शनिवार, ६ जानेवारी, २०२४

ऐ,प्रभू,तूझं आम्ही मंदिर बांधलयं.

 






तू

देव आहेस

तू परमात्मा आहेस

आम्ही जीवात्मा....

तूच हे सर्व

तूच आहेस ना रे सर्वत्र?

तू चराचरात

ओतप्रोत भरलेला...

इथल्या

कणाकणात सामावलेला...

पेशीपेशीत तू

पेशी द्रव्याच्या

अणू रेणूत ही...

काय?

भक्तांच्या ह्रदयात

श्वासात तुच असतोस

मग हे मंदिर आम्ही कशाला बांधलंय?

असं का विचारतोस?


पाचशे वर्ष झालयं

तुझं मंदिर आम्ही बांधू शकलो नाहीत.

ऊन,वारा,पाऊस,वादळ...

सारं तू सोसत आलास

तक्रार नाही केलीस कधी तू.

आम्ही टोलेदार बंगल्यात राहीलो.

एसीत रूम मध्ये राहिलो

पण

तुला मंदिर नाही ही खंत होतीचं की सदैव.

तू परामात्मा असला म्हणून काय

झालं?

तुला  मी मंदिर पाहिजे ना.


गावागावात,

गल्लोगल्ली,घराघरात तुझं मंदिरे

आहेतच ना.

देवा-हयावर ही तू असतोस

पण

अयोध्येत मंदिर पाहिजेचं होत

तुझं.

आता आम्ही

एक तुझं

भव्य मंदिर बांधलंय.

सोहळा साजरा करतोय आम्ही

भव्यदिव्य....जबरदस्त.

एकदम शाहीथाटात.

काय म्हणालास?

देह हेच मंदिर असतं तुझं..!

हो मान्य की,

पण तुझं मंदिर

तुला हवं की नाही पण ते आम्हाला हवं

असतं.

भक्तीभावांन माथा टेकायला

कधी

लोकांची माथी भडकायला

तू

हवाच असतोस ना आम्हाला हिंदूत्वाची

आग पेटायला.

हे जग

पण पेटतं राहिलं पाहिजे.

धर्म कसा टिकेल?

अशात तरी तुला अवतार

घ्यायची वेळ येऊ देणार नाहीत आम्ही.

धर्म टिकवू..वाढवू...!!

आता तर आम्ही तुझं मंदिर बांधलयं.


तू

जरी विश्वात्मक  असलास तरी

आम्हाला मंदिरात हवा आहेस‌.

आम्ही तुझी

प्राणप्रतिष्ठा....करणार आहोत

छान छान मुर्तीत.

त्या भव्य मंदिरात...


तू 

वसशील ना त्या सुंदर रूपवान घडीव दगडात

चराचरात असतोस तसा.

ह्या ही दगडात वसं.

मंदिरात वसं.

काही शतकांचा प्रश्नच

आम्ही मारून टाकलाय आता...


तू देव

असला म्हणून काय झालंय?

तुझा वापर आम्ही

करू शकतो.

अनेक वर्ष आम्ही वापरतचं आलोत तुला.

सारेच भक्त नसतात भोळे

काही चतुर ही असतात.

काही फितूर ही...!!






वाईट वाटून घेऊ नकोस...

तसा तू क्षमाशील आहेसच की.

क्षमा कर.

कसलं भव्य मंदिर

बांधलं तुझ आम्ही....

तुला कुठं गरज त्याची

पण 

प्रभू,आमचं लयं भलं होणार..

लयं भलं....!!

                             परशुराम सोंडगे,बीड

कोणत्याही टिप्पण्‍या नाहीत:

सिर्फ देश नहीं, संविधान ही बदल रहा है...!!

  सिर्फ देश नहीं, संविधान ही बदल रहा है...!! सरकारला विचार नसतात.राजकीय पक्षांना विचार असतात. तशी विशिष्ट विचारांची सरकार चालवायला अजिबात गर...