे एक करिअर झालं.व्यक्तीगत स्वार्थाला महत्व दिलं गेले आहे. व्यक्तीगत आणि  समुहाचं तुष्टीकरण सुरू झालं आहे.समुह म्हणजे  जाती आणि धर्म तसेच व्यवसायिक वर्ग उदा. नोकरदार, कामगार, शेतकरी, मजूर, बेरोजगार. तुष्टीकरण ही गंभीर समस्या बनली आहे.शोषणा पेक्षा ही भयंकर  असतं तुष्टीकरण.  मतासाठी फसव्या अभासी अश्वसनांची  खैरात सुरू झाली.सुंदर सुंदर स्वप्नाच्या झालरी फडफडू लागल्या.राजकारणातून सत्ता,सत्तेतून राजकारण. हे चक्र फिरतचं राहणार असतं. त्या चक्रातचं लोक फिरत राहतात.

विचारापेक्षा संधीसाधूपणाला महत्व आलं आहे.व्यक्तीस्तोम माजलं आहे. पक्षातील व्यक्तीच्या पूजा होऊ लागल्या आहेत.राजकरणात असचं असतं.गद्दारीला फितुरीला प्रोत्साहन दिलं जाऊ लागलं.आमिष आणि प्रलोभन देऊन दुस-याच्या कळपातील माणसं आपल्या कळपात घेणं सुरू झालं.फितुरीचं,गद्दारीचं उदात्तीकरण सुरू झालं आहे. लाॅबिंग सुरू झालं.आपला तो बाब्या....

चुकीचं समर्थन आपण समजू शकतो पण त्या गद्दारीचं  उदात्तीकरणं सुरू झालं. उदात्तीकरणासाठी चालाखपणे त्याचं समर्थन केले जाते.नीतीमुल्याची बेगडं त्यावर लपेटली जातात.स्वार्थ आणि आपला अहंकार कुरवाळणारी माणसं सर्वांनाचं  आवडतात.  अस्मिता हेरून त्यावर बोट लावून राजकीय मंडळी  गुदगुल्या  करत राहतात. त्या गुदगुल्यातूनचं लाचाराची फौजची फौजचं उभी राहते. पक्षातील सत्तेत असलेल्या महवाच्या  व्यक्तीचे पाय चाटतानी अनेक लोक तुम्ही याची डोळा पाहिले असतील.जो आपल्या कक्षेत आपण होऊन येत नाहीत.त्यांना खेचून घेतले जाणार,त्यांना तोडेन मोडून टाकले जाणार हे अपरिहार्यचं असत.राजकरणात असंच असतं म्हणून आपण ही ते स्वीकारणार का? हे सारं लाथाडून ही व्यवस्थाच उलथून टाकणार? 

