शनिवार, १७ सप्टेंबर, २०२२

राजकारणं घाला चुलीत पहिले आरक्षण दया


 राजकारण तुमचं  चुलीत घाला. 

मराठा संघटना आरक्षणाच्या मुददयावर आक्रमक.

राज्यातील मराठा समाजाला देण्याल आलेले आरक्षण सर्वच्च न्यायलायनं तात्पुरतं स्थगित केलेले आहे. दोन वर्षापासून मराठा समाजातील विदयार्थ्याना त्याचा फायदा झाला होता सर्वेच्च न्यायलयाने दिलेली स्थगिती राज्यातील मराठा समाजातील विदयार्थ्याना हवालदिल करणारी आहे व संताप आणणरी आहे.मराठा आरक्षण कायम राजकरणात ऐरणीवर राहीलेले आहे.आरक्षणाचं घोंगड भिजत ठेवण्यातचं सर्वच राजकीय पक्षांच कल राहिलेला आहे.सर्वेच्च न्यायलयच्या मराठा आरक्षणावरील स्थगिती नंतर ही मोठया प्रमाणात राजकराण करण्यात येत आहे.मराठा आरक्षणाच्या दिले त्या वेळेस श्रेयवादासाठी झुंबड उडाली होती.आता या सदर्भात आलेल्या अपयाशाचे खापर दुस-याच्या डोक्यावर फोडण्याची स्पर्धा लागली आहे.

  सर्वच पक्ष व राजकीय व्यक्ती आपलं राजकीय हीत लक्षात घेऊन मराठा आरक्षणाला मिळालेल्या स्थगितीवर बोलत आहेत. काही सरकार बाजू मांडण्यात कमी पडले आहे असं सांगून महाविकास आघडीवर त्याचं खापर फोडण्याचा प्रयत्न करत आहेत तर काही पक्ष सर्वच्च न्यायलयचा निकालवरचं  प्रश्न चिन्हं उपस्थित करत आहेत. हे राजकरण रंगल आहे पंरतु या क्षुद्र राजकणात भरडला गेला आहे तो मराठा समाजातील तरूण.अनेंक विदयर्थ्याचे आयुष्य बरबाद करणारी ही स्थगिती आहे. आज  ही समाजातील गरीब मुलांना शिक्षणासाठी पैसा नाही.हाताला काम नाही.मराठा तरूण हतबल झाला आहे.अनेक जण मरणाला कवटाळतं आहेत.पुढारी मात्र  मराठा तरूणांना आधार देण्यापेक्षा त्याचं राजकारण करतं बसतात.  योग्य उपाय करून मराठा समाजातील विदयार्थ्यांना दिलासा देणं महत्वाण्चं आहे.

           आशावेळी मराठा समाजातील दियार्थ्याचे हित लक्षात घेउन प्रत्येक पक्षाने आपआपल्या भूमीका मांढल्या पाहिजेत. मराठा समाजातील  लोक प्रतिनिधी आपल्या पक्षीय  भूमिका व हीत सोडून एकत्र आलं पाहीजे. मराठा समाताजील मुलांना येणा-या अडचणी बाबत दिआलसा दायक तरी बोलं पाहीजे. अशी अपेक्षा समाजातून करण्यात येत आहे.

                      मराठा आरक्षण न्यायालयात टकणार नव्हतं तर ते ले कशाला? घटनेची पायल्ली होईल् असं आरक्षण् देता काशाला?सर्वच नियमाचं पालन करून आरक्षण दयायाला पाहीजे.असं तुष्टीकरण व लालचांगूण करणार आरक्षण आम्हला हवे आहे. मराठा समाजात मोठया प्रमणात रोष पसरला आहे. मोठया प्रमणात अंदोलन उभ राहण्याच्या शक्याता आहेत. राजकारण गेलं चुलीत आमच्या मुलांच्या भवितव्याच विचार करा  असा ही इशारा मराठा संघटनाकडून देण्यात येत आहे.

                  नवरात्रोत्सव-शक्तीचा जागर



 


 
वरात्र म्हणजे नऊ दिवस चालणारा शक्तीचा उत्सव.समाजात तो इतक्या विविध प्रकारे साजरा केला जातो तो पाहून थक्क व्हायला होतं. प्राकृतीक उपल्बधतेनुसार व सामाजिक गरजेनुसार त्यात विविधता व स्वरूप देण्यात आलेले आहे. अलीकड काही त्याचं वाढतं सार्वजनिक स्वरूप राजकीय प्रेरीत ही झालेले आहे.गणपती उत्सव संपला म्हणजे वेध लागतात नवरात्रीचे.जागोजागी देवीच्या पूजेसाठी, स्थापनेसाठी मंडप उभारले जातात.नवरात्रीच्या पहिल्या दिवशी, अश्विन शुद्ध प्रतिपदेला घटस्थापना होते.  घराघरामध्ये  होणारा हा उत्सवं  आता  सार्वजनिक उत्सवात रुपांतरीत झाला आहे. देवीला शक्तीचं रूप मानलं जातं.वेंदात तत्वज्ञानात ब्रम्हं-माया च्या रुपात विश्वाचं रूप गृहीत धरलं आहे.अनेकदा  देवांनाही राक्षसाचं संहारं करणं शक्य झालं नाही त्यावेळी देवीनी अवतार घेन राक्षसाचं संहार केल्याच्या अनेक पुराण कथा आहेत.

                   इतिहासात ही अनेकदा स्वारीवर जाताना देवीची,ग्रामदेवीची ,कुल देवीची अराधना केलेले संदर्भ आहेत. अनेक राजे महाराजे यांनी देवीचे मंदीरे बांधली आहेत.अनेक देवीच्या उत्सवात राजा महराजाच्या मानापानाने सहभाग असे. कुल देवी,ग्रामदेवी अश्या स्वरूपातलोक देवीला पुज आले आहेत.शिवाजी महाराजांच्या अनेक गडावर देवीची मंदीरे आहेत.स्वातंत्र लढयात ही स्वातंत्र वीर सावरकराचं जयोस्तु श्री महन्मंगले.. हे गीत प्रचंड प्रेरणा देणारे ठरलेले आहे.हे गीत आज ही  ऐकताना आपल्या नसानसात स्फुलींग उसळत राहतात.

          त्यामुळे आपल्या धर्मात व इतिहासात देवीला फारचं महत्त्वाचं स्थान आहे.देवीने नवरात्राचे नऊ दिवस भीषण युद्ध करून अनेक दैत्यांचा संहार केला. महिषासुराचा वध केला म्हणून महिषासुरमर्दिनी असे तिचे नाव रूढ झाले. विजयदशमी दुष्टतेला संहार केल्याचा हा दिवस विजयोत्सव म्हणून साजरा करण्यात ये लागला.देवीच्या शक्तिरूपाचीच पूजा नवरात्रीत केली जाते. वाघावर आरूढ झालेली, हातात तलवार, खड्ग आदी शस्त्रे धारण केलेली देवीची मूर्तीच नवरात्रीत पूजिली जाते. या देवी सर्वभूतेषु, शक्तिरूपेण संस्थिता, नमस्तस्ये, नमस्तस्ये, नमस्तस्ये नमो नम:असेच म्हटले जाते. एरवी, ‘सर्व मंगल मांगल्ये, शिवे सर्वार्थ साधिके, शरण्ये त्र्यंबके गौरी नारायणी नमोस्तुतेअशी तिची प्रार्थना केली जाते.घरामध्ये नवरात्रीत घटस्थापना करण्यात येते.अखंड नंदादीप नऊ दिवस तेवत ठेवण्यासाठी मोठा दिवा घेतला जातो. घरातील जेष्ठ लोक तो नंदादीप विझला जाणार नाही याची काळजी घेतात.

