रात्रीचे दहा तरी वाजलं असतील. तृप्ती नि निलेश मार्केटमधून घरी परतत होते.आज निलेशचा मूड ही चांगला होता. बराच वेळ फिरल्यामुळे एक थकवा आला होता.एका हॉटेल जवळ त्यानं गाडी पार्क केली. ते हॉटेलात शिरले. जेवायचं की नुसतं कॉफी घ्यायचं हे त्यांनी काहीच ठरवलं नव्हतं. तसं बाहेर येण्याचं काही प्लॅन नवहता.दोघ ही गप्पात मग्न होते. समोरच्या टेबला वर एक कप्पल होतं. अर्थात त्यांच्याकडं याचं लक्ष नव्हतं.ती बाई सारखं तयांच्याकडं पहात होती. तृप्तीचं लक्ष ही गेलं पणतिनं ते इग्नोर केलं. ती दोघाकंड पहात आहे की एकटया निलेशकडं पहात आहे याचा अंदाजला घ्यावासा वाटला.तिच्या समोर जो माणसू बसला होता. तो नक्की कोण असावा तिचा? नवरा की वडील? समोर छान् अक्क्ल पडलं होतं. देह कसा बसा खूर्चीत मावला होता. इतकं तंतोतंत तो कसा काय खूर्चीत बसू शकला असेल? तृप्तीला प्रश्न पडला.
जास्त वेळ त्याच्या कडं पाहण्याचा प्रयत्न तृप्ती करणार नव्हती. ते बावळट पुन्हा पहात बसायचं आपल्याकडं. आपल्या बायका, पोरी बरोबर आसल्या तरी बरीचं थोराडं माणसं दुस-याच्य बायकाकउं पहात बसतात. तृप्तीचा अनुभवच होता तसा. आज ती सावध होती. निलेश त्या गर्दं लाल.. वहईटं कलरचा स्कर्टं घातलेल्या त्या पोरीकडं पाहत होता. रेड व व्हईट कलर कॉम्बीनेशन जबरदस्त वाटतं होतं. ती आकर्शक दिसतं होती. निलेशला ही चूक ती करू देणारचं होती. निलेश वर सूड नाही उगवू शकली तरी त्यावर तोंड सूख घेणं तरी शक्यं होतं.
“फक्त कॉफीच की काही खायला मागवू?” निलेश असं म्हणतं आसला जरी त्याचं लक्षं तृप्तीकडं नव्हतचं.
“नको नको.. फक्त कॉफीचं.”
“का?एवढी का घाई करतेस?”
“का म्हणजे घरी कामं पडलीत.माझी वाट बघत.”
“ ऐ जाऊ दे. उग मूड नको घालवू?”
“ आता कसला मूड तुझा?”
“मूड कसला? थोडसं रिलॅक्स…”
“ बरं.. ठीक.. “ तृप्ती उठली नि उभी राहीली.तिला जागा बदलायची होती. आपल्या नव-याकडं कुणी स्त्री बघत असेल तर? कोणतीच स्त्री ते फार वेळ सहन करू नाही शकत. तृप्नं निलेशला उठवलं. त्याच्या जाग्यावर ती बसली.
“ का?
“तुझ्याकडं कुणी अस पहात असेल तर मला नाही आवडतं.”
“असं का?” निलेशनं वेडयाचं सोंग घेऊन पेंडगावाला गेला.त्यानं ओठात थोडसं हासू फुलवलं.
“आता तू काही वेळ रिलॅक्स.. बसू शकतो.” तृप्ती आपली नजर तयाच्या डोळयात रोखत बोलली. निलेशनं काही बोलण्यापेक्षा गप्प राहणचं पंसत केल.
“असं काय पहातेस? वेडीस काय? लोक बघतील ना?”
“बघू दे. बायको मी तुझी? कुणी परकी नाही?”
“असं. अश्या ठिकाणी?
“लायन्सनं माझ्याकडं?” गळयातलं मंगळ सुत्रं त्याला दाखवत तृप्ती बोलली. त्याच्या बघत त्या मुलीकडं ही ती पहात होती.
“लायन्सं आहे मग विचार काय तुझा?”
“जी चाहता है.कीस लू.तिनं फलाइंग कीस केला. कीस त्याच्याकडं नि नजर त्या मुलीकडं रोखत ती बोलली. ती मुलगी उठून तरा तरा चालत आली. फरशीवर सॅडलचा आवाज आला. सा-याच्य नजरा रोखल्या. निलेश ही तिच्या चेह-यावरली भाव वेचत राहीला. कंबरेवर हात देउन त्या दोघासमोर उभी राहीली.
“निलेश तू?” त्याच्या डोळयात डोळा मिसळत त्या मुलीनं विचारलं.
“रेवा.. तू?” निलेशचं तोंड आश्चर्यानं वासलं होतं. तृप्ती नुसती पहात राहीली होती. तिला बसा म्हणण्याऐवजी हाच उठून उभा राहीला. तृप्तीला कळत नव्हतं आपण उभा राहवं की बसावं? ती गोंधळली पण तशीच बसून राहीली. ही नक्की कोण? निलेशला नावासह कशी बोलू शकते. ते पण ऐकेरी.