सुप्रभात

             परशुराम सोंडगे

            ||Youtuber||Blogger||

नटवणं आणि सजणं

 ||आपलाचं संवाद आपुल्याशी||

तुम्ही बहरलेली ,डवरलेली झाडं पाहिलीचं असतील?कुणासाठी झाडं नटतात?कुणासाठी थटतात? वेली ही अंगा खांदयावर फुलांचे  झुबके लेऊन सजलेल्या असतात.वसंत आला की झाडांना ही चैत्र पालवीचा मोह कुठे आवरतो? पल्लवीत होणं ही किती अनिवार्य असतं नाही? साधं फुलांचे  गंध, मंकरंदानी ओथंबून जाणं हे लपवून राहत नाही. आपणं आपलं अंतरंग दडून नाही ठेऊ शकतं.साधी फुलपाखरे किती रंगबेरंगी होऊन भिरभिरत राहतात फुला फुलांवर.ढग असुसले बरसायला की मोर ही नयनरम्य पिसारा फुलवून  नाचतात.मोराचं धूंद होणं असेल नाहीतर ढगाचं दाटून येणं असेल सृष्टीतलं हे रम्य आविष्कारचं असतात. नागिनीची सळसळ ही मोहकचं असते ना? हरिणीची चाल? काय कमी  हवीहवीशी असते? कोकीळचे मधूर स्वर कुणासाठी गुंजत असतात? अतिशय नटलेली थटलेली माणसं ही  आपल्या अवतीभवती असतातच की. आपल्या कुणाला तरी आवडायचं असतं.कुणाच्या तरी मनात भरायची असतं. त्यासाठी ही धडपड असते.माणसाच्या नटण्यात ,सजण्यात  मात्र एक कृत्रिमता असते. तसं सृष्टीतल्या इतरांच नसतं.जंगलात कुठं ब्युटी पार्लर ची दुकान असतात. इतरांचे रंग ,गंध घेऊन स्वतः ला पेश करायचे प्रयत्न माणसा शिवाय कुणीच करत नाही.आपणं सुगंधित व्हावं म्हणून अत्तराचे फवारे माणसाशिवाय कोण मारू शकते?फुलांची कत्तल करून केसात माळणा-या ललना ही काय कमी क्रूर नसतात? सृष्टीतल्या सर्वांनाच अधिक सुंदर दिसायचं असतं.अधिक गंधायचं असतं.अधिकचं गोड व्हायचं असतं.आपल्या मध्ये जे जे चांगलं असेल ते ते  सृष्टीत उधळून द्यायचं असतं.अंतरंगातील रंग उसळून  बाहेर कळतं नकळत येतचं असतात. 

   हे जग अतिशय सुंदर आहे आणि  ते सुंदर करण्यात आपला ही  इवलासा वाटा असतोच की.आपला रंग,गंध व रूप घेऊन व्यक्त होणं आपल्या हाती असतं.बहरणं,मोहरणं,फुलून येणं तरी दुसरं काय असतं? ते  एक व्यक्त होणंचअसतं. आपल्यातलं सर्वीत्तम  आहे ते बाहेर उधळून दिलं की अख्खं जग आपोआपच सुंदर होतं असतं. आपणं अधिकच सुंदर व चांगलं होतं राहिलं की जग  सुंदर व चांगलं असणारच आहे.तुम्हाला हे जग सुंदर करून जायचं का? तर मग आपलं सुंदर असणं अनिवार्य आहे.अश्या अनिवार्यता तर  जगण्याला अर्थ देतात, नाही का? आपलं दिसणं, बोलणं,वागणं,हासणं वगैरे सारंच सर्वांना हवंहवंसं वाटेल असं  असलं पाहिजे , नाही का? सर्वांना आपणं हवंहवंसं असं असणं सोपं नाही पण अशक्य थोडचं ?

सुप्रभात

            परशुराम सोंडगे

||Youtuber||Blogger||

 ||आपुलाचं संवाद आपुल्याशी||


काल पूर्वसंध्येला एक भंयकर घटना या जगात घडली.माहितयं का तुम्हाला?भारत काल सिमी फायनल मॅच हारला. इतका महत्वाचा मॅच भारत हारूच कसा शकतो.राग ,संताप आणि त्रागा समाज माध्यमांवर उसळून आलेला पाहिलाच असेल.त्यात ही एक बरं झालं होत.हा मॅच पाकिस्तानासोबत नव्हता.नाहीतर भारतीय क्रिकेटपटूच काही खरं नव्हतं. भारत -पाक क्रिकेट मॅच युध्दा पेक्षा नक्कीच कमी नसतात.

 खेळ म्हटलं की हारणं आणि जिंकण आलचं.खेळात कुणाला तरी हरावाचं लागणारं असतं.कुणी तरी हारल्याशिवाय कुणीतरी जिंकणार नसतंचं. हारणं तसं कुणालाचं आवडतं नसतं.खेळाडू कधीच पराभवाची भीक मागत नसतात.प्रत्येकालाचं जिंकायचं असतं पण कधी कधी पराभवाचा धोंडा पदरी पडतोचं.पदरी जे पडलं ते पवित्र करून घेण आवश्यक असते.कुठलाचं पराभव हा अंतीम नसतो तसाच विजय ही. 