 नादि निर्गुण निर्गुण प्रकटली भवानी,

मोह महिषासुर महिषासुर मर्दना लावूनी

त्रिविध तापाची करावया झाडणी,

भक्तालागी तू ऽऽऽ

भक्तालागी तू पावसी निर्वाणी,

ऐसा जोगवा जोगवा मागेन।

द्वैत सारूनी माळ मी घालीन,

हाती बोधाचा झेंडा मी घेईन,

भेदरहित वारिसी जाईन,

ऐसा जोगवा मागेन।

नवविध भक्तीच्या भक्तीच्या करिती

नवरात्री, ओटी मागेन मागेन ज्ञानपुत्रा,

धरीन सद्भाव अंतरीच्या मित्रा

असा सद्गुणांचा, नि:संग होण्याचा, विकल्प, काम, क्रोध सोडून देण्याचा आणि जन्ममरणाचा फेरा चुकविण्याचा जोगवा मगला जातो. या जोगव्यामध्ये फार मोठा आध्यात्मिक अर्थ भरलेला आहे. मात्र तो समजून घेऊन, जोगवा मागितल्यास मनशुद्धी होऊन मन:शांती नक्कीच मिळेल. निर्गूण स्वरूप असलेलं देवीचं रूप  सुगण रूपात नवरात्रीत पुजलं जाते.

                                  परशुरामाची जननी म्हणजे रेणुका माता अर्थात माहुरगडवासिनी. देवीच्या साडेतीन पीठांपैकी एक कोल्हापूरची अंबाबाई दुसरी तुळजाभवानी, तिसरी रेणुकामाता ही तीन पूर्ण पीठे आणि नाशिकजवळ वणीची सप्तशृंगी हे अर्धेपीठ मानले जाते.या सर्व ठिकाणी नवरात्र मोठय़ा प्रमाणात साजरे होतात. तेथे दर्शनाला जाण्याची भक्तांची धडपड असते. पण ते शक्य झाले नाही तर निदान ग्रामदेवीच्या दर्शनाला तर आवर्जून जातात.शेवटी दर्शनाला जाऊन, मनाची शांतीच मिळाली पाहिजे. हाच तर सा-यांचा प्रयत्न असतो.

                                 नवरात्रीत गुजराथी महिला गरबा नृत्य करतात. सजूनधजून त्या गरब्यासाठी उतरतात आणि रात्री उशिरापर्यंत त्यांचे नाचगाणे सुरू असते. रंगमा रंगमा, रानी बहुचरमा खेले रंगमा’, ‘नौरात्रीमा नौ नौ दिवसमा’, किंवा पंकिडा तू उड न जाना, पावा गडोरे महाकाली से मिलने चलो, गरबा खेलेंगेअशा पारंपरिक गीतांवर, मंदिरामध्ये गरबा खेळला जातो. पूजेचा एक भाग म्हणून केला जाणारा गरबा हळूहळू व्यावसायिक रूप घेऊ लागला आहे. हजारोंची तिकिटे लावून, विशेष सेलिब्रिटीज बोलावून गरबा खेळला, नाचला जातो. त्यामध्ये अलीकड बरेच गैरप्रकारही होतात. धार्मीक स्वरूप जान फक्त सोहळा उरतो तेव्हाचं सल्या विकृती निर्माण होत असातात.असेच गैरप्रकार दर्शनाच्या रांगांमध्येही होतात. उत्सवाचे पावित्र्य त्यामुळे संपत जाते.तरुणाईचा जोश मान्य, पण त्यातून निर्माण होणारे गैरप्रकार थांबले पाहिजेत. सण, उत्सवांमधील शुद्ध, पवित्र भावना जपली पाहिजे. अश्या उत्सवातून लोंकांच्या मनात सांघिक भावना निर्माण होन मानव कल्याणासाठी उर्जा निर्माण होणं आवश्यक आहे.तरणाईची उर्जा ही सकारात्कतेत रूपांतरीत झाली पाहिजे.देवीच्या विविध रूपांची आराधना करताना, मनामध्ये भक्तिभाव उभारून आला पाहिजे.मन भक्तीरसानं ओथंबून जायला हवं.

पूर्ण बोधाची, बोधाची घेईन परडी,

आशा तृष्णेच्या, तृष्णेच्या पाडीन दरडी

मनोविकार करीन कुरवंडी

अद्भुत रसाची रसाची भरीन दुरडी

ऐसा जोगवा जोगवा मागीन

अशा प्रकारे मनोविकारांची कुरवंडी करण्याच्या भावनेतून, देवीच्या चरणी लीन व्हावे. केवळ नऊ दिवसांचे उपवास केले म्हणजे झाले असे नसून, उपवास म्हणजे दूर जाणे हा अर्थ गृहीत धरून, मनोविकार, पापवासना, दुष्टबुद्धी या साऱ्यांपासून दूर जाण्याचा निर्धार या नवरात्रात होणे अपेक्षित आहे. ज्या शक्तीचे, सामर्थ्यांचे दर्शन देवीने घडविले, तशी शक्ती, सामर्थ आपल्या ठायी निर्माण व्हावे, याचसाठी हा उत्सव आहे, तो त्याच पवित्र भावनेतून साजरा व्हावा.शक्तिरूपाचा जागर केल्यास, आपण शक्तिमान होऊ, हा विश्वास बाळगून, उत्सव साजरे केले जावेत. आपल्या आत असलेल्या शक्तीचा जागर नवरात्रोत्सवाच्या माध्यामातून होणे गरजेचं आहे.अनेक उत्सवाला आपल्या आपल्या स्वार्थनुरूप स्वरूप देणारे असतातचं.त्यातून ही माणसात दडलेल्या शक्तीचा जागर करण्यासाठी अश्या उत्सवातून प्रयत्नं होणं गरजेचं आहे.

 

                                                         परशुराम सोंडगे, पाटोदा

त्या मराठवाडायाला




      







त्या मराठवाड्याला

फक्त

  मतदानाच्या दिवशी

झोपेतून उठवलं तरी पुरेसं आहे

तो ऊसाच्या बुंध्यापाशी

असा कोणी

 माणूस बांधला आहे ?

हातां-पायांतल्या साखळदंडांना

इथं चमकावित राहतात माणसं

वेठबिगारीचा वारसा

चालवित राहतात माणसं

हे इतकं सुस्त पडलेलं

कोणत्या परुडाने 

फूकलेलं गाव आहे....?

घोषणेवरच देतो ढेकर

विकासाचे स्वप्न न पडलेला

इथला माणूस...

मुंबई मनसोक्त चघळून

थूंकून टाकते पान- मराठवाड्यासारखे...

जातींच्या खूराड्यात सरपटणारी माणसं,

जगण्याचे सोपस्कार उरकून

मातीत कूजण्यास होतात मोकळी

पोटावरच्या टाक्यांवर हात ठेवून

घरी जाणाऱ्या बाईचे

गर्भाशय हरवले आहे..