“अरे,ही कोण? लग्न तर केल नाहीस ना?”
“येस, यु आर राईट. ही माझी बायको.तृप्ती.” रेवा हासली.छान हासली.आता समोरचं हासलं की आपल्याला पण हसावंच लागतं. तृप्ती ही हासली.
“तृप्ती, ही रेवा. आम्ही एका कॉलेजात शिकत होतो.”
“एका वर्गात पण असालच ना?” तृप्तीनं अंदाज सांगितला.
“नाही, आम्ही एका वर्गात नव्हातो. हा बदमाश सिनिअर मला.” भाडया म्हणाली नी खळखळून हासली.
“हा बदमाश? मला नव्हतं माहीत.” तृप्ती नटवं बोलली.
“कळेल. तसा तो कळयाला वेळ लागतो. हा दिसतो गोरा गोमटा पण ॲक्चयूली ही इज शॅमेलॉन.”
“शॅमेलॉन?” ही आपल्या नव-याला शॅमेलॉन म्हणते नि आपण खूशाल ऐकतो. निलेश खुशाल दात काढतोय. तृप्तीनं तिला बसायला शेजारची खूर्ची दिली.
“ऐ, व्हॉट सेक्सी चॉईस? व्हेरी क्यूटं..!!”ती इतकं बोलंल तरी निलेश फक्त हासला.एका स्त्रीनं दुस-या स्त्रीचं असं सौंदर्यं मान्य करणं जगातील दुर्लभ योग.तृप्तीला ही नवलं वाटलं. एवढं सुखद का बोलतेय ही?
“लव्हं मॅरेज की ॲरेंज…?” तृप्ती कडं बघत ती म्हणाली.तृप्ती तिच्याकडं पहात होती.
“तुला काय वाटतं?” खूर्चीवर टेकत तो बोलला.
“तू गटवल असणार हिला?”
“राँग. हीनंच प्रपोज मारलं मला.” आपली कॉलर ताटं करत निलेश बोलला.
“काय म्हणू तूला? नुसतं तृप्ती म्हणू?”
“दॅटस् ओके.“ ती नुसती हासली.
“खरं बोलतोय हा? तू प्रपोज मारल त्याला?”
“नाही?ॲरेजं आमचं.” तृप्तीनं अर्धंवटच बोलणं पसंत केलं. थोडसं हासून पाहीलं.
“कॉलेजात भेटला असता तर केल असतं प्रपोज?”
“ ऑफकोर्सं…”
“रेवा काय हे? काय बोलतेस? बायको माझी ही.”
“असेल तुझी बायको पण माझी कुणीच नाही का?”
“तुझी पण आहे ना”
“कोण माझी?” त्याच्या चेह-यावर नजर स्थिरं करत ती बोलली.
“तुझी कोण?” निलेश थोडा कन्फयूज झाला. त्याला काहीचं कळतं नवहतं.
“ बुध्दू, मी कोण तुझी. फ्रेंङ..फ्रेंडच्य बायकोला काय म्हणायचं…”तिनं पण बराच वेळ डोकं चालवून पाहील. उत्तर नाही सापडलं.
“अशी काही नाती असतात त्यांना आपण नावं नाही देऊ शकत. नाव नाही देता आलं म्हणजे नातं नसतचं असं नाही?” तृप्तीनं त्यांची कोंडी फोडली. अजून जास्त त्यांची फजीती करायची नव्हती तिला.
“जाऊ दया ते. आम्ही दोघी फ्रेंङ” रेवानं तृप्तीचा हात हातात घेतला.तिचा हात गरम होता. ताप जाणवा इतका उष्णं होता. दोघानी ही आगह केला. कॉफीची ऑडर पण झाली. इकडचंतिकडंच बराच वेळ ते बोलत राहीले. अर्थात.. त्या दोघांच्या ही चेह-यावरील सूक्ष्म भाव तृप्ती टिपतच होती.
“अरे ,आपण इथं असं बसलोत. ते एकटेच…” तृप्तीनं रेवाच्य नव-याची काळजी केली. ही त्याला आपल्याज जॉइन का करत नाही? तृप्तीला प्रश्न पडला.
”रेवा,ओळख नाही करून देणार तुझ्या नव-याची?”
“नाही? ते नाही येणार.तो नवरा नाही माझा…”
“मग?”
“पुरूष फक्त कुणाचा तरी नवराच असतो, असं नाही?”
“बॉय फ्रेंड?”
“काही नात्यानं लेबल लावता येत नाहीत नि काहीनां आपण ते चिकटू शकत नाहीत.”.
“ तू स्पष्टं नाही बोलू शकत?