एखादी मॅच हरणं ही साधी गोष्टं असते पण हल्ली माणसं मॅच हारला की हताश होतात.रडतात.संतापतात.शिव्या देतात.फुकटचे सल्ले तर विचारूच नका.खेळात ही माणसं इतकं इमोशनल आणि गंभीर का होतात? कारण सध्या मॅच खेळले जात नाहीत तर लढले जातात.खेळाचे  सामने आपण युध्द करून ठेवले आहेत.

खेळ आणि माणूस  फार छान नातं आहे.खेळ आनंद देण्याचं साधन आहे.खेळ माणसाला संघर्षाचे धडे देतो.पराभव पचवण्याचं बळ देतो.जिंकण्यातला उन्माद कमी करतो.संयम बळकट करतो. खिलाडूवृत्तीची रूजवणं खेळातूनच होते. 

   कोंबडयाची झुंज लावून लोक ते पहात राहतात.रक्त बंबाळ झालेली कोंबडी असतील किंवा बाॅक्सींगमध्ये  हतबल आणि विवश झालेले बाॅक्सर असतील.कधी कधी त्यात काहीचे  जीव  ही जातात. फूटबालमध्ये अलीकडे अनेक खेळाडू जायबंदी होत आहेत. कधी कधी काही खेळाडू खेळता खेळता मरत आहेत.प्रंचड महत्वकंक्षेने माणसं पेटली आहेत. वर्चस्ववादाने भारलेली आहेत.माणसं उन्मादाने इतकी भडकली आहेत.ते मरणं सुध्दा साजरी करत आहेत.

   खेळाला ह्रदयाशी जोडलं जाते आहे.कसल्या कसल्या अस्मिता खेळा सोबत जोडल्या जात आहेत. खेळ माणसाच्या  भावनांशी खेळत आहेत.प्रचंड महत्वकांक्षा चेतवल्या जात आहेत.वर्चस्वाच्या नादात खेळ राष्ट्रीय इश्यू होत आहेत.टोकाची इर्षा व जिद्द हानीकारकच असते. खेळाच्या बाबतीत  माणसं भयंकर भावनिक होताहेत. खेळातून आनंद घेता आला पाहिजे. दुस-या देशाच्या सर्वोत्तम खेळाडूचे कौतुक करणारी विशाल ह्रदयाची माणसं या जगात असली पाहिजेत.ते  आता अजिबातचं नाहीत असं नाही पण त्यांची संख्या वाढली पाहिजे.त्यात आपण ही असलं पाहिजे.समोरच्या माणसाच्या चांगुलपणाचे कौडकौतुक आपण ही करायच शिकू. काल जरी भारत हारला असला तरी आजची सकाळ इंग्लडच्या विजयात सामिल होऊन साजरी करूया.बघा जमतयं का?

           परशुराम सोंडगे.✍️

     || Youtuber||Bloger||

 ||आपुलाच संवाद आपुल्याशी||

या जगातील माणसाच्या दुःखाचं कारण आशा आहे.बुध्दांने शोधलेले मानवी दुःखाचं मूळ.आशेची पाळंमूळं खणून काढण्यासाठी  माणसाची तडफड आपण अनेक धर्म ग्रंथाच्या पानापानावर  पाहतच आलो आहोत.आशेशिवाय जीवन अशक्य आहे.वैराग्य,निरपेक्ष कर्म,अश्या अनेक संकल्पनाला माणसांनी जन्म दिला.त्यांची उकल करण्यातच आयुष्यभर माणूस झिजत राहिला.वैराग्य,निरपेक्ष कर्म यांचा अनुभव कुणी घेतला असेल बरं?कर्मकांडाचे जोखड आपल्या अंगावरती ओढून माणूस आशा नष्ट करण्यासाठी झुंजत राहिला.कुठल्याचं जीवाची पिच्छा आशा सोडत नाही.