एका रस्त्याच्या कडेला

सकाळ - संध्याकाळ

एक खरजूलं कूत्रं असतं 

निरर्थक

नख्यांनी स्वतःला रक्तबंबाळ

करीत बसलेलं...

असा उभा नांगूर धरला तर

इथं मूलींची कोवळी हाडं

येतील वर..

अनुशेषाच्या टपरीवर

मिळतो मावा, गायछाप,

कोंबडा कटेल, चारमिनार,

120........300

बेसुर, बेभान वारा,

माशा बसलेले तोडलेले

बोकडाचे मुंडके

उकांडा उधळून गेलेले बदगे..

सामूहिक बधिरपणाचे वारुळ


वाढत गेले आहे नेहमीच

मराठवाड्याच्या आत्म्यावर..

आणि त्यामुळेच,

अंगावर वाढत गेलेल्या बाभळी

आणि डोळ्यांत फूटलेली निवडूंगं

बोचत नाहीत आम्हाला..

माझे निरिक्षण आहे की,

ऋतू होतात बेइमान इथे

पण माणसांचे खून पाडण्यात

इथे कोणतीही

अनियमितता नाही...

मला तरी अजून

हे कळलेलं नाही

की,

मराठवाडा निघाला कोठून

आणि पोचला कुठे...?

मराठवाड्याची सावत्र आई

फेकते ताटात 

उरलेल्या

भाकरीचा टुकडा- मुकडा

पश्चिम महाराष्ट्राची साखर

शुभ्र पांढरी आहे,

अशी वंदता आहे..

पण मला ती नेहमीच

रक्तवर्णी दिसते...

जन्माला येणाऱ्याने    


असे विनातक्रार

बेगुमान

जगण्याचे लोढणे ओढणे

ही अवनतीची असीम अवस्था आहे..

तूम्ही जरुर म्हणा..

हे सुवर्णयुग आहे

पण,

दररोज तोंडावर थुंकणाऱ्या आरश्याला

कसं टाळायचं....?



©️   *बाळासाहेब नागरगोजे*

      📱9403599807

रविवार, ११ सप्टेंबर, २०२२

गुंतता ह्रदय हे (भाग2)

 



तृप्ती जरी निलेशच्या मिठीत आसली तरी तिच्या मनात मात्रं त्याचेचं विचार येत होते.खरतरं ती त्याला बोलली पण नव्हती.कोण होता तो?कुठं राहतो तो? त्याचं नाव काय? तिला काहीचं माहित नव्हतं. माहित असण्याचं कारण ही नव्हतं. ती त्याला पहील्यांदाचं पहात होती. त्याचं नाव काय असू शकेल? याचा अंदाज ती बांधू लागली. खरतर तसा अंदाज काढणं शक्य नसतं पण त्याचं काय नाव असावं अशी कल्पनाच ती करू लागली.अश्या आकर्षंक मुलांची काय नाव असतात? तिला अनेक नावं आठवू लागली.अर्थात अश्या आकर्षंक पोरांचीच.तिला इंम्प्रेस केलेल्या पोरांची. ती तिची आवडती नावं त्याला चिकटवून पाहू लागली.


         तो तिच्याकडं आकर्षीत झालाय.हे तिच्या ही लक्षात आलं होतं.ती पण त्याच्याकडं खेचली जात होती. हे सारं नकळतच होतं होतं. आपलं मन सारं बंधनं तोडून त्याच्या कडं ओढलं जातं हे तिला ही कळतं होतं.तिचं वागणं ही सादास प्रतिसाद देणं असचं होतं. शाळेत असतानी अश्या प्रकाराला मुलं मुली लाईन मारणे म्हणायचे.तो लाईन मारत होता नि ती त्याला लाईन देत होती.लाईन क्लेअर झाल्यावर तो बेफीकर वागणं साहजिकचं होतं.त्याचं धाडसं वाढलं होतं नि हिचं काळीज थरथरतं होतं. काळीज थरथरणारचं ना? निलेश तिच्या नवरा तिच्या सोबतचं होता.आपला नवरा सोबत असता अश्या परक्या पुरूषांकडे पहाणं सोपी गोष्टं नसते.कोणत्या ही क्षणी तिच्या संसाराच्या चिंधाडया होऊ शकतं होत्या.मन थरथरतं असलं तरी त्याच्याडं पहाणं रोखता येतं नव्हत.नजरेला पण चटक लागतं असेल? नुसतं रोखून पाहणं ही किती रोंमाटीक असतं,नाही?


         त्याचं लग्न झालं असेल का? आपल्याला जसा नवरा आहे तशी त्याला बायको असेल का? जर बायको असेल तर ती कशी असेल? तिचं मन त्याच्या बायकोची कल्पना चित्रं गोळा करू लागलं.कल्पनेत उमटलेली चित्रं नि स्वत:ची तुलना तिचं मन करू लागलं. त्याची बायको नेमकी कशी असेल? चैत्राली सारखी. प्रणाली सारखी..?अनेक सुंदर सुंदर मुलींची नावं तिला आठवू लागली. कदाचित आपल्या सारखी तर नसेल ना?मन आकाशासारख असतं.आकाशात नाही का? ढगांचे आकार कशाचे ही नि कसे ही होतात. तसचं झालं हे. आपण त्याची बायको असतो तर हा प्रश्नं मनात उमटला. तशी ती दचकली.


              असं मनात काही बाही नको यायला. असला अभद्रं विचार आपण कसा काय करू शकतो? हा पण एक प्रकारचा व्याभिचारच आहे ना? कायीक व्याभिचार.. वाचीक व्याभिचार.. मानसिक व्याभिचार… व्याभिचाराचे असे काही प्रकार असतील का? असतील का नाही तिला माहीत नव्हतं पण तिनं तसे प्रकार केले होते.पुराणातल्या अश्या व्याभिचाराच्या कथा तिला आठवू लागल्या.कर्णं आणि द्रौपदी…शाप, उ:शाप… कसले भंयकर शाप असत पूर्वी. निलेशनं असा काही शाप दिला तर? तो देऊ शकेल शाप…? पश्चातापचा तवंग मनाच्या पृष्ठभागावर पसरत गेला.तिनं निलेशच्या डोळयात पाहिलं. निलेश तिच्याच डोळयात पहातचं होता.भरकटलेलं मन डोळं नाही लपवू शकत.


“तृप्ती लक्षं कुठं तुझं?” तिच्या चेह-याला अलगद स्पर्श करत निलेश बोलला.


“माझं लक्षं? तुझ्या डोळयात पण तुझं कुठं?” ती भानावर आली. मनातलं भलतं सलतं दाटलेलं तिनं झटकून दिलं.मनाचा तळ अगदीचं निथळं केला.ती स्वच्छं हासली.इतकं पुरेस नव्हतं म्हणून की काय तिनं ओठांनी  ही वापरलं.त्याच्या छातीवर ओठ ठेकवत त्याच्या डोळयात पहात राहिली. डोळयातून थोडचं मनात काय चाललं हे दिसू शकत? त्यासाठी शब्द तिनं मदतीला घेतले.घ्यावाच लागले.


“तुझ्याकडंचं.”तिचं केस विस्कटतं तो तिच्या नजरेत नजर घुसवत राहिला.काही क्षंणच.