“निलेश… सा-याचं गोष्टी स्पष्टं नाही करता येत माणसाला.सॉरीं..!! मी तुम्हला डिस्टर्ब केला. भेटू पुन्हा .. बाय..” ती दोघाकडं पाहून गोड हासली. अर्थात ते अस्स्लं नव्हतं. नटवं होतं.मन आतून चिरतं गेलं तर हासणं तरी कसं गोड राहू शकत? तृप्ती व निलेश त्यांच्याकडं पहातच राहीले.आता रेवा त्यांच्याकडं पाहणारचं नव्हती. तसं ठरवलचं होतं तिनं. तृप्तीचं व निलेशेचं ही पाय जड झालं होतं. तृप्तीच्या मनात असंख्य प्रश्न उठले होते.
बाईकवर ते घरी आले. तृप्ती अबोल झाली होती. निलेशला अनेक प्रश्न तिला विचारायचं होतें. तो त्याची उत्तर देईल की नाही .काही माहीत नव्हत. आता घरात आल्यानंतर असे प्रश्न विचारणं शक्यं नवहतं. सार्वजनीक ठिकाण जो एकांत भेटतो तो घरात शोधवा लागतो. एकांतीची वाट पहावी लागते. रात्रच्या अकरा वाजत आल्या होत्या. निलेशच्या डोळयात झोप तरळली होती. तृप्ती जवळ आली तस तिच्या कुशीत शिरण्याचा प्रयत्न त्यांन केला.तिनं तो हाणून पाडला. गालाचा चंबू केला. बायकांचा हा नखरा लोभस आसला तरी अश्या एकांतात फारसा सहन होत नाही. निलेश हताश झाला होता.तृप्तीनं सुरक्षीत अंतर घेऊन त्याला विचारलं,” कोण ती?”
“आम्ही कॉलेजाला होतो एकत्र. अर्थात.. ती आमच्या वर्गात नवहती.”
“वर्गात नसेल ही.. पण."
“मग पण काय?”
“कोण ती?”
“तू समजते आहे तसं काही ही नाही."
“मी काहीच समजत नाही. मला खरचं काही समजेनास झालं.”
“जाऊ दे ते.ती नको होती भेटायला.”
“तो तिचा नवरा पण नव्हता? मग कोण होता तिचा तो?”
“जाऊ दे ते. मी तिच्या बाबत एवढचं सांगू शकतो. ती अनेक दुदैवी मुली या जगगात आहेत. असतात तशीचं ती एक अभागी मुलगी आहे. बस्सं.”
“अभागी?"
“तो तिचा नवरा नव्हता.”
“बॉय फ्रेंड सोबत फिरण्या इतकी ती लहान पण नाही.”
“तो तिचा बाय फ्रेंड पण नव्हता.”
“मग कोण होता?"
“तो कसटमर असेल तिचा.”
“क्काय? तसली थर्डं क्लास ती? तसल्या बाया बरोबर ओळखीत तुझ्या?”
“आमच्या कॉलेजीची हुशार पोरगी होती ती.”
“निलेश कळत का तुला? कसल्या बाई बरोबर ओळाख तुझी? म्हणे हुशार पोरगी होती."
“आपण आपला भुतकाळ नाही पुसू शकत.बिच्चरी रेवा…” निलेशचा स्वरं गहिरा झाला होता. नुसतं एक पुरूषाकडं पाहीलं म्हणून आपलं थोबाडं रंगवणारा निलेश इतका इमोशनल होऊ शकतो?
“खरचं ना तुझं प्रेम नाही ना तिच्यावर..?”
“ तृप्ती, काळजाचा पार चेंदामेंदा झालाय तिच्या.ती कधी कुणावर प्रेम तरी करू शकेल का?”
“ मग का बघत होतास तिच्याकडं…”
“नजरेत फक्त प्रेम नि वासनाच नसते..कारूण्याचा पाझर ही डोळयातूनच झरू शकतो.”
“ असलं कारूण्यं ही तुझ्या डोळयातून नाही पहावत मला.”
“ का?”
“का म्हणजे मी बायको तुझी? फक्त माझा तू.. फक्त माझा.” हे बोलताना ती त्याच्या छातीशी बिलगली. अजून त्याला तिचं करण्यासाठी त्याच्या हवाली झाली. दोन शरीर एक झाले तरी मन मनाचं मिश्रण होतचं असं नाही.तिनं शरीर निलेशच्या हवाली केलं पण मनात अनेक गोष्टींच्या लहरी उठत राहील्या. रेवा,तिचा ढेरीवाला कस्टमर… निलिश नि रेवाचं नेमके संबंध कसें असतील? या संशयाचं प्रंचड वेगाने धावणारे विषाणू.. तिचं डोकं खाऊन टाकतील की काय? असं वाटलं.खिडकीतून डोकवणारा अकाशतील चंद्र.. चांदण्या… आदित्य.. त्याची मृत्यीशी चालू असलेली झुंज.आदित्यचा चेहरा तिच्या डोळया समोर आला. आदित्य असा.. यावेळी तरी नको आठवायला.. मनातलं कुणाला कळत? आपल्या डोळया समोर जसा आदीचा चेहरा हालत नाही तसाच रेवाचा चेहरा… निलेशच्य मनात असेल का? का दुस-या कुणाचा?निलेशची मिठी अजून ही सैल नव्हती झाली.
(पुढील भाग लवकरचं )