 जीव जीवनलोलूप असतो.मरण कुणालाचं नको असते.ते किती ही अटळ असलं तरी ही. त्याला हजारोवाटा असल्यातरी.

जगण्याची  लालसा जीवाला संघर्षाच्या चरक्यात कोंबते.दुःखाची डोंगरची डोंगर अंगावर कोसळत असतानाही माणूस सुखाच्या क्षणासाठी धडपडत राहतो.

           तुम्ही  असा प्रसंग कधी पाहिला आहे का? नागाच्या जबडयात सापडलेला बेडूक.आपण जबड्यात असून ही समोरचा किटक पकडण्याचा त्याचा प्रयत्न.प्रयत्न केविलवाणा असला तरी जगण्याची लालसा जीवला जुंपून ठेवते. त्या बेडकाच्या जीभेवर वळवळणारी असते ना? ती  आशा  असते.

 आशाचा समूळ नाश अशक्य आहे पण आशा कमी करू शकतो.इच्छा नष्टं नाही पण इच्छेची तीव्रता कमी करू शकतो. छाताडावर गोळया झेलतं मरणाला ही शरण आणणारे अतुलनीय शौर्य आपण पहातोच की.आशेचा त्यागाकडे प्रवास शक्य आहे.त्यागातून ही आनंद मिळतो. त्याग आनंदाचे साधन आहे.

मित्र हो,सोप्पं की मग आनंदाचा मार्ग.आपण योगी नाही पण  जरा त्यागी तर होऊया.बघूया ना आज जमतयं का?

 सुप्रभात...!!!

                परशुराम सोंडगे

          Youtuber|| Bloger||

सकारात्मक उर्जा

 || आपुलाच संवाद आपुल्याशी ||

 

माणसाच्या पाणी,अन्न,वस्त्र व निवारा या मुलभूत गरजा आहेत.

गरजांचा प्राधान्यक्रम आपल्याला योग्य ठरविता आला की आयुष्याचं पलॅनिंग जमलच की. 

हल्ली गरजांचा प्राधान्य क्रम ठरविताना आपला संभ्रम होतो आहे.आपण नेमकं इथचं  गोंधळून जात आहोत.

या मुलभूत गरजा इतकचं सकारात्मक विचारांनाही आपणं प्राधान्य दिले पाहिजे.श्रींमतीत व ऐश्रर्यात लोळत असलेली व शरीराने धष्टपुष्टं असलेली माणसं ही  मनानं खचलेली असतात तर भिकारी,दरिद्री व विकलांग ही उत्तूंग स्वप्न उराशी बाळगून जग जिंकण्यासाठी धडपडत असतात.

विचारांची उर्जा बाहेरून लपेटता नाही येत.सकारात्मकतेची कॅप्सूल किंवा टॅब्लेट नसते बाजारात.ती अंतरंगातूनचं उसळावी लागते.मानवी पण हे प्रचंड उर्जेचा स्त्रोत आहे. मन ती उर्जा बाहेर फेकत असते.तिच उर्जा माणसाला आतून पेटवते,तेवत ठेवते.प्रखर करते.चकाकी आणते. 

 उलट नकरात्मक उर्जा माणसाला  काळवंडून टाकते.काजळून टाकते.ग्रासून टाकते. निस्तेज करते. शेवटी माणसाच्या विझण्याचे कारण ठरते.

  सुविचार वाचून माणसं सुविचारी होत नाहीत.शाळकरी जीवनात काय आपण कमी सुविचार पाठ करतो? चांगला विचार करणा-या सवयीचं गुलाम व्हावं लागतं.तीच गुलामी माणसाला या जगाचं सिंकदर करत असते.