“असं काय पहातोस? असं काय नवीन आहे माझ्यात?”


“सॉरी.ते नाही सांगता येणार मला.सारे रोजचेचं तरी नाव्याचा भास हा.”त्यानं मनातलं नि ओठातलं आलेलं बरचसं चोरलं. काही शब्द पण दुदैवीच असतात.ते असेचं मनातली मनात विरून जातात.


“खोटं.. सारं खोटं.”तिनं लटक्या रागाचं रंग  चेह-यावर पांगवला.


“खोटं नाही बोलू शकत मी,माहितीयं ना तुला?”


“मग असं का वागलास माझ्या बरूबर.संशय तुझा माझ्यावर?” त्याच्या डोळयात आरपार पहात ती बोलली.


“तसं नाही ग.तुझं वागणं सहजच होतं पण त्यानं कसा अर्थ काढला.वेडपट असतात पुरूष.असली थिल्लर पोरं तर फारचं विचित्र असतात."


"तू नाही विचित्र?"


"मी तुला विचित्र वाटतो?"


"तुझं पहाणं पण सभ्य नाही ,बरं"


"तुझ्याकडं सभ्यपणानं पाहू मी? मी नवरा तुझा...?"


"माझा नवरा होण्याच्या अगोदर...तुझं पहाणं..."


"तू आपल्या जाम आवडली होती.तुझ्या साठी काही पण.." तिला आपल्या अंगावर जोरात खेचतं तो बोलला.


"का?जाम आवडण्या सारखं काय आहे माझ्यात?"


"ते नाही सांगता येणार." तो तिला बिनधास्तपणे मनातलं सांगू शकला नाही.त्यानं मनातलं बरचसं चोरलं.


"खरं खर सांग.मी बायको तुझी.मला कसला संकोचतो."


"शट अप.तू फक्त माझीस...आणि माझीच आहे." आपल्या छातीशी  तिला अधिक कवटाळतं तो बोलला.


"मी दुस-याची बायको असते तर?"


"असं का बोलतेस?तू माझी बायकोस."


"समजा....असते तर तू काय केल असतं?" तृप्ती खर तर त्याला गुगली टाकली होती.तिचं बोलणं त्याला कळलं नाही.निले चं काय कोणत्याचं पुरूषाला रोंमाटिक मूड मध्ये भान उरतं नाही.


"काही ही....."


“बरोबर बोललास.कारण तू पण एक पुरूषचं आहेस ना?”


"मग"


"पुरूष मेले सारे सारखेचं...कुणी स्री दिसली लगेच....लाळघोटायला सुरू करतात."


“पण मी थोडा तसा.”


"निलेश, तुझ्या पण फार तक्रारीत माझ्या मैत्रिणीच्या.."


"कसल्या?"


"आवर बाई दाजीला...नुसतं थोबाडाकडं पहात असतात."


"कोण आहेत ग त्या...रांडा..?"


"निलेश, असं चिडू नको.त्या माझ्या मैत्रिणी आहेत. त्या रांडा नाहीत. त्या सालस..सोज्वळ आहेत  म्हणून तर मला सांगितलं ना त्यांनी."


"रांडा नाहीत ना?मग असा काही ही आरोप कश्या काय करू शकतात त्या? मी थोडाचं तसा?"


“कसा? आहेस मग?”


“त्या बावळटासारखा… कसलं पागलं होता तो. सारखं तुझा कडचं पहात होता.”


“तो पहात होता मग मी काय करू? अश्या बावळट पुरूषाची कमी नाही या जगात.” तृप्तीनं त्याच्या पोटावर चिमटा काढत बोलली.


“अश्या ठिकाणी आपण होऊनचं काही मर्यादा घालायला हव्यात.काही पथ्यं पाळायला हवेत.लोक फार विचित्रं असतात ग.”


“कसली पथ्यं?मला थोडाच डायबेस्टीक.?” तिनं उगीचं फालतू कोटी केली.थोडसं हासून त्याला रिलॅक्सं करायचं असावं तिला किंवा तो अधिकचा चिडू नाही म्हणून असेल कदाचित.


“डायबेस्टीक नाही ग पण?”

“पण काय?”

“तू सुंदरेस...तरूणेस... अधिकचं नटलीस की बिच्चारे...किती जण तरी पागल होऊ शकतात?"
"कुणी पागल झालं तरी....मी नाही ना पागल?खानदानी रक्त माझं." आपल्या चारित्र्याचा संबंध लोक खानदानाशी जुळतात. पवित्र असण्याचा तो एक पुरावा असतो.
"खानदानी...!! मग का ते पागल  झालं होतं?"

“असचं बोलणारेस का तू? कसला घाणरेडा आरोप करतोस माझ्यावर.शपथ. कसं सांगू तुला? या अगोदर नाही पाहिलं मी कधीचं त्याला.तो पहात होता माझ्याकडं, मी नाही?आपल्याकडं कुणी पहात असल्यावर.. आपण काय करू शकतो?कसलं प्रायचित्त घेऊ मी?”


“कसलं चिडतेस ग? मी कुठं काय म्हणालो आहे.”


“निलेश तू असं काही भी बोलू शकत नाहीस बंर.”

“इटस्‍ नॅचरल. जसा तुझा दोष नाही. तसाचं त्याचा तरी काय दोष? तो तरी काय करणार बिचारा… आहेसचं तशी तू.”

“कशी मी?”

“तू सुंदर नि व्हॉटं.सेक्सी.आज तर कमाल केली होतीस.एकदम जबरदस्तं दिसत होती. त्या बावळटाचं काय घेऊन बसलीस. सारेच तुझ्याकडं पहात होते.कुणी तुझ्याकडं तसं पाहिणलं की नाही सहन होत मला.”


“का?”


“का म्हणजे बायको तू माझी.”


“हो,मी तर विसरलेच होते.मी तुझी बायको आहे नि तु माझा नवरा.नव-यानं बायकोला मारायचचं असतं. शिव्या घालायच्या असतात. वेडीचं मी. बायको म्हणजे फक्त बायको असते. ती थोडीचं नव-याची प्रेयशी,गर्लफ्रेंड होऊ शकते. ती असते एक गुलाम.नवरा असतो तिचा मालक.मालक गुलामचं नातं असतं नवरा आणि बायकोचं.ङ मी वेडी प्रेम,मैत्री,प्यारं.. इश्कं असं काही नसतचं मुळी नवरा बायकोमध्ये.”


“असं का बोलतेस?^


“खरं तेच बोलतेय. लग्न झालयं आपलं. हे मगंळ सूत्रं घातलं माझ्या गळयात. तुझ्या नावाचं हे लायन्सं आहे ना? तू मला हवं तसं वापरू शकतो.वाटेलं ते बोलू शकतो.माणसाचं शरीर असतं बायकांना. त्यांना मन थोडचं असतं. उपभोग्य वस्तूना मन असून तरी काय उपयोग?”


“तृप्ती  काय लावलं हे?”


“सॉरी. पुन्हा नाही बोलणार मी.आता कळलं मला.फक्त बायको मी?” त्याच्या छातीवर एक करकचून चिमटा घेत व  राग चेह-यावर पांगवत ती बोलली.

