शनिवार, १७ सप्टेंबर, २०२२

                  नवरात्रोत्सव-शक्तीचा जागर



 


 
वरात्र म्हणजे नऊ दिवस चालणारा शक्तीचा उत्सव.समाजात तो इतक्या विविध प्रकारे साजरा केला जातो तो पाहून थक्क व्हायला होतं. प्राकृतीक उपल्बधतेनुसार व सामाजिक गरजेनुसार त्यात विविधता व स्वरूप देण्यात आलेले आहे. अलीकड काही त्याचं वाढतं सार्वजनिक स्वरूप राजकीय प्रेरीत ही झालेले आहे.गणपती उत्सव संपला म्हणजे वेध लागतात नवरात्रीचे.जागोजागी देवीच्या पूजेसाठी, स्थापनेसाठी मंडप उभारले जातात.नवरात्रीच्या पहिल्या दिवशी, अश्विन शुद्ध प्रतिपदेला घटस्थापना होते.  घराघरामध्ये  होणारा हा उत्सवं  आता  सार्वजनिक उत्सवात रुपांतरीत झाला आहे. देवीला शक्तीचं रूप मानलं जातं.वेंदात तत्वज्ञानात ब्रम्हं-माया च्या रुपात विश्वाचं रूप गृहीत धरलं आहे.अनेकदा  देवांनाही राक्षसाचं संहारं करणं शक्य झालं नाही त्यावेळी देवीनी अवतार घेन राक्षसाचं संहार केल्याच्या अनेक पुराण कथा आहेत.

                   इतिहासात ही अनेकदा स्वारीवर जाताना देवीची,ग्रामदेवीची ,कुल देवीची अराधना केलेले संदर्भ आहेत. अनेक राजे महाराजे यांनी देवीचे मंदीरे बांधली आहेत.अनेक देवीच्या उत्सवात राजा महराजाच्या मानापानाने सहभाग असे. कुल देवी,ग्रामदेवी अश्या स्वरूपातलोक देवीला पुज आले आहेत.शिवाजी महाराजांच्या अनेक गडावर देवीची मंदीरे आहेत.स्वातंत्र लढयात ही स्वातंत्र वीर सावरकराचं जयोस्तु श्री महन्मंगले.. हे गीत प्रचंड प्रेरणा देणारे ठरलेले आहे.हे गीत आज ही  ऐकताना आपल्या नसानसात स्फुलींग उसळत राहतात.

          त्यामुळे आपल्या धर्मात व इतिहासात देवीला फारचं महत्त्वाचं स्थान आहे.देवीने नवरात्राचे नऊ दिवस भीषण युद्ध करून अनेक दैत्यांचा संहार केला. महिषासुराचा वध केला म्हणून महिषासुरमर्दिनी असे तिचे नाव रूढ झाले. विजयदशमी दुष्टतेला संहार केल्याचा हा दिवस विजयोत्सव म्हणून साजरा करण्यात ये लागला.देवीच्या शक्तिरूपाचीच पूजा नवरात्रीत केली जाते. वाघावर आरूढ झालेली, हातात तलवार, खड्ग आदी शस्त्रे धारण केलेली देवीची मूर्तीच नवरात्रीत पूजिली जाते. या देवी सर्वभूतेषु, शक्तिरूपेण संस्थिता, नमस्तस्ये, नमस्तस्ये, नमस्तस्ये नमो नम:असेच म्हटले जाते. एरवी, ‘सर्व मंगल मांगल्ये, शिवे सर्वार्थ साधिके, शरण्ये त्र्यंबके गौरी नारायणी नमोस्तुतेअशी तिची प्रार्थना केली जाते.घरामध्ये नवरात्रीत घटस्थापना करण्यात येते.अखंड नंदादीप नऊ दिवस तेवत ठेवण्यासाठी मोठा दिवा घेतला जातो. घरातील जेष्ठ लोक तो नंदादीप विझला जाणार नाही याची काळजी घेतात.

 नादि निर्गुण निर्गुण प्रकटली भवानी,

मोह महिषासुर महिषासुर मर्दना लावूनी

त्रिविध तापाची करावया झाडणी,

भक्तालागी तू ऽऽऽ

भक्तालागी तू पावसी निर्वाणी,

ऐसा जोगवा जोगवा मागेन।

द्वैत सारूनी माळ मी घालीन,

हाती बोधाचा झेंडा मी घेईन,

भेदरहित वारिसी जाईन,

ऐसा जोगवा मागेन।

नवविध भक्तीच्या भक्तीच्या करिती

नवरात्री, ओटी मागेन मागेन ज्ञानपुत्रा,

धरीन सद्भाव अंतरीच्या मित्रा

असा सद्गुणांचा, नि:संग होण्याचा, विकल्प, काम, क्रोध सोडून देण्याचा आणि जन्ममरणाचा फेरा चुकविण्याचा जोगवा मगला जातो. या जोगव्यामध्ये फार मोठा आध्यात्मिक अर्थ भरलेला आहे. मात्र तो समजून घेऊन, जोगवा मागितल्यास मनशुद्धी होऊन मन:शांती नक्कीच मिळेल. निर्गूण स्वरूप असलेलं देवीचं रूप  सुगण रूपात नवरात्रीत पुजलं जाते.