सकारात्मक विचारच माणसाला आकाश कवेत घेण्याचं बळ देतो.नकारात्मकता माणसाच्या जीवनातील आनंद गोठून टाकते.पंखातले अवसान गिळुन टाकते.नकारात्मकताच माणसाला नैराश्यीच्या गर्तेत ढकलते.सकारात्मकता माणसाला यशाचं शिखरावर घेऊन जाते. सकारात्मकता व नकारात्मकता माणसाच्या विचार करण्याच्या  पध्दती आहेत.फक्त कोणती ही गोष्टं सहज आणि सकारात्मकतेनं घेणं जमलं पाहिजे. ते तेज विलोभनीय असतं.  या शिवाय सक्सेस पासवर्ड  दुसरा नाही.जादूची कांडी हीच तर असते.

 चला,आज सकारात्मकतेने ऊर भरून घेऊया. 

सुप्रभात 

                           परशुराम सोंडगे

                    || Youtuber||Bloger||

गुरुवार, १९ जानेवारी, २०२३

स्तुतीपुराण

 ||आपुलाच संवाद आपुल्याशी||.


       ||   स्तुती पुराण ||

(आपलेच ओठ आणि आपलेचं दात या अगामी कांदबरीतून...)

आपली स्तुती करणारी माणसं कुणाला आवडतं नाहीत?आपला अंहकार कुरवाळणारा माणूस आपल्याला प्रिय असतो.

खरतर तोंडपुजेपणा एक विकार आहे पण असली माणसं सार्वांनाच आवडतात.स्तुती माणसाला अहंकाराचे पंख देते.त्या पंखावर माणसं हवेत तरंगत राहतात.पूर्वी  राजेमहाराजे आपल्या दरबारात भाट पाळायचे.सदैव स्तुती स्त्रोताचे गायन चालू असे.स्तुतीगीते ऐकत  त्या धुंदीच्या फांदीवर झुलत राहयचे.वास्तव्याच्या निखा-यापासून स्तुती माणसाला दूर घेऊन जाते. खुशमस्क-याच्या गराडयात माणूस अंहकाराने फुलत राहतो.स्तुतीमध्ये इतकी प्रंचड ताकद असते की ती आपलं स्वतःच एक जग तयार करते.स्तुतीच एक नशा पण असते.खुशमस्करे  ती वांरवार माणसाला देत असतात.त्या धुंदीत माणूस विवेक हरवून बसतो.विचाराचं एक वलय माणसाचा मेंदू ताब्यात घेते.

 आपली पण स्तुती करणारी माणसं आपल्या अवती भवती असतात.स्तुती पाठक भक्ष्याच्या शोधतात असतात.आपण भक्ष्य झालोत हे पण कळत नाही.शब्दांना मधात बुडवून ते आपल्यावर त्यांच सम्राज्य उभारतात. आपण गोड बोलण्याच पण गुलाम होतो ते पण नकळत.

   आपण असं कुणाचं गुलाम तर झालो नाहीत ना?स्वतःभोवती निंदकाची एक टोळी तयार असू दया.निंदकाचे घर असावे शेजारी. तुकोबाचा आग्रह आहे.

चला,आज निंदकांनाही आपलसं करूया.आपलं आत्मभान जागृत करूया...!!!   सुप्रभात.


                     परशुराम सोंडगे

                || Youtuber||Bloger||

द्यावा सुगंध सारा उधळूनी

 ||आपुलाच संवाद आपुल्याशी||



इथं प्रत्येकालाचं बहरायचं असतं.फुलायचं असतं.आपलं अंतरंग उधळायचं असतं.स्वतःला सिध्द करायचं असतं.प्रत्येक जण आपलं रंग ,रूप आणि गंध घेऊन बहरत असतो.अविष्कारत असतो. नटणं व सजणं तरी दुसरं काय असतं?आपलं व्यक्त होणंच असतं की.