“सॉरी…!! फक्त बायको नाही. तू तर जान है माझी… माय लव्हं.. पिसेंस ऑफ माय हर्टं..” असले शब्द माणूस कृती शिवाय थोडचं उच्चारू शकतो? श्वासात श्वास मिसळत गेले.


“तू फक्त माझी आणि माझीच आहेस. दुस-याची नाही होऊ शकत.”


“मी तुझीच आहे रे पण तू?”


“तू संशय घेतोस माझ्यावर.”


“मी नाही. तू ?” त्याचे उचकटलेलं ओठ हातानचं बंद केले.खोल डोळयात पहात ती बोलली.


“संशय नव-यानं बायकोवर घ्यायाच असतो.मी थोडीचं तुझा नवरा आहे?” ती गंभीर होती. त्यानं आपली मिठी अधिकचं घटं केली.


“माय लव्हं. ..माय हर्टं…” तृप्तीला पुढचं त्यानं बोलूच दिलं नाही.त्यानं ओठांनी तिचं ओठं बंद केलं होतं. पहाटेची चांदणी नुकतीचं उगवून आली होती. पारिजातक सांडत होता. गंध दरवळत होता.


 


कोवळं उन्हं आत आलं.निलेश अजून ही शांत झोपलेला होता.तृप्ती उठली होती. तिची अंघोळ पण झाली होती. त्याला उठावं का? त्याला उठावं तर लागेलचं. ऑफीसाला जायला उशीर होईल त्याला. उशीर झाला की पुन्हा चिडंचिड होईल.सांशयाचं विषाणू माणसाच्य मेंदूत शिरले की माणूस हैवान बनतो.रात्री त्यांन मारलं. निलेश इतकं क्रूरं वागू शकतो? आता त्याचा राग सारा निवळला. हे तिनं अनुभवलचं होतं.पण संशयाचं काय?


                    आता तिला विचार करत बसायाला वेळ नव्हता. सारं आवरायचं होतं. निलेशला उठवलं. ती अधिक प्रेमानं वागतं होती. त्याचं सारं आवरलं. त्याला ऑफीसला ही  पाठवलं. ते पण हासत हासतं.खर तर ते हसू नव्हतचं.तो हासण्याचा रंग फासून घेतला होता चेह-यावर. रात्री त्यानं मारलेलं तिला विसरता आलं नव्हतं. आज ऑफीसाला जाताना ही त्यानं एकांताचा पुरे पूर फायदा घेतला होता. अंघोळ करून ती खिडकीत उभी राहीली. ओले केसं… टॉवेलानं सुकवत उभी होती. ती रस्ता पाहू शकत होती. रस्ते वाहत होते. वाहनं धावत होती. शाळाकरी मुलं मुली हासतं हुंदडत जात होती.माणसं आपण होउनच गतीची सक्ती करून घेतात. हे सारं पहात असातना तिला तो आठवला. खरचं तो जगू शकला असेल?


तर्कं विर्तंकच्या चरख्यात तिचं मनं बराचं वेळं पिंळवटून निघालं होतं. तेवढयात तिचा फोन वाजला.


श्रेया होती. श्रोयानं इतक्या सकाळी का फोन केला असेल? फोन रिसीव्हं केला. श्रेया लगेच सुरू झाली.


“गुड मॉनिंग.. तृप्ती.”


“गुड मॉर्नींग सेम टू. इतक्या सकाळी फोन?”


“आवरलं तुझं सारं?”


“आवरलं. तूझं? आज ऑफीसाला नाही जात का?”


“नाही ग. आज रजा माझी. मी ॲपेक्स हॉस्पीटल मधून बोलतेय.”


“ हॉस्पीटल मधून? काय झाल तुला?”


“ मला काय धाडं भरलीय. अग तुला माहित का? काल लग्नात एक ॲक्सीडेंट झाला होता.”


“हो आम्ही घरी निघालो होतो तेव्हाचं झाला होता.आमच्या समोरचं झाला होता.”


“ज्याला धडक बसली तो माझा आते भाऊ. फारं सिरीअसं.”


“का? विवेकच्या जवळाचा का कुणी?”


“जवळचा म्हणून काय विचारतेस. माझ्या आत्याचा मुलगा तो.सख्खा आतेभाऊ तो.”


“मला नव्हत माहित तो तुझा आतेभाऊ म्हणूनं.”


“तू ओळखतेस त्याला.?”


“नाही ग.ओळखत नाही मी पण तो अपघात झाला तेंव्हा आम्ही तिथेच होतो.”


“येतेस हॉस्पीटला?”


“हॉस्पीटला?”


“तुझा ब्ल्डं ग्रुप AB आहे ना?”


“तुला कसं माहिगत?”


“अग ब्लडं बँकेत तुझं नाव. वाचलं मी. बल्डं बँकेत AB रक्तगटाचं रक्त शिल्ल्क नाही. येतेस?”


“अग एकटीचं मी घरी. निलेश ऑफीसला गेलाय.”


“विवेकला पाठवू का?”


“नको नको. त्याला कशाला पाठवतेस?”


“मग कशी येतेस?” श्रेयानं  तृप्तीला गृहीत धरलं होतं. श्रेयाचं काही चूक ही नव्हती. अश्या कामाज तृप्ती पुढेच असे.


“पेंशट शुध्दीवर आहे ना?” तृप्तीनं काळजीच्या स्वरात विचारलं.


“नाही ना? ब्लडीगं झालं. इर्मजन्सी ऑपरेशन करायचं. त्यच्या शरीरात पुरेसं रक्त नाही. ब्लडं बँकेत पण ते उपलब्ध नाही. प्लीज तू येना.तुला काही प्रॉब्लेम का?”


“मला कशाचा प्रॉब्लेम?”


“मग येना?


“निलेश घरी नाही. त्याला विचारावा लागेल.”


“मग विचार ना? का त्याला विचारयाला काय मुहूर्त पहातेस काय?” श्रेया घाबरली होती. तृप्तीचा रक्तगट हा AB+ तिला माहीत होतं. तृप्तीला ती आग्रह करण साहजिकचं होतं. त्या कॉलेजला एकत्रंच शिकत होत्या. राष्ट्रीय सेवा योजनेत ही त्या सहभागी असतं. रक्तदान शिबीरातून त्या रक्तदान ही करत असतं. तृप्ती  सामाजिक कार्यात कायम सहभागी असे. तत्परतेन ती मदत ही करत असते.


“दुसरं कुणीचं नाही का?


“दुसरे असतील ही पण तू नाही येऊ शकणार का? हे हॉस्पीटलं तुझ्या घरापासून जवळचं आहे ना?”


“जवळचं आहे पण? “ तृप्ती खरं तर श्रोयाला सांगू शकत नव्हती. कसं सांगणारं होती.  आपण असं रक्त दान केलं हे जर निलेशला कळलं तर? तो टोकाचा निणर्यं घेऊ शकतो.


“आता कशाला पण निबिणं… म्हणतेस. तृप्ती तो माझा सख्खा भाऊ.  निलेशला काय एवढं घाबरतेस? तो थोडाचं अश्या कामाला नाही म्हणार आहे.”


“तसं नाही ग.त्याला मी रक्तदान केलेलं आवडत नाही.”


“ असं कसं? त्याला आवडत नाही?”


“ का म्हणजे बायको त्याची मी. आजरी पडले बिडले तर?”