                                  परशुरामाची जननी म्हणजे रेणुका माता अर्थात माहुरगडवासिनी. देवीच्या साडेतीन पीठांपैकी एक कोल्हापूरची अंबाबाई दुसरी तुळजाभवानी, तिसरी रेणुकामाता ही तीन पूर्ण पीठे आणि नाशिकजवळ वणीची सप्तशृंगी हे अर्धेपीठ मानले जाते.या सर्व ठिकाणी नवरात्र मोठय़ा प्रमाणात साजरे होतात. तेथे दर्शनाला जाण्याची भक्तांची धडपड असते. पण ते शक्य झाले नाही तर निदान ग्रामदेवीच्या दर्शनाला तर आवर्जून जातात.शेवटी दर्शनाला जाऊन, मनाची शांतीच मिळाली पाहिजे. हाच तर सा-यांचा प्रयत्न असतो.

                                 नवरात्रीत गुजराथी महिला गरबा नृत्य करतात. सजूनधजून त्या गरब्यासाठी उतरतात आणि रात्री उशिरापर्यंत त्यांचे नाचगाणे सुरू असते. रंगमा रंगमा, रानी बहुचरमा खेले रंगमा’, ‘नौरात्रीमा नौ नौ दिवसमा’, किंवा पंकिडा तू उड न जाना, पावा गडोरे महाकाली से मिलने चलो, गरबा खेलेंगेअशा पारंपरिक गीतांवर, मंदिरामध्ये गरबा खेळला जातो. पूजेचा एक भाग म्हणून केला जाणारा गरबा हळूहळू व्यावसायिक रूप घेऊ लागला आहे. हजारोंची तिकिटे लावून, विशेष सेलिब्रिटीज बोलावून गरबा खेळला, नाचला जातो. त्यामध्ये अलीकड बरेच गैरप्रकारही होतात. धार्मीक स्वरूप जान फक्त सोहळा उरतो तेव्हाचं सल्या विकृती निर्माण होत असातात.असेच गैरप्रकार दर्शनाच्या रांगांमध्येही होतात. उत्सवाचे पावित्र्य त्यामुळे संपत जाते.तरुणाईचा जोश मान्य, पण त्यातून निर्माण होणारे गैरप्रकार थांबले पाहिजेत. सण, उत्सवांमधील शुद्ध, पवित्र भावना जपली पाहिजे. अश्या उत्सवातून लोंकांच्या मनात सांघिक भावना निर्माण होन मानव कल्याणासाठी उर्जा निर्माण होणं आवश्यक आहे.तरणाईची उर्जा ही सकारात्कतेत रूपांतरीत झाली पाहिजे.देवीच्या विविध रूपांची आराधना करताना, मनामध्ये भक्तिभाव उभारून आला पाहिजे.मन भक्तीरसानं ओथंबून जायला हवं.

पूर्ण बोधाची, बोधाची घेईन परडी,

आशा तृष्णेच्या, तृष्णेच्या पाडीन दरडी

मनोविकार करीन कुरवंडी

अद्भुत रसाची रसाची भरीन दुरडी

ऐसा जोगवा जोगवा मागीन

अशा प्रकारे मनोविकारांची कुरवंडी करण्याच्या भावनेतून, देवीच्या चरणी लीन व्हावे. केवळ नऊ दिवसांचे उपवास केले म्हणजे झाले असे नसून, उपवास म्हणजे दूर जाणे हा अर्थ गृहीत धरून, मनोविकार, पापवासना, दुष्टबुद्धी या साऱ्यांपासून दूर जाण्याचा निर्धार या नवरात्रात होणे अपेक्षित आहे. ज्या शक्तीचे, सामर्थ्यांचे दर्शन देवीने घडविले, तशी शक्ती, सामर्थ आपल्या ठायी निर्माण व्हावे, याचसाठी हा उत्सव आहे, तो त्याच पवित्र भावनेतून साजरा व्हावा.शक्तिरूपाचा जागर केल्यास, आपण शक्तिमान होऊ, हा विश्वास बाळगून, उत्सव साजरे केले जावेत. आपल्या आत असलेल्या शक्तीचा जागर नवरात्रोत्सवाच्या माध्यामातून होणे गरजेचं आहे.अनेक उत्सवाला आपल्या आपल्या स्वार्थनुरूप स्वरूप देणारे असतातचं.त्यातून ही माणसात दडलेल्या शक्तीचा जागर करण्यासाठी अश्या उत्सवातून प्रयत्नं होणं गरजेचं आहे.

 

                                                         परशुराम सोंडगे, पाटोदा

कोणत्याही टिप्पण्‍या नाहीत:

सिर्फ देश नहीं, संविधान ही बदल रहा है...!!

  सिर्फ देश नहीं, संविधान ही बदल रहा है...!! सरकारला विचार नसतात.राजकीय पक्षांना विचार असतात. तशी विशिष्ट विचारांची सरकार चालवायला अजिबात गर...