या विशाल आणि विलोभनीय जगाला आपल्याला अधिकचं सुंदर करायचं असतं पण जग किती कंजूष असत?प्रत्येक क्षूद्र फुलाची दखल घेतचं असं नाही.

दखल नाही म्हणून

फुलांनं कधी फुलणं सोडलं नाही.बहरणं थोपवल  नाही.फुलणं असेल किंवा जगणं असेल ते  अटळचं असतं.फक्त आपलं अविष्कारनं सुंदर असावं. गुण आणि दोषाचं मिश्रण असतो माणूस.आपल्या गुणाचे रंग अधिकचे ठळक करायचे.झालं.एवढचं तर करायचं.

"दयावा सुगंध सारा या जगास उधळूनी.

घेऊन निशिगंध मज मान्यता मिळावी."

    चला,अंतरंग उधळून देऊया. ही सकाळ अधिकची सुंदर करूया. 




                     परशुराम सोंडगे

                || Youtuber||Bloger||

शुक्रवार, १३ जानेवारी, २०२३

कधी कधी खरं बोलूया

 ||आपलाचं संवाद आपुल्याशी ||


कधी कधी खरं बोलूया.

*************************



 शालेय जीवनात अनेक सुविचार आपल्या कडून गोठून घेतले जातात.घरात ही माणसं मुलांवर चांगले संस्कार करायचे म्हणून सदैव उठता बसता संस्काराच्या उपदेशाचे डोस पाजत असतात.त्यात 'माणसांनं खोटं बोलू नाही.' हा सुविचार प्रामुख्याने सांगितला जातो.

मुलांचं मन निर्मळ असतं.ते निरागसं असतं. कोवळ मन नाजूक असतं.थोडक्यात काय तर मुलांची मन संस्कारक्षम असतात.काही संस्काराचे बीज आपण त्यात पेरले तर उगवू शकतात.खरं बोलणं हा सुविचार माणसाच्या मनात का रूजतं नाही?मूलं जसं मोठं मोठं होतं जातं तसं तसं ते अधिक लबाड बोलत राहतं. खोटं बोलण्याची एक कला आहे .ती हळूहळू आत्मसात करत राहतं.

     खोटं  बोलणं हे एक चातुर्य समजलं जातं.जी माणसं सराईतपणे खोटं बोलतात त्यांना हे जग व्यवहार चातुर्य समजत. खरं बोलणारांना अर्थातच मूर्ख समजलं जातं.आपण मूर्ख आहोत हे मान्य करणारा सज्जन माणूस अजून या पृथ्वीतलावर अवतारायचा आहे.त्यामुळे या जगात जिकडे तिकडे सदैव सातत्याने कारण असताना ,काहीच कारण नसताना ही माणसं खोटं बोलत राहतात.

           कधी कधी तुम्ही काही मिनिटे ही खरं बोलून बघा.कसला गजब होतो. काही मिनिटे ही तुम्ही खरं खरं बोलू शकत नाहीत.अनुभव घ्या.हे जग फक्त माणसं खोटं बोलू शकतात या एकाच गोष्टींवर चालते आहे याचा दिव्य अनुभव तुम्हाला येईल.

आश्चर्य याचं वाटतं की माणसं सदैव खोटं बोलत राहतात पण खरं बोलण्याचा आग्रह  कायम धरत असतात.इतकं पण खोटं बोलू नाही अशी माफक सज्जनतेची आवं पांघरणारी  अपेक्षा ही हल्ली करतात.

मापात,पचलं असं खोटं बोलावं  अशी इच्छा करतात.पचवू शकालं इतकं खोटं बोलणं अपेक्षित असते.