“ तृप्ती तू असं वेडयासारख काय बोलतेस? रक्तदान केल्यावर थोडचं असं काही होतं असात? तुझा दुसरा काही प्रॉब्लेम का?”


“खरचं निलेशला आवडत नाही. तुला माहीत तो कसा रागीटं. त्याच्या मनाविरूध एखादी गोष्टं झाली  तर नाही सहन होत त्याला.”श्रोयाला हे कळत नव्हतं. तृप्ती असं का बोलतेय.बायकोनं रक्तदानं केलं जर त्याला गर्व वाटावं असं कसं आवडत नाही. तृप्तीच्य मनात प्रंचड मोठ वादळ उठलं होतं.तो मृत्यूशी झुजतो आहे. आपण कदाचित रक्त दिलं तर तो जगू शकतो. कुणाचं मरण टाळण्या पेक्षा दुसरी गोष्टं कोणती असू शकते?


“तृप्ती,आदित्यं मृत्यूशी झुंजतो आहे. त्याला जींवत राहण्यासाठी तू मदत करू शकतेस.मी त्याची बहीण  असून ही करू शकत नाहीं. बघ निलेशला विचारून.”


“सॉरी, श्रेया… निलेशला नाही आवडणारं ते. त्याला तर नाहीचं प्लीज, तू दुसरं कुणी तरी शोध. मला माफ कर.” तृप्ती ठाम होती.


“त्याचा दुश्मन का तो?निलेशची नि त्याची ओळाख का?”


”अर्थात तसं काही नाही पण त्याला ते नाही आवडणारं हे नक्की.”


“ जशी तुझी मर्जी.. “ श्रेयानं रागा रागानचं फोन ठेवला.


               तृप्ती तशीच भिंतींला उभी राहिली काय करावं हेचं कळतं नव्हतं. रक्तदान केलं तर तो जगेल. दुसरं कुणाचं रक्त ही मिळेल पण आपण त्याला जीवंत राहण्यासाठी मदत करू शकत नाही. लग्नाची बंधनं स्वांतंत्रं हीरावून घेतात. असली सारी बंधनचं आपण तोडून टाकावीत का? आपल्याकडचं लक्ष होतं त्याचं म्हणूनचं तो पडलाय. त्याचं प्रेम खरं असेलं खोटं असेल.तो आपला कुणी नसला तरी माणूस म्हणून त्याला मदत करायला हवी.निलेशला जर हे कळलं तर? तो घरात नाही ठेवणारं.आपला संसार मोडणारं हे ही नक्की होतं.दहा मिनीटानंतर ती उठली.श्रेयाला कॉल लावला.


“ श्रेया,मी हॉस्पीटल येतेयं.”


“ निलेशनं परवानगी दिली तुला?” श्रेयाचा आंनद शब्दांत मावत नव्हता.


“ नाही. त्याला हे कळायाला ही नको.मी निघाले.” तृप्तीनं फोन ठेवला. श्रेया नुसती फोन कडचं पहात राहिली. तृप्ती अशी का वागते? नक्की ती आज नार्मल नाही.


(पुढील भाग लवकरचं)


 


रविवार, ४ सप्टेंबर, २०२२

गुंतता ह्रदय हे भाग 1


 संध्याकाळचं आकरा वाजलं होतं.कॉलनीतलं सारी सामसूम झाली होती.रस्त्यावरले बल्बं ढणाढणा जळत होतं.निलेशनं गाडी उभी केली. झटक्यात गेट उघडलं. बाईक आत मध्ये घेतली. बाईक पार्क केली. पाय आपटत आपटत चालत पाय-या चढून वर गेला.असं वर जाण्यासाठी तो लिप्टं ही वापरू शकला आसता. तो नेहमी वापर करायचा ही लिप्टचा पण आज असं काहीचं केलं नाही.तृप्ती नुसती उभी राहिली. सारं त्याचं पहात होती. भितीनं तिचं अंग थरथर होतं.त्याच्या मागं चालत जावं की लिप्टं वापरावी?तिला हा प्रश्न पडला. काही क्षणच. ती मुकाटयाने पाय-याच चढू लागली.

             अजून ही निलेश रागरागनचं पहात होता पण तिची काय चूक होती? एखादं आपल्या कडं पहात असेल तर स्त्री काय करू शकते? लग्नासारख्या समारंभात तर अश्या गोष्टी घडतचं असतात. आता ते बावटं सारखचं आपल्याकडं पहात होतं.त्याला ती काय करू शकत होती.असे पागल तर जळी स्थळी काष्ठी पाषाणी भेटतचं असतात.मुलीसाठी हे नक्कीचं नवीन नव्हतं.निलेशला एवढं एक्साईड होण्यासारख कुठं काय झालं होतं? तो बावळटं  पहात असताना त्याच्याकडं तिचं लक्ष गेल होतं.सारखं सारखंच लक्ष गेलं. त्याचं रोखून पहाणं.निलेशच्याच लक्षात आलं.बस्सं एवढचं.तृप्तीला कळत नव्हत की आपण नेमकं काय करायाला पाहिजे होतं.

               तो काही एकटाचं पुरूष नव्हता तिच्याकडं तसा पाहणारा… अनेकजण होते. निलेशचं काका पण पहातातचं आपल्याडकडे.अगदी तसचं. पुरूषी नजरेत एक  विखार असतो. त्यांचं पहाणं ही तृप्तीला फारच किळसवाणं वाटतं होतं. पुरूषांची तसली नजर लगेच स्त्रीयांना कळते. आता काय त्याच्या काकाच्या नावानं शंख करायचा का? त्याला ते पटणारं का? आपल्या काकावर केलेले आरोप तो सहन तरी करू शकेल का?पाय-या चढताना तिचा धमछाक झाला होता.घाम पण आला होता. नेमक निलेश घरात गेल्यावर…कसा वागतेय याचं ही जॅम टेन्शन होत तिला.आज तिची सासू सासरे पण घरी नाहीत. ते ही औंरगाबादला लग्नाला गेलेत.पुरूषांचा राग भंयकर आसतो.संशय तर माणसाला राक्षस बनवतो.

       कशी बशी ती घरात पोहचली होती. निलेशचा अजून ही राग गेला नव्हता.तिनं त्याच्याकड हासून पाहण्याचा प्रयत्न केला.तो हासला नाही. उलटं त्यानं डोळं वटारलं.त्याचा राग अजून ही वाढतोच आहे असं तिला वाटल. तिनं दारं लावलं.ड्रेसींग रूममध्ये गेली. साडी फेडली. टॉवेल घेतला.अश्या अवस्थेत त्यानं जर तिला पाहीलं तर तिची काही खैर नसायची. अक्षरश: निलेश तुटून पडायचा तिच्यावर… त्याच्यातलं पशूत्वं ऊफळून यायचं. आज तो शांत होता.तिनं चोरून लपून ही पाहिल त्याच्याकडं. अर्थात नखरा होता तिचा तो. असले नखरे सहन करायचा मूडच नव्हता त्याचा. अजून ही तो रागानं फणफणतचं होता.


ती‍ बाथरूमध्ये गेली.थोंडं फ्रेश झाली. गाऊन घालून समोर आली.पाण्यामुळं तिच्या चेहरा अधिकचं टवटवीत झाला होता. राग तर तिला ही आला होता. आपल्या रागाचं रुपांतर तिनं लटक्या रागात केलं. त्याच्या कडं रोखून पाहिलं.नाही तरी निलेशचा राग वितळून टाकण्यासाठी ती दुसरं काय करू शकत होती? तो गुम्या सारखा गप गप होता.


“निलेश,तू फ्रेश हो.तुला चहा ठेऊ?” बायकोनं नव-याला असं विचारायचं असतं  म्हणून तिनं तसचं नि तेवढचं विचारलं.


“हे बंद कर बकवास.मला अगोदर हे सांग. कोण तो आयघाल्या?” एकदाचं त्याचं तोंड उघडलं.


“निलेश मला नाही माहित. शपथ या अगोदर मी त्याला कधीचं पाहिलं पण नाही.” काकूळतीला येऊन तृप्ती सांगत होती. ती त्याच्या अधिक जवळ आली.


“ हे नाटक बंद करायचे.खरं खरं सांगायचं. कोण तो भोसडीचा.” निलेश प्रत्येक वाक्यात शिवी देत होता. असलं घाणेरडं चुकून सुध्दा कधी बोलत नव्हता तो.


“खरचं नाही माहित मला.कसं सांगू तुला?”


“काय सांगू नकोस.आवडला ना तुला तो.तुला जायचं का त्याच्या बरूबर…”


“निलेश काय बकतोस तू?असं काय केलं मी?”


“ऐ, चूप.. जास्तं बोल्लीस..तर थोबाड फोडील तुझं.. मला काय बुळगं समजतीस काय?”


“निलेश, काय हे?तो पहात होता माझ्याकडं मी काय करू शकत होते?”


“गप.जास्त शहाणपणा हेपलू नकोस.मी सारे नखरे पाहिलेत तुझे.”


“काय पाहिलसं तू? कसले नखरे केलेत मी?" तृप्तीचा भी थोडा आवाज वाढाला होता. एवढा आवाज तर वाढणं साहजिकचं होतं.


“तो पहात होता तुझ्याकडं नि तू? काय काहीचं करत नव्हतीस ना? डोळं बंद  होते तुझे. तू इतकी साव… “


“बस् झालं निलेश… आता मी जास्त ऐकू शकत नाही.”


“काय करणारेस तू? मला सोडून जाणारेस का? जा. खुशाल जा. आयघाले. तुझं माझ्या कडून भागत नसेल तर…छिनाल रांड कुठली?” निलेशच्या जीभेला हाड नव्हतं. वाटेल ते तो बोलत होता.


“निलेश तू माझ्यावर संशय घेतोस? तशी वाटते मी तुला.”


“फार सावपणाचा आव आणू नकोस. थांब तुझ्या बापाला सांगतो त्याच्या हे लेकीचं.हे चाळे.” त्यानं मोबाईल काढला. तो कॉल लावू लागला.तृप्तीच्य हातपाय गळून गेलं होतं.आता हे पप्पाला नि मम्मीला पण सांगणार. आपल्या वरील असले घाणरेडे आरोप ते सहन करू शकतील? ती त्याच्या अंगावर धावली. त्याच्या हाततला मोबाईल हिसकावून घेतला. तश्या तडा तडा त्यानं तिचं गालफाडं सडकून काढलं. भिंतीवर ही ढकलून दिलं. तृप्ती खाली पडली. ती मोठयानं रडली नाही.


“ प्लीज. निलेश तू पप्पांना फोन करू नकोस. नाही सहन करणार ते.” त्याच्या पाया पाशी ती पडली होती. ती विनवणी करत होती. निलेश अजून ही रागानं पहातच होता. तो बराच खिडकीत उभा राहीला. तृप्ती फरशीवर पडलेलीचं होती. हुंदक बाहेर पडू ने देता. ती आसवं ओघळत होती.


दहा पंधरा मिनीटानंतर…


तो आत आला. फ्रीजमधलं पाणी घेतलं. ढसाढसा पाणी प्याला.बेडवर आडवा झाला.तिच्याकडं नुसता एक टक पहात राहिला. त्या नजरेत एक मागणी होती. तृप्तीला त्यानं पप्पाला नि मम्मीला फोन केला नाही हे तिच्यासाठी फार मोठी गोष्टं होती.तेवढयासाठी सारं सारं विसरून तृप्ती त्याच्या हवाली झाली. निलेशचं आजचं रूप भंयकर वाटलं तिला.संस्कृतीची किती ही आवरण घालून माणसं आपलं पशूत्व लपवत असले तरी अश्या वेळी ते बाहेर येतेच. त्याचं ते रानटीपण तृप्ती काही तास सहन करत राहिली.तिच्या शरीरात त्राण नव्हता राहिला. आपण पुरूष म्हणून काहीच कमी पडू नयेत याची तो पुरेपुर दखलं घेत होता.


“खरचं, मी तुला आवडतो ना?”तृप्तीला अधिक बिलगून घेत निलेश बोलला.त्याच्या त्या स्वरात एक प्रकारची भीती होती. एक न्यूनगंडाची किनार होती.


“कसं सांगू तुला? फक्त तू आणि तूच आवडतो मला.”देहात उरला सुरला त्राण आणून आपल्या ओठांनी त्याच्या केसाळ छातीवर  प्रेमाचा वर्षाव केला.अर्थात तिनं सारचं त्याच्या हवाली केल आसलं तरी तिला अधिकचं हे करावं लागलं.पुरूष मिठ्ठीत आसला की कशाला ही राजी होतो.

"निशू, मी तुझी आणि फक्त तुझीच आहे.असा संशय नाही घ्यायचा सांगून ठेवते."लटक्या रागानं तिनं तिचं नाक त्याच्या नाकावर रगडलं. निलेश पुन्हा  चवताळला.असं अधिकचं खवळून घ्यायला स्रीयांना पण आवडतचं ना?

" पिल्लू... माझू पिल्लू..."

" गुदमरले मी..मरेन मी."

"तुझ्याकडे कुणी पाहू पण तू..."

"खरचं तो माझ्याकडं पहात होता.नुसतं कुणी पाहिलं तरी इतका राग?"

"मला नाही आवडतं कुणी तुझ्याकडे पाहिलेले."

"का विश्वास नाही माझ्यावर?"त्याच्या डोळयात  पहात ती बोलली.

"तुझ्यावर विश्वास पण..  या तुझ्या सौंदर्यावर.."

"इतकी सुंदर मी?"

"नुसती सुंदर चं नाही हाॅट..आणि सेक्सी पण..त्यामुळेच तो आयघाला..." निलाश त्याला शिव्या देत.नुसते लचके तोड राहिला.ती निर्जिव  होऊन फक्त पडून राहिली. तो तिला खाऊ का ठेऊ असा करत असला तरी संश्याची सुई त्याचं मन टोकरतचं होती.हे तृप्तीला पण कळतं होतं.

      बराच वेळा नंतर निलेश झोपी गेला. तृप्तीला झोप नव्हती. जे आज झालं त्यात तिची काय चूक होती? ती उगचं गेल्या दिवसाचं हळकुंड उगळीत बसली. 