बाबांना खोटं बोलला म्हणून मुलांचं कौतुक करणारी आई याचं जगात आहे.वरिष्ठांना खोटं बोलून आॅफीस मधल्या गोष्टी लपवून ठेऊ शकला म्हणून पार्टी देणारी घेणारी माणसं ही असतात की.छान आणि पचलं इतकं खोटं बोललं म्हणून कोतुक करणारी गुरुजी तुमच्या आयुष्यात आलेच असतील. बाॅयफ्रेंड आणि गर्लफ्रेंड असत्याचे निस्सीम भक्त असतात.

सत्याच्या बेगडात  खोटं गुंडाळून ते आपल्याला बाजारात विकायचं असतं म्हणून हे जग खोटं बोलते आहे. बोलत राहणारं आहे.

बरं,खोटं बोलण्याचं काही परिमाण नाही. त्यामुळे माणसं किती खोटं बोलतात हे मोजता येत नाही.माणसं किती ही  स्पेशलं खोटं बोलू शकतात! 

 माणसं खोटं का बोलतात ? प्रत्येकाची कारणं वेगळी असतात. कधी कधी माणसं काहीचं कारणं नसताना ही खोटं बोलतात.उगीचं खरं काय बोलावं म्हणून माणसं खोटं बोलतात.फोनच्या संवादामध्ये  सर्वाधिक खोटं बोल जातं.खरं बोललं तरी काही हरकत नसते  तरी माणसं स्पेशल खोटं बोलतात. सामुहिकपणे एका सुरात खोटं बोल जातं.पक्षाचा नेता खोटा बोलला की सारा पक्ष तेचं बोलत राहतो.मिडीयापणे एका सुरात खोटं बोलत राहते.

 राजकरणात माणसांनं खरं बोलू नाही असा एक राजकरणचा मंत्रच आहे.खरं बोलणा-या माणसांनी राजकरणात पडू नाही असा ही एक सल्ला  दिला जातो.

या जगात एकदम खरं बोलणारा माणूस असण्याची सुतराम शक्यता नाही. त्यामुळे जगातील सर्व  लोक राजकारण प्रिय आहेत.राजकारणी आहेत.घराघरात काय कमी राजकारण असते?

राजकारणात फेकू आणि  नौटंकी करणा-या माणसांचा सक्सेस रेशव  जरा जास्त आहे. सहसा लबाड आणि नटवं बोलणारी माणसं राजकरणात यशस्वी होतात.

    ही माणसं लबाडं बोलतात हे माहीत असून ही  लोकं त्यांना डोक्यावर घेतात.आपला नेता मानतात.

  'माझे सत्याचे प्रयोग' हे म.गांधीचं पुस्तक तुम्ही वाचलं असेलच? खरं बोलणारी आणि वागणारी माणसं या जगानं चक्क खोटी करून टाकली आहेत.

खोटं बोलण्याची सवय लागली आहे माणसांना. 

माणसं किती ही खोटं बोलत असली तरी विजय सत्याचा होतो.सत्य अजिंक्य असतं. आपल्या देशाचं ब्रीदचं सत्यमेव जयते आहे.ते उपनिषदांतून घेतलेले आहे.सत्याचा आग्रह हा फार प्राचीन आहे.युधिष्ठराला ही खोटं बोलायला लावणारा सर्वज्ञ भगवान परमात्मा आपलाचं देव आहे.आपण त्याचेच अंश आहोत.

देशाचं ब्रीद आहे 'सत्यमेव जयते 'म्हणून या देशासाठी थोडं थोडं खरं बोलण्याचा सराव सुरू करू आज सकाळ पासून. 

जपून हं. सत्य कडू असतं.खरं बोललं की सख्ख्या आईला पण राग येतो.

 सुप्रभात....!!!

              परशुराम सोंडगे

             ||Youtuber||Blogger||

सिर्फ देश नहीं, संविधान ही बदल रहा है...!!

  सिर्फ देश नहीं, संविधान ही बदल रहा है...!! सरकारला विचार नसतात.राजकीय पक्षांना विचार असतात. तशी विशिष्ट विचारांची सरकार चालवायला अजिबात गर...