        निलेशच्या एका मित्राचं लग्न होतं. लग्नाला ते दोघचं आज गेले होते.लग्नाला साडी कोणती नेसू हे पण दोघानीं मिळवून ठरवलं होतं. सारं नटून झाल्यावर फार छान दिसतेस म्हणून.. आऊट ऑफ.. कंट्रोलपण झाला होता निलेश. दोघ बाईकवरच लग्नात गेले. त्यांनी लग्न ही फार इंन्जाॅय केलं. निलेशचे अनेक मित्र ही भेटले. आपली बायको सुंदर आहे. याचा किंचितसा गर्वं ही त्याच्या  चेह-यावर पांगलेला होता. त्याचा तो गर्व खोटा ही नव्हता. तृप्ती मुळातचं दिसायला सुंदर होती. आज तर फारचं छान… अश्या बाया लग्नात एक आकर्षण ठरत असतात. तसचं झालं. त्या लग्नात तृप्ती फारचं आकर्षक दिसतं होती.अर्थात अनेक नजरा तिच्यावर खिळल्या होत्या. तृप्तीला ही ते नवीन नव्हतं.अश्या अनेक लग्नात तिच्यासाठी पागल झालेली मुल तिनं पाहिली होती .अनुभवली होती. तसचं आज ही होत. निलेशच मात्र सारं लक्ष तिच्याकडचं होतं. त्यांच लग्न झालेलं अजून वर्ष ही झालं नव्हतं.निलेशला तिचं अप्रूप वाटणं साहजिकचं होतं.


           एक मुलगा सारखा तिच्यकडं पहात होता. तृप्तीची ही नजर अनेकदा त्याच्या वर खिळली होती.अनेकदा प्रयत्न करून ही त्याला चोरू पाहण्याचा मोह आवरता आला नव्हता. चोरटं पहाणचं घातक ठरलं. तसं ते मुळात घातकचं असतं. तो मुलगा तिच्यात जास्तचं गुंतत गेला.  आईसक्रीमच्या गाडयावर ती निलेश सोबतच होती.आईसक्रीम तिची मजबुरी. निलेश सोबत ती आईसक्रीम खात असताना तो मुलगा एकटक तिच्याकडं पहात होता. आता तिच्या हे लक्षात ही आलं पण कुणी आपल्याकडं पहात आहे म्हणून थोडचं खायचा बंद करता येते. लगेच कुणाला  सांगता ही येतं नाही. निलेशनं हे लक्षात आलं. तो दोघाकडं ही लक्ष ठेउनच होता.त्याच्याकडं लक्ष होतं. त्यात आईसक्रीम हातून पडली.


“तृप्ती लक्षं कुठं तुझं?” निलेश तृप्तीला दटावत त्याच्याकडं डोळं वटारून म्हणाला. तृप्ती ही सावध झाली. ते आईसक्रीम तिच्याच साडीवर सांडलं होतं.लगेच तिनं ते झटकलं. आता असं झालं हे समोरच्यनं पाहिलं तर नाही ना? म्हणून तिनं आपली नजर पुन्हा त्याच्याकडं पाठवली. तो छान हासला.  ही वरमली. हे सारचं निलेश पाहू शकला. खर तर त्याला तेव्हाचं फार राग आला होता.

     ते तिथून हालले पण… निलेश आपल्याला ओढतचं नेत आहे हे तिच्या पण लक्षात आलं. तृप्ती नाही म्हणलं तरी त्याच्याकडं खेचली गेली होती. अनेकदा तिला प्रयत्न करून ही ते लपवता नाही आलं. जेव्हा त्या हॉलमधून हे बाहेर पडत होते. तेव्हा ते बावळट. पुढं हजरच होत॔ ऐन रोडवर.त्याला पाहिलं की…निलेशला राग आला.राग येणारच ना? एकटक तिच्याकडं रोखूनचं पहात होता. बाईक चालू केली. तृप्ती बाईकवर बसणार तेवढयात….एक गाडी आली आणि तृप्ती मोठयानं ओरडली. ते बावळटं पोरंग खाली पडलं होतं. तृप्तीला राहवलं नाही. ती बाईक वरून उतरली नि पळाली.तो पर्यत गर्दी जमा झाली होती. निलेश बाईकवरच बसून होता. तृप्तीकडं रागरागानं पहात होता.ती त्याच्या जवळ पोहचली असली तरी निलेश  बाईकवरून खाली उतरला पण नव्हता.


“निलेश तो….” मागे वळत तृप्ती त्याला म्हणाली.


“चल,आयघाले.भोसडीचा…बरा..” वचावचा शिव्या दिल्या. तृप्ती जाग्यावरचं उभी होती. पुढं जावं की माग? निलेश गाडीचा मोठयानं हॉर्नं वाजवू लागला. तृप्ती मुकाटयानं आली. बाईकवर बसली.


“एवढं पळत जायला कोण होता तुझा तो?"


“तसं नाही रे पण त्याला लागल आसलं…” तृप्ती अजून त्याच्याकडं पहात होती.


“मरू दे.भोसडीचा.असले मरायालाचं हवेत.”  शिवी हासडली नि त्यानं जोरात बाईक पळवली. बस्सं एवढचं झाल.अपघात आपल्या डोळया समोर होता नि आपण शांत कसं राहयचं? तसं त्या मुलांच नि आपलं काहीचं नात नव्हतं. माणसाला संवेदानाशिलता असते ना? त्या संवेदनशिलतेनं आपण धावलो. आपल्या बायकोकडं नुसतं पाहिलं म्हणून त्याच्या मरणाची वाट पाहयची का? निलेश इतका क्रूर कसा वागू शकतो? तृप्ती झोपू शकली नाही.


शेजारी गाढ झोपलेल्या निलेशकडं ती पहात होती. त्याच्या शरीराकडं ती पहात होती.त्याच्या एका एका अवयवाकडं पहात राहिली. निलेशचं तरी काय चुकलं? असं काय होतं त्या मुलाकडं त्याच्याकडं आपण आकृष्टं झालोत? पुरूषाचं वेगळेपण नेमक कशात असते? निलेश मगा जे  वागला ते योग्या नसेल? नवरा म्हणून त्यानं काय करायाला हवं होत? त्याच्या चेह-याकडं ती पहात राहिली.आपलं ओठं त्या देहावर टेकवत अधिकच त्याला बिलगली. 

          पडल्या जाग्यावरून खिडकीतून डोकावणारा चंद्र ही ती पाहू शकली.चंद्राच्या चांदण्यातून काही रसायनं माणसाच्या नसानसात पांगत जात असेल काय? तृप्तीचा जरा रोमांटीक मूड होता होता. निलेश तर गाढ झोपेत होता. तो कोण असेल? त्याला लागल असेल का?तो कोणत्या हॉस्पीटलं मध्ये असेल? तो पुन्हा भेटलं का? निलेशच्या छातीवर गुलाबी ओरखडे काढत होती. त्या मुलायम नशेली स्पर्शन निलेशला जाग आली. त्यानं पुन्हा तिला आपल्या मिठीत घेतलं.तृप्तीला प्रश्न पडला. आपण या इथं अश्या? पण नक्की तो जगला तरी असेल ना?


क्रमश:


(पुढील भाग लवकरचं…..)


सिर्फ देश नहीं, संविधान ही बदल रहा है...!!

  सिर्फ देश नहीं, संविधान ही बदल रहा है...!! सरकारला विचार नसतात.राजकीय पक्षांना विचार असतात. तशी विशिष्ट विचारांची सरकार चालवायला अजिबात